Ashes 2022, Aus Vs Eng: विजयानंतर सुरू होती बीअर पार्टी,  नशेत होते हे क्रिकेटर्स, पोहोचले पोलीस Video 

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jan 18, 2022 | 16:00 IST | टाइम्स नाऊ मराठी

englans and australian players party: इंग्लंडला अॅशेस मालिकेत ४-० असे हरवल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी जोरदार सेलिब्रेशन केले. खेळाडूंनी जोरदार बीअर पार्टी केली मात्र पोलिसांनी तेथे पोहोचल्यानंतर त्यांना बाहेर काढण्यात आले. 

party
विजयानंतर सुरू होती दारू पार्टी,  नशेत होते हे क्रिकेटर्स 
थोडं पण कामाचं
  • हा व्हिडिओ इंग्लंडचा असिस्टंट कोच आणि माजी फलंदाज ग्राहम थोर्पने शूट केला होता
  • इंग्लंडचा कर्णधार ज्यो रूट, जेम्स अँडरसन, ऑस्ट्रेलियाचा अॅलेक्स कॅरी, ट्रेविस हेड आणि नाथन लियोनला चार महिला पोलीस घेरून उभ्या होत्या.
  • इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने संपूर्ण प्रकरणावर एक कमिटी बनवली आहे

होबार्ट:  ऐतिहासिक अॅशेस मालिका संपताच ऑस्ट्रेलिया(australia) आणि इंग्लंडच्या(england) क्रिकेटर्सनी जोरदार सेलिब्रेशन(celebration) केले. टीमचे हॉटेलमध्ये रात्रभर सेलिब्रेशन सुरू होते. भरपूर दारूही यावेळी प्यायली गेली. नाचगाणेही झाले. दरम्यान, परिस्थिती इतकी बिघडली की सकाळी साडेसहा वाजता येऊन पोलिसांना ही पार्टी(party) बंद करावी लागली आणि क्रिकेटर्सना बाहेर काढण्यात आले. england and australia cricketers drink beer in party after match, see video

हा व्हिडिओ इंग्लंडचा असिस्टंट कोच आणि माजी फलंदाज ग्राहम थोर्पने शूट केला होता. त्याचा आवाज या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे ऐकू येत होता. व्हिडिओ जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा संपूर्ण जगात या व्हिडिओची चर्चा सुरू आहे. इंग्लंडचा कर्णधार ज्यो रूट, जेम्स अँडरसन, ऑस्ट्रेलियाचा अॅलेक्स कॅरी, ट्रेविस हेड आणि नाथन लियोनला चार महिला पोलीस घेरून उभ्या होत्या. आता इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने संपूर्ण प्रकरणावर एक कमिटी बनवली आहे जी याचा तपास करणार आहे आणि यात दोषी खेळाडूंना शिक्षाही होऊ शकते. 

ही पार्टी होबार्टमधील टीमच्या एका हॉटेलमध्ये साजरी करण्यात आली.  येथे अॅशेस मालिकेतील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना खेळवण्यात आला होता. रूफ टॉप रेस्टॉरंटमध्ये झालेल्या पार्टीत क्रिकेटर्सना दारू पिण्यास मनाई करत असलेले आणि रेस्टॉरंटच्या आत जाण्याचे अपील करताना पोलीस कर्मचारी दिसत आहे. 

बॅकग्राऊंडमध्ये लावलेल्या मोठ्या घड्याळात सकाळचे सहा वाजून ३० मिनिटे झाल्याचे दिसत आहे. यावरून अंदाज लावला जाऊ शकतो की क्रिकेटर्सनी रात्रभर पार्टी केली. व्हिडिओमध्ये पोलीस अधिकारी म्हणत आहेत की, खूप जास्त आरडाओरडा झाला आहे. तुम्हाला आधीच पार्टी संपवण्यासाठी सांगितले होते. त्यामुळे आता आम्हाला येथे यावे लागले. 

डेली टेलिग्राफच्या माहितीनुसार खेळाडूंनी कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार केला नाही. तर जोरात आवाज असल्याची तक्रार टीम हॉटेलकडून करण्यात आली कारण खेळाडू छतावर मोठ्या आवाजात म्युझिक ऐकत होते. टास्मानिया पोलिसांच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अधिकाऱ्यांनी जोरदार आवाज केल्याची तक्रार केल्यानंतर क्राऊन प्लाझा हॉटेलमधून खेळाडूंना बाहेर काढण्यात आले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी