T-20 world cup : भारताचा दारूण पराभव, इंग्लंड फायनलमध्ये

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 10, 2022 | 17:04 IST | टाइम्स नाऊ मराठी

T20 World Cup: भारत वि इंग्लंड यांच्यातील सेमीफायनलमध्ये भारताचा मानहानीकारक पराभव झाला आहे.

india vs england
पांड्याची जबरदस्त खेळी, इंग्लंडला जिंकायला हव्यात 169 धावा 
थोडं पण कामाचं
  • भारत वि इंग्लंड दुसरी सेमीफायनल
  • भारताला हरवत इंग्लंडचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश
  • इंग्लंडचा भारतावर 10 विकेट राखत विजय

मुंबई: T20 World Cupच्या सेमीफायनलमध्ये(semifinal) इंग्लंडकडून(england beat india) भारताचा दारूण पराभव झाला. संपूर्ण T20 वर्ल्डकपमध्ये भारताने इतकी खराब कामगिरी केली नव्हती जितकी त्यांनी आजच्या सामन्यात केली. या संपूर्ण सेमीफायनलमध्ये इंग्लंडचे वर्चस्व पाहायला मिळाले. भारताने टॉस हरला आणि तिथेच त्यांचा आत्मविश्वास गेला. इंग्लंडने टॉस जिंकत भारताला पहिल्यांदा फलंदाजीस बोलावले. 15व्या ओव्हरपर्यंत कशाबशा 100 धावा करणाऱ्या भारताने पुढील पाच षटकात हार्दिक पांड्याच्या दमदार खेळीच्या जोरावर 168हा सन्मानजनक स्कोर केला. त्यानंतर आता भारताला जिंकवण्याची गोलंदाजांची वेळ होती. England beat india by 10 wickets in T-20 world cup 2022 semifinal

अधिक वाचा - रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते चविष्ट गुळाची चपाती

मात्र भारत गोलंदाजी करण्यास उतरल्यानंतर कोणाला वाटलेही नव्हते की ते इतकी खराब कामगिरी करतील. आव्हान गाठेपर्यंत भारताला इंग्लंडचा एकही विकेट मिळवण्यात यश मिळाले नाही. इंग्लंडचा सलामीवीर अॅलेक्स हेल्स आणि जोस बटलर या दोघांनी शेवटपर्यंत किल्ला लढवताना हे आव्हान सहज पूर्ण केले आणि भारतावर 10 विकेट राखत विजय मिळवला. या विजयासह त्यांनी वर्ल्डकपच्या फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे.  

तत्पूर्वी, भारत आणि इंग्लंड यांच्यातील टॉस इंग्लंड संघाने जिंकला आणि भारताला पहिल्यांदा फलंदाजीस बोलावले. मात्र भारताची सुरूवात खराब झाली. भारताचा सलामीवीर केएल राहुलला साजेशी कामगिरीच करता आली नाही. लोकेश राहुल केवळ 5 धावा करून बाद झाला. त्यानंतर कोहली मैदानात आला. कोहली आणि रोहित शर्मा दोघे मिळून चांगला स्कोर उभा करतील असे वाटत असतानाच रोहितची विकेट गेली. रोहितने 27 धावा केल्या. त्यानंतर आलेला सूर्यकुमार यादवही या सामन्यात चांगली खेळी करण्यात अपयशी ठरला. त्याने 10 बॉलमध्ये 14 धावांची खेळी केली. 

भारताचा सलामीवीर केएल राहुलला साजेशी कामगिरीच करता आली नाही. लोकेश राहुल केवळ 5 धावा करून बाद झाला. त्यानंतर कोहली मैदानात आला. कोहली आणि रोहित शर्मा दोघे मिळून चांगला स्कोर उभा करतील असे वाटत असतानाच रोहितची विकेट गेली. रोहितने 27 धावा केल्या. त्यानंतर आलेला सूर्यकुमार यादवही या सामन्यात चांगली खेळी करण्यात अपयशी ठरला. त्याने 10 बॉलमध्ये 14 धावांची खेळी केली. 

कोहली, हार्दिकची अर्धशतकी खेळी

विराट कोहली एका बाजूने नेटाने किल्ला लढवत होता. त्याला हार्दिक पांड्याने चांगली साथ देत स्कोर वाढवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, कोहलीने या सामन्यात 50 धावा केल्या आणि तो कॅच देत बाद झाला. त्याने 40 बॉलमध्ये 50 धावा ठोकल्या. शेवटच्या दोन ओव्हर राहिलेल्या असताना ऋषभ पंत खेळण्यासाठी उतरला.

रोहित शर्माने या सामन्यात दिनेश कार्तिकऐवजी ऋषभ पंतला संधी दिली. कोहली बाद झाल्यानंतर हार्दिकने किल्ला सांभाळण्यास सुरूवात केली. शेवटच्या तीन ओव्हरमध्ये हार्दिकने धमाकेदार फलंदाजी केली. चौकार आणि षटकार ठोकत संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून देण्यास मदत केली. त्याच्या जबरदस्त खेळीमुळेच भारताने 160 धावांचा टप्पा ओलांडला. वर्ल्डकपमधील दुसराच सामना खेळणाऱ्या पंतला या सामन्यात 6 धावा करता आल्या. दरम्यान, शेवटच्या ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर हार्दिक पांड्या बाद झाला. 

इंग्लंडकडून ख्रिस वोक्स, सॅम कुरन यांनी प्रत्येकी एक आणि ख्रिस जॉर्डन याने तीन विकेट घेतल्या. 

शेवटच्या पाच षटकांत जबरदस्त फटकेबाजी

भारताने 15 ओव्हरमध्ये आपल्या 100 धावा पूर्ण केल्या होत्या. त्यामुळे भारताचा संघ कितपत धावसंख्या गाठेल याबाबत साशंकताच होती. दरम्यान शेवटच्या काही षटकांमध्ये जबरदस्त फलंदाजी झाली. 15 ते 19 या चार ओव्हरमध्ये भारताने 56 धावा केल्या. 

अधिक वाचा - जुन्या टॉवलेचा वापर ‘या’ कामांसाठी करा

फायनलमध्ये पाकिस्तानविरुद्ध मुकाबला

इंग्लंड आणि भारत यांच्यातील विजेता इंग्लंड संघाचा मुकाबला टी20च्या वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान संघाशी मुकाबला रंगणार आहे. पाकिस्तानने याआधीच्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडला हरवत फायनलची फेरी गाठली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी