t20 world cup 2022: इंग्लंडने टी20 वर्ल्‍ड कप जिंकत बनवला नवा रेकॉर्ड

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 14, 2022 | 12:39 IST | टाइम्स नाऊ मराठी

England wins t20 world cup 2022 title: इंग्लंडने रविवारी टी20 वर्ल्‍ड कप खिताब जिंकत अनेक रेकॉर्ड्स तोडले. बेन स्टोक्सने शानदार अर्धशतक ठोकत इंग्लंडला खिताब जिंकून देण्यात मदत केली. 

england team
जगात कोणालाच जमले नाही ते इंग्लंड संघाने करून दाखवले 
थोडं पण कामाचं
  • इंग्लंडने पाकिस्तानला हरवत टी20 वर्ल्‍ड कप जिंकला
  • इंग्लंडने दुसऱ्या टी20 वर्ल्‍ड कप जिंकला
  • 50 ओवर आणि टी20 वर्ल्डकप एकाच वेळेस जिंकला

मेलबर्न: इंग्लंड (England Cricket team) ने रविवारी टी20 वर्ल्‍ड कप (T20 World Cup) च्या फायनलमध्ये पाकिस्‍तान (Pakistan Cricket team) ला 5 विकेटनी हरवत इतिहास रचला. इंग्लंड क्रिकेटच्या इतिहासात पहिला संघ बनला आहे ज्यांनी वनडे आणि  टी20 वर्ल्‍ड कप एकाच वेळेस जंकला. इंग्लंडने 2019 वनडे वर्ल्डकपमध्ये इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वात न्यूझीलंडला(New Zealand Cricket team) हरवत खिताब जिंकला होता. England team make history In cricket world

अधिक वाचा - रुक्ष त्वचेवर करा घरगुती उपाय

इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडमध्ये रोमहर्षक सामना खेळवण्यात आला. या सामन्यावर पावसाचे सावट होते.मात्र तसे झाले नाही आणि दोन्ही संघांमध्ये जोरदार सामना पाहायला मिळाला. पाकिस्तानने टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजी केली आणि 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावताना 137 धावा केल्या यानंतर पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांनी इंग्लंड फलंदाजांची परीक्षा घेतली. मात्र बेन स्टोक्सने नाबाद 52 धावांची खेळी करताना इंग्लंडला खिताब जिंकून दिला. 

इंग्लंडचा संघ वेस्ट इंडिजनंतर दुसरा संघ बनला आहे ज्यांनी दोन वेळा  टी20 वर्ल्‍ड कप जिंकला आहे. याआधी 2010मध्ये पॉल कॉलिंगवूडच्या नेतृत्वात इंग्लंड संघाने  टी20 वर्ल्‍ड कप जिंकला होता. केविन पीटरसन आणि क्रेग कीस्वीटरच्या मजबूत भागीदारीच्या जोरावर त्यांनी ऑस्ट्रेलियाला फायनलमध्ये हरवले होते त्यानंतर 2016मध्ये इंग्लंडचा संघ खिताबाच्या जवळ पोहोचला होता मात्र कार्लोस ब्राथवेटच्या अखेरच्या ओव्हररमधील सलग चार षटकारांमुे वेस्ट इंडिजला खिताब जिंकला आला होता. 

इंग्लंडसाठी फायनलमध्ये सॅम करनने जबरदस्त कामगिरी केली. त्याने 4 ओव्हरमध्ये 12 धावा देत 3 विकेट मिळवल्या. त्याच्या या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर सॅम करनला प्लेयर ऑफ दी मॅच निवडण्यात आले. स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करणाऱ्या सॅम करनला प्लेयर ऑफ दी टूर्नामेंट निवडण्यात आले.

अधिक वाचा - अब्दुल सत्तारांचं मोठं विधान,कृषिमंत्रीपद राहणार की जाणार?

मिळाले इतके बक्षीस

टी20 वर्ल्ड कपचा खिताब जिंकल्यानंतर इंग्लंडच्या संघावर पैशांचा पाऊस पडला. विजेता संघ इंग्लंडला बक्षीस म्हणून 16 लाख डॉलर  (12.88 कोटी रुपये) मिळाले. उपविजेता संघ पाकिस्तान संघाला चांगली रक्कम मिळाले. पाकिस्तानला रनर अप म्हणून  8 लाख डॉलर (6.44 कोटी रुपये )मिळाले.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी