IPL मॅचचे तिकीट खरेदी करण्याची सोपी पद्धत

Easy way to buy IPL match tickets : आयपीएल 2023 स्पर्धा (Indian Premier League : IPL, IPL 2023) शुक्रवार 31 मार्च 2023 पासून सुरू होत आहे.

Easy way to buy IPL match tickets
आयपीएल मॅचच्या तिकिटाच्या खरेदीची सोपी पद्धत  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • IPL मॅचचे तिकीट खरेदी करण्याची सोपी पद्धत
  • आयपीएल 2023 स्पर्धा शुक्रवार 31 मार्च 2023 पासून सुरू
  • पहिली मॅच गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स

Easy way to buy IPL match tickets : आयपीएल 2023 स्पर्धा (Indian Premier League : IPL, IPL 2023) शुक्रवार 31 मार्च 2023 पासून सुरू होत आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये पहिली मॅच गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स ही आहे. ही मॅच शुक्रवार 31 मार्च 2023 रोजी संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून सुरू होणार आहे. पहिली मॅच गुजरातमध्ये अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या मॅचचे तसेच आयपीएलच्या इतर कोणत्याही मॅचचे तिकीट खरेदी करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. आयपीएल मॅचच्या तिकिटांची विक्री ऑनलाईन सुरू आहे.

आयपी एल स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी शनिवार 1 एप्रिल 2023 रोजी डबल हेडर आहे. एकाच दिवशी दोन मॅच होणार आहेत. यातली पहिली मॅच दुपारी 3.30 वाजता तर दुसरी मॅच संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे. शनिवारची पहिली मॅच पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आणि दुसरी मॅच लखनऊ सपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स अशी आहे. यानंतर आयपीएल स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी रविवार 2 एप्रिल 2023 रोजी पुन्हा एकदा डबल हेडर आहे. पहिली मॅच दुपारी 3.30 वाजता तर दुसरी मॅच संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे. रविवारी पहिली मॅच सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स अशी आहे. यानंतर दुसरी मॅच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स अशी आहे. 

आयपीएल मॅचच्या तिकिटाच्या खरेदीची सोपी पद्धत

bookmyshow, insider.in, Ticketgenie, Paytm या पैकी कोणत्याही प्लॅटफॉर्मवरून आयपीएलच्या मॅचचे तिकीट ऑनलाईन खरेदी करू शकता. आयपीएलच्या तिकिटाची किमान किंमत 400 रुपये आहे.

IPL ट्रॉफीवर संस्कृतमध्ये काय लिहिले आहे?

IPL 2023 चे 10 कॅप्टन

IPL 2023 मध्ये नाही खेळणार हे खेळाडू

IPL मधून चमकलेले भारतीय क्रिकेटपटू

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी