Shane Warne Tribute: २३ व्या षटकातील २३ सेकंद! इंग्लंड आणि न्यूझीलंडच्या खेळाडूंनी शेन वॉर्नला वाहिली अनोखी श्रद्धांजली

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jun 03, 2022 | 19:28 IST | टाइम्स नाऊ मराठी

ENG vs NZ 1st Test, Shane Warne Tribute । सध्या इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यामधील कसोटी सामन्याचा थरार रंगला आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्नचे मार्चमध्ये थायलंडमध्ये निधन झाले होते.

England and New Zealand players pay unique tribute to Shane Warne 
ENG आणि NZ च्या खेळाडूंनी वॉर्नला वाहिली अनोखी श्रद्धांजली  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सध्या इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यामधील कसोटी सामन्याचा थरार रंगला आहे.
  • ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्नचे मार्चमध्ये थायलंडमध्ये निधन झाले होते.
  • इंग्लंड आणि न्यूझीलंडच्या खेळाडूंनी शेन वॉर्नला वाहिली अनोखी श्रद्धांजली.

ENG vs NZ 1st Test, Shane Warne Tribute । नवी दिल्ली : सध्या इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यामधील कसोटी सामन्याचा थरार रंगला आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्नचे मार्चमध्ये थायलंडमध्ये निधन झाले होते. त्याच्या निधनाने जगभरातील क्रीडा प्रेमींवर शोककळा पसरल्या होत्या. जगभरातील क्रिकेट चाहते आणि खेळाडू त्याला विसरु शकत नाहीत आणि यामुळेच वॉर्नला जगभरातून आदरांजली वाहिली जाते. क्रिकेटच्या मैदानावर देखील वॉर्नचे स्मरण केले जाते. इंग्लंड आणि न्यूझीलंडच्या यांच्यामधील कसोटी सामन्यादरम्यान देखील क्रिकेटपटूंनीही सामना सुरू झाल्यानंतर असेच काहीसे केले. लॉर्ड्सवर दोन्ही संघांतील खेळाडूंनी शेन वॉर्नला अनोखी श्रद्धांजली वाहिली. (England and New Zealand players pay unique tribute to Shane Warne). 

अधिक वाचा : स्पर्म दान करून माणूस बनला १५ मुलांचा बाप, वाचा सविस्तर

 शेन वॉर्नला वाहिली अनोखी श्रद्धांजली

बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील इंग्लंड आणि केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी, लॉर्ड्सच्या हजारो प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून आणि दोन्ही संघातील खेळाडूंनी २३ व्या षटकात २३ सेकंद स्तब्ध उभे राहून दिग्गज क्रिकेटरला श्रद्धांजली वाहिली. या दिग्गज क्रिकेटपटूचे ४ मार्च रोजी वयाच्या ५२ व्या वर्षी निधन झाले.

 यादरम्यान लॉर्ड्स स्क्रीनवर वॉर्नच्या जीवनाची एक झलक दाखवण्यात आली, तर बोर्डवर लिहिले होते, 'शेन वॉर्न १९६९-२०२२.' वॉर्न हा श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरन (८०० बळी) नंतर कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ७०८ एवढे सर्वाधिक बळी घेणारा दुसरा गोलंदाज आहे. ऑस्ट्रेलियन फुटबॉलपटू डर्मॉट ब्रेरेटनच्या सन्मानार्थ तो २३ क्रमांकाची जर्सी घालायचा. 

राजस्थान रॉयल्सनेही केले होते स्मरण 

स्काय स्पोर्ट्सच्या एका अहवालामध्ये म्हटले आहे की, "यापूर्वी जेपी मॉर्गन मीडिया सेंटरमधील मुख्य कॉमेंट्री बॉक्सचे नाव मेरीलेबोन क्रिकेट क्लब आणि स्काय स्पोर्ट्स यांच्यातील भागीदारीमध्ये वॉर्नचे ठेवण्यात आले होते. असे स्कायच्या एका अहवालात म्हटले आहे. इंडियन प्रीमियर लीगची (IPL) फ्रँचायझी राजस्थान रॉयल्सनेही हा फोटो रिट्विट केला आहे, ज्यामध्ये लिहिले की, "२३व्या षटकात २३ सेकंद. हॅशटॅग वॉर्न." शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सने २००८ मध्ये आयपीएलचे पहिले विजेतेपद पटकावले होते. आयपीएलच्या फायनलच्या सामन्यात देखील राजस्थानच्या संघाने 'The First Royal' असा उल्लेख करत वॉर्नला स्मरण केले होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी