U19 WC: लाईव्ह सामन्यादरम्यान आला भूकंप, मैदानाचे झाले असे हाल, पाहा Video

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jan 31, 2022 | 12:26 IST | टाइम्स नाऊ मराठी

Earthquake in U19 World Cup:अंडर १९ वर्ल्डकपमध्ये जिथे युवा क्रिकेटर आपले कौशल्य दाखवत चाहत्यांची मने जिंकत आहेत तर स्पर्धेदरम्यान अशा काही गोष्टी घडत आहेत ज्यामुळे साऱेच हैराण झाले आहेत. 

u19wc match
U19 WC: पाहा Video, लाईव्ह सामन्यादरम्यान आला भूकंप 
थोडं पण कामाचं
  • अंडर १९ वर्ल्डकपमध्ये सामन्यादरम्यान आला भूकंप
  • भूकंप येताच हलू लागले मैदान
  • सौशल मीडियावर व्हायरल झाला व्हिडिओ

मुंबई: सध्या क्रिकेट चाहते अंडर १९ वर्ल्डकपचा(u19 world cup) आनंद घेत आहे. मात्र या स्पर्धेदरम्यान अशी घटना घडली आहे ज्यामुळे सारेच हैराण झाले. ही घटना शनिवारी २९ जानेवारीला झिम्बाब्वे(zimbawbe) आणि आयर्लंड(ireland) यांच्यातील सेमीफायनल २ सामन्यात पाहायला मिळाली. हे भूकंपाचे झटके(earthquake) संपूर्ण २० सेकंदापर्यंत अनुभवता आले मात्र विशेष बाब म्हणजे याचा खेळावर कोणताही परिणाम झाला नाही. earthquake in live match of Ireland vs Zimbabwe

सोशल मीडियावर समोर आलेल्या एका व्हिडिओत एक गोलंदाज भूकंपादरम्यान फलंदाजाला बॉल टाकताना दिसत आहे. त्याचदरम्यान मैदान अचानक हलू लागते. क्रिकेट चाहतेही हा प्रसंग पाहून हैराणझाले. व्हिडिओमध्ये कमेंटेटरही हे दृश्य पाहून आश्चर्यचकित होतात आणि कमेंट्रीदरम्यान घाबरलेले दिसतात. 

अधिक वाचा - बाप अन् भावाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

सामन्याबाबत बोलायचे झाल्यास आयर्लंडचा संघ हा सामना ८ विकेटनी जिंकण्यात यशस्वी ठरला. झिम्बाब्वेने पहिल्यांदा फलंदाजी करताना ४८.४ ओव्हरमध्ये १६६ धावा केल्या. त्यानंतर आयर्लंडच्या संघाला ३२ ओव्हरमध्ये हे लक्ष्य गाठण्यात यश मिळाले. याशिवाय दुसरीकडे अंडर १९ वर्ल्डकपमध्ये भारताबाबत बोलायचे झाल्यास टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये जागा पक्की केली आहे. भारतीय संघाने बांगलादेशला क्वार्टरफायनलमध्ये हवले आणि सेमीफायनल गाठली. 

अधिक वाचा- प्रेक्षकांनी ‘भिकार सीरियल पाहणं बंद करावं -विक्रम गोखले

वेगवान गोलंदाज रवी कुमारच्या शानदार स्पेलच्या जोरावर शनिवारी आयसीसी अंडर १९ वर्ल्डकपच्या अंतिम क्वार्टर फायनलमध्ये गतविजेता बांगलादेशचा डाव ३७.१ ओव्हरमध्ये १११ धावांवर आटोपला. यानंतर भारतीय संघाने ५ विकेटनी हा सामना जिंकला. दरम्यान उपांत्य फेरीत भारताचा सामना येत्या बुधवारी ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. उपांत्यपूर्वी सामन्यात भारताचा सामना बुधवारी ऑस्ट्रेलियासोबत होणार आहे. हा सामना अंटीगा येथील कूलीज क्रिकेट ग्राउंडवर खेळवण्यात येणार आहे. बलाढ्य पाकिस्तानचं आव्हान ऑस्ट्रेलियन संघानं मोडून काढलं होतं. अशा स्थितीत उपांत्य फेरीचा सामना अतिशय रोमांचक होण्याची अपेक्षा आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी