VIDEO:अॅशेस सामन्यादरम्यान प्रेम केले व्यक्त, इंग्लंडच्या मुलाने ऑस्ट्रेलियन मुलीला केले प्रपोज

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Dec 10, 2021 | 17:16 IST | टाइम्स नाऊ मराठी

मैदानावर लावण्यात आलेल्या या अनोख्या प्रपोजलला लाईव्ह दाखवण्यात आले. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. यावर युजर्स विविध पद्धतीने रिअॅक्शन देत आहेत. एका युझरने म्हटले की सामन्यादरम्यानचा चांगला प्रसंग. 

propose video
VIDEO: अॅशेस सामन्यादरम्यान प्रेम केले व्यक्त 
थोडं पण कामाचं
  • ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावादरम्यान मैदानाच्या बाहेर इंग्लंडच्या एका युवा क्रिकेटर चाहत्याने सर्वांचे मन जिंकले.
  • इंग्लंडचा प्रियकर आणि ऑस्ट्रेलियाची प्रेयसी
  • मोठ्या स्क्रीनवर प्रपोजल दाखवले लाईव्ह

ब्रिस्बेन:  इंग्लंड(england) आणि ऑस्ट्रेलिया(australia) यांच्यात गाबा येथे खेळवल्या जात असलेल्या पहिल्या अॅशेस कसोटीदरम्यान(ashes series) एक रोमँटिक घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावादरम्यान मैदानाच्या बाहेर इंग्लंडच्या एका युवा क्रिकेटर चाहत्याने सर्वांचे मन जिंकले सोशल मीडियावर(social media) शअर केलेल्या एका व्हिडिओत  मुलाने सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाच्या आपल्या प्रेयसीला प्रपोज केले. यावर मुलीने हो असे उत्तर दिले. england boy propose australia girl in ashes series

प्रपोजला स्वीकार करत मुलीने मुलाला मिठी मा.रली. यानंतर त्याने तिला रिंगही घातली. तेथील उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्या वाजवत दोघांना शुभेच्छा दिल्या. मुलीचे नाव नताली आणि मुलाचे नाव रॉब आहे. मैदानावर लावण्यात आलेल्या या अनोख्या प्रपोजलला लाईव्ह दाखवण्यात आले. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. यावर युजर्स विविध पद्धतीने रिअॅक्शन देत आहेत. एका युझरने म्हटले की सामन्यादरम्यानचा चांगला प्रसंग. 

सामन्यावर ऑस्ट्रेलियाची मजबूत पकड

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात अॅशेस मालिकेतील पहिला सामना ब्रिस्बेनमध्ये खेळवला जात आहे. शुक्रवारी सामन्याच्या तिसऱ्या ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ४२५ धावांवर संपला. ट्रेविस हेडने शानदार फलंदाजी करताना १४८ चेंडूत १५२ धावा केल्या. तर इंग्लंडला दुसऱ्या डावात २३ धावांवर पहिला धक्का बसला. पहिल्या डावात खाताही खोलू न शकलेला रोरी बर्न्स दुसऱ्या डावात १३ धावांवर बाद झाला. 

याआधी इंग्लंडने  पहिल्या डावात १४७ धावा केल्या होत्या. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ट्रेविस हेडचे शतक आणि डेविड वॉर्नर, मार्नस लाबुशेनच्या अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने सामन्यावरील आपली पकड मजबूत केली आहे.

अॅशेस सामन्यात बेन स्टोक्सच्या नोबॉलवरून गोंधळ

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी बेन स्टोक्सच्या नोबॉलने चांगलाच गोंधळ घातला. त्याची पहिली ओव्हर वादग्रस्त ठरली. स्टोक्सने आपल्या पहिल्याच ओव्हरमधील चौथ्या बॉलवर डेविड वॉर्नरला(david warner) क्लीन बोल्ड केले होते. मात्र टीव्ही रिप्लेमध्ये समोर आले की हा नोबॉल होता. वॉर्नरला अशा पद्धतीने १७ धावांवर जीवनदान मिळाले. मात्र वाद तेव्हा सुरू झाला जेव्हा रिप्लेमध्ये पाहिले की स्टोक्सच्य्या त्या ओव्हरमधील पहिले चार बॉलही नोबॉल होते. मात्र अंपायरने त्याच बॉलला नोबॉल दिले ज्यावर वॉर्नर बोल्ड झाला होता. आयसीसीच्या नियमानुसार टीव्ही अंपायरला बॉल नो बॉल आहे की नाही असे प्रत्येक बॉलवर लक्ष ठेवायचे असते. यासाठी नव्या तंत्राचाही वापर केला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी