मुंबई: कसोटी क्रिकेटमध्ये(test cricket) जे आतापर्यंत झाले नाही ते आता भारत(india) आणि इंग्लंड(england) यांच्यात होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यात होणार आहे. पहिल्यांदा कसोटी क्रिकेटमध्ये एक खेळाडू मैदानावर कॅमेरा(camera) घेऊन उतरणार. यामुळे चाहत्यांमध्ये खूप उत्साह आहे. england cricketer will wear sky camera in test match against india
अधिक वाचा - मणिपूरमध्ये जमीन खचल्यामुळे १४ मृत्यू
भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात जेव्हा इंग्लंडचा ओली पोप मैदानावर उतरणार आहे तेव्हा त्याच्या हेल्मेटमध्ये एक कॅमेरा असेल. फिल्डिंगदरम्यान तो हा कॅमेरा लावू शकतो. ओली पोपच्या हेल्मेटमध्ये लावलेला हा कॅमेरा सरळ ब्रॉडकास्टशी जोडलेला असेल ज्यामुळे प्रेक्षक मैदानावरील हालचाली एकदम सोप्या पद्धतीने पाहू शकतात. आयसीसी आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डाने यास मान्यता दिली आहे.
ओली पोपच्या हेल्मेटवर लावलेला हा कॅमेरा मैदानावरील आवाज रेकॉर्ड करू शकत नाही. दरम्ययान आवाजासाठी पहिल्यापासून स्टम्प माईकचा वापर केला जातो. आता मैदानावर कॅमेरा असल्याने प्रेक्षकांना नवा आणि अद्भुत रोमहर्षक सामना पाहायला मिळेल. या पद्धतीच्या प्रयोगांना कसोटी क्रिकेटमध्ये प्रोत्साहन दिले जाते.
स्काय स्पोर्ट्सने या पद्धतीचा प्रयोग द हंड्रे २०२१च्या सामन्यादरम्यान केला होता. या सामन्यात प्रेक्षकांना असे वाटले की ते एकदम जवळून सामना पाहत आहेत. भारत आणि इंग्लंड यांच्यातील या कसोटी सामन्याची प्रतीक्षा गेल्या एक वर्षांपासून केली जात आहे. रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाल्याने जसप्रीत बुमराहला या सामन्यात कर्णधार बनवण्यात आले आहे. तर उपकर्णधारपदाची जबाबदारी ऋषभ पंतकडे सोपवण्यात आली आहे.
अधिक वाचा - एकनाथ शिंदे करणार विठ्ठलाची महापूजा
अॅलेक्स लीस, जॅक क्राउली, ओली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्ट्रो, बेन स्टोक्स (कर्णधार), सॅम बिलिंग्स (विकेटकीपर), मॅथ्यू पोट्स, स्टुअर्ट ब्रॉड, जैक लीच आणि जेम्स अँडरसन.