ENG vs AFG World Cup: यजमान इंग्लंडचा १५० धावांनी दणदणीत विजय

World Cup 2019 Match 24, england vs afganistan: आज इंग्लंड आणि अफगाणिस्तान हे संघ आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप २०१९च्या २४व्या सामन्यात आमने-सामने खेळले. यात इंग्लंड संघाचा विजय झाला आहे.

england vs afganistan
इंग्लंड विरुद्ध अफगाणिस्तान 

मँचेस्टर: यजमान इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांच्या आयसीसी वर्ल्डकप २०१९मधी  २४वा सामना खेळवला गेला. इंग्लंड विरूद्ध अफगाणिस्तानमध्ये इंग्लंडनं विजयाची सलामी दिली आहे. इंग्लंडचा १५० धावांनी विजय झाला आहे. अफगाणिस्ताननं आठ विकेट्स गमावून पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंडनं दिलेलं ३९७ धावांचं आव्हान अफगाणिस्तान झेलू शकली नाही. 

पहिल्यांदा फलंदाजी कऱणाऱ्या इंग्लंंडच्या फलंदाजांनी अफगाणिस्तानच्या बॉलर्सची चांगलीच धुलाई केली. अफगाणिस्तानविरुद्ध इंग्लंडने तब्बल ५० षटकांत ३९७ धावा तडकावल्या. यात इयॉन मॉर्गनने सर्वाधिक १४८ धावांची खेळी केली. त्याला इतर फलंदाजांनाही जबरदस्त साथ दिली. इंग्लंडच्या ज्यो रूटने ८८ धावा केल्या. मॉर्गनने आपल्या खेळीमध्ये तब्बल १७ षटकार ठोकले. वनडेत त्याचा हा रेकॉर्ड ठरला. 

इंग्लंडच्या फलंदाजांनी अफगाणिस्तानच्या गोलंदाजांना धू-धू धुतले. इंग्लंडने ५० षटकांत तब्बल ३९७ धावा केल्या. इंग्लंडचा सलामीवीर जॉनी बेअरस्ट्रॉने ९० धावा केल्या. त्यानंतर तिसऱ्या स्थानावर आलेल्या ज्यो रूटने ८८ धावा केल्या. इयॉन मॉर्गनने मँचेस्टरच्या मैदानावर धावांचे वादळ निर्माण केले होते.  अफगाणिस्तानकडून दवलत झदरानने ३ विकेट घेतल्या तर गुलबदिनने तीन विकेट घेतल्या. बाकी फलंदाज सपशेल अपयशी ठरले. 

 

लाईव्ह कव्हरेज

अफगाणिस्तानचा डाव

 1. रशिद खान ८ धावांवर बाद
 2. अफगाणिस्तानला शेवटच्या ओव्हरमध्ये आठवा धक्का
 3. शेवटची ओव्हर सुरू, एका ओव्हरमध्ये १५२ धावांची गरज
 4. अफगाणिस्तानला सातवा धक्का,नजीबुल्लाह जादरान १५ धावांवर बाद
 5. अफगाणिस्तानला सहावा धक्का, हश्मतुल्ला शाहिदी ७६ धावांवर बाद
 6. अफगाणिस्तानला पाचवा धक्का, मोहम्मद नबी पाच धावांवर बाद
 7. अफगाणिस्तानच्या २०० धावा पूर्ण ( ४१.६षटक) 
 8. असगर अफगाण ४४ धावांवर बाद, अफगाणिस्तानला चौथा झटका (४१.५ षटक) 
 9. हश्मतुल्लाचे ६८ चेंडूत अर्धशतक पूर्ण,  लगावले ३ चौकार आणि २ षटकार
 10. चौथ्या विकेटसाठी ५० धावांची भागिदारी पूर्ण ( हश्मतुल्ला २७, असगर अफगाण २४) 
 11. अफगाणिस्तानच्या १५० धावा पूर्ण (३२.६षटक)
 12. रेहमत शहा ४६ धावा करून बाद झाला
 13. अफगाणिस्तानचे १०४ धावांत तीन गडी तंबूत परतले
 14. अफगाणिस्तानने ५२ धावांत दोन गडी गमावले
 15. अफगाणिस्तानचा गुलबदिन ३७ धावांवर बाद झाला
 16. इंग्लंडला दुसरे यश
 17. चार धावांवर अफगाणिस्तानला पहिला धक्का
 18. अफगाणिस्तानच्या डावाला सुरूवात

इंग्लंडचा डाव

 1. अफगाणिस्तानला या सामन्यात जिंकण्यासाठी ३९८ धावांची आवश्यकता आहे. 
 2. इंग्लंडने अफगाणिस्तानविरुद्ध ५० षटकांत ३९७ धावा केल्या आहेत. 
 3. मॉर्गन ७१ चेंडूत १४८ धावांची खेळी करून बाद
 4. ३५९ धावांवर इंग्लंडचा चौथा गडी बाद
 5. ज्यो रूट ८८ धावांवर बाद, ८० धावांत केल्या ८८ धावा
 6. इंग्लंडची ३५३ धावांवर तिसरी विकेट
 7. इंग्लंडच्या ४३.५ ओव्हरमध्ये ३०० धावा पूर्ण
 8. इयान मॉर्गनने ५७ चेंडूत तडाखेबंद शतक ठोकले
 9. मॉर्गनने ३७ चेंडूत ५४ धावा तडकावल्या
 10. ज्यो रूटमागोमाग इयान मॉर्गनने अर्धशतक झळकावले
 11. ज्यो रूट ५३ आणि मॉर्गन ३८ धावांवर खेळत आहे
 12. इंग्लंडने २०० धावांचा टप्पा पार केला आहे
 13. ज्यो रूटने ५४ धावांत केल्या ५० धावा
 14. ज्यो रूटचे अर्धशतक पूर्ण
 15. अफगाणिस्तानला दुसरे यश, १६४ धावांवर दोन गडी बाद
 16. जॉनी बेअरस्ट्रो ९० धावांवर बाद, ९९ चेंडूत काढल्या ९० धावा
 17. इंग्लंडचे धावांचे दीडशतक पूर्ण
 18. ज़ॉनी बेअरस्ट्रो ४८ आणि ज्यो रूट २५ धावांवर खेळत आहे. 
 19. १९.३ ओव्हरमध्ये एक गडी गमावत इंग्लंडचे धावांचे शतक पूर्ण
 20. इंग्लंडने ११.२ षटकांत केल्या ५२ धावा
 21. इंग्लंडचे अर्धशतक पूर्ण
 22. इंग्लंडचा सलामीवीर विन्स ३१ चेंडूत २६ धावा करून झाला बाद
 23. ९.३ ओव्हरमध्ये ४४ धावांत इंग्लंडने पहिली विकेट गमावली
 24. इंग्लंडने टॉस जिंकत घेतला बॅटिंगचा निर्णय
 25. थोड्याच वेळात होणार टॉस...राहा आमच्यासोबत अपडेट
 26. आज वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड ही लढत

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
ENG vs AFG World Cup: यजमान इंग्लंडचा १५० धावांनी दणदणीत विजय Description: World Cup 2019 Match 24, england vs afganistan: आज इंग्लंड आणि अफगाणिस्तान हे संघ आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप २०१९च्या २४व्या सामन्यात आमने-सामने खेळले. यात इंग्लंड संघाचा विजय झाला आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola