Ashes 2021: मेलबर्न कसोटीदरम्यान वाईट बातमी, या संघाचे ४ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Dec 27, 2021 | 16:20 IST | टाइम्स नाऊ मराठी

Ashes 2021: अॅशेस मालिकेवर कोरोनाचे ढग आले आहेत. मेलबर्न कसोटीतील दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्याधी इग्लंडच्या संघाचे चार सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यानंतर सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात आली. 

australi team ashes series
मेलबर्न कसोटीदरम्यान वाईट बातमी, ४ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह 
थोडं पण कामाचं
  • सामन्याबाबत बोलायचे झाल्यास दुसऱ्या दिवसाचा पहिला सेशन इंग्लंडच्या नावावर राहिला.
  • क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या चार जणांची नावे जाहीर केलेली नाहीत
  • इंग्लंडच्या खेम्यातील कोरोना अॅटॅकनंतर सर्व खेळाडूंची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली.

मुंबई: मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडमध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (Australia vs England)यांच्यातील अॅशेस मालिकेतील (Ashes Series) तिसरा सामना खेळवला जात आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ अर्धा तास उशिराने सुरू झाला. सामना सुरू होण्याआधी इंग्लंडच्या संघातील ४ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह (Covid-19) आढळले आहेत. यात दोन सपोर्ट स्टाफ आणि दोन खेळाडूंच्या कुटुंबातील व्यक्ती आहेत. England team 4 peoples found corona positive during melbourne test

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या चार जणांची नावे जाहीर केलेली नाहीत. इंग्लंडच्या खेम्यातील कोरोना अॅटॅकनंतर सर्व खेळाडूंची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. इतर खेळाडू निगेटिव्ह आढळल्यानंतर मैदानावर उतरले. कोरोनाचा कहर केवळ इंग्लंडच्याच संघावर नाही तर अॅशेस मालिकेचे प्रसारण चॅनेलच्या एका स्टाफलाही कोरोनाची लागण झाली आहे. 

सामन्याबाबत बोलायचे झाल्यास दुसऱ्या दिवसाचा पहिला सेशन इंग्लंडच्या नावावर राहिला. ऑस्ट्रेलियाच्या संघाने पहिल्या सत्रात ७० धावा केल्या. तर तीन विकेट बाद झाल्या. लंच ब्रेकपर्यंत ऑस्ट्रेलियाने चार बाद १३१ धावा केल्या आहेत. पहिल्या डावाच्या आधारावर कांगारू संघ इंग्लंडपेक्षा ५४ धावांनी मागे आहेत. दुसऱ्या दिवशी नाईट वॉचमन नॅथन लायन १, मार्नस लाबुशेन एक आणि स्टीव्ह स्मिथ १६ धावा करून बाद झाला. इंग्लडकडून जेम्स अँडरसनने दोन तर ओली रॉबिनसन आणि मार्क वूड यांनी एक एक विकेट घेतला. 

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात अॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी बेन स्टोक्सची पहिली ओव्हर चांगलीच वादग्रस्त ठरली. स्टोक्सने आपल्या पहिल्याच ओव्हरमधील चौथ्या बॉलवर डेविड वॉर्नरला क्लीन बोल्ड केले होते. मात्र टीव्ही रिप्लेमध्ये समोर आले की हा नोबॉल होता. वॉर्नरला अशा पद्धतीने १७ धावांवर जीवनदान मिळाले. मात्र वाद तेव्हा सुरू झाला जेव्हा रिप्लेमध्ये पाहिले की स्टोक्सच्य्या त्या ओव्हरमधील पहिले चार बॉलही नोबॉल होते. मात्र अंपायरने त्याच बॉलला नोबॉल दिले ज्यावर वॉर्नर बोल्ड झाला होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी