IPL 2023 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणार 'हा' बॉलर

england pacer jofra archer is likely to play in ipl 2023 for mumbai indians : इंग्लंडचा स्टार पेसर (वेगवान गोलंदाज) जोफ्रा आर्चर याला मुंबई इंडियन्सने 8 कोटी रुपये मोजून खरेदी केले. पण दुखापतीमुळे तो 2022 मध्ये आयपीएल खेळू शकला नाही. यंदा परिस्थिती बदलली आहे.

england pacer jofra archer is likely to play in ipl 2023 for mumbai indians
IPL 2023 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणार 'हा' बॉलर  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • IPL 2023 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणार 'हा' बॉलर
  • दुखापतीमुळे तो 2022 मध्ये आयपीएल खेळू शकला नाही
  • परिस्थिती बदलली आहे

england pacer jofra archer is likely to play in ipl 2023 for mumbai indians : इंग्लंडचा स्टार पेसर (वेगवान गोलंदाज) जोफ्रा आर्चर याला मुंबई इंडियन्सने 8 कोटी रुपये मोजून खरेदी केले. पण दुखापतीमुळे तो 2022 मध्ये आयपीएल खेळू शकला नाही. यंदा परिस्थिती बदलली आहे. जोफ्रा आर्चर दुखापतीमधून वेगाने सावरत आहे. आयपीएल 2023 मध्ये इंग्लंडचा स्टार पेसर (वेगवान गोलंदाज) जोफ्रा आर्चर मुंबई इंडियन्सकडून खेळण्याची तयारी करत आहे. याआधी 27 वर्षांचा जोफ्रा आर्चर राजस्थान रॉयल्सकडून खेळत होता.

उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज असलेला जोफ्रा आर्चर 20 जुलै 2021 मध्ये शेवटची मॅच खेळला होता. दुखापतीमुळे मध्यंतरीच्या काळात तो कोणतीही क्रिकेट स्पर्धा खेळलेला नाही. दुखापतीतून सावरत असलेला जोफ्रा आर्चर पुन्हा गोलंदाजीचा सराव करू लागला आहे. तो आयपीएल 2023 पर्यंत खेळण्यासाठी सज्ज होईल. सध्या जोफ्रा आर्चर इंग्लंड लायन्स टीमसोबत यूएईमध्ये आहे. त्याची रिहॅब प्रोसेस सुरू आहे.

या दोन क्रिकेटर भावांनी भारताला जिंकून दिलाय वर्ल्डकप, गरिबीतून आले वर

IND vs NZ:भारत-न्यूझीलंड टी20 ट्रॉफी पाहून भडकले युजर्स...

बार्बाडोसमध्ये जन्मलेल्या जोफ्रा आर्चरने 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. इऑन मॉर्गनच्या नेतृत्वात 2019 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकलेल्या टीमचा सदस्य या नात्याने जोफ्रा आर्चरने विजयात मोठी कामगिरी बजावली होती. 

जोफ्रा आर्चरने 2018 मध्ये आयपीएल पदार्पण केले. त्याने आतापर्यंत 35 आयपीएल मॅच खेळून 46 विकेट घेतल्या आहेत. जोफ्रा आर्चर आणि जसप्रीत बुमराह या दोन वेगवान गोलंदाजांची कामगिरी बघण्यासाठी मुंबई इंडियन्सचे चाहते उत्सुक आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी