ENG vs AUS Ashes Series : उस्मान ख्वाजाची दोन्ही डावात शतकीय खेळी; नव्या विक्रमाला घातली गवसणी

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jan 08, 2022 | 18:25 IST | टाइम्स नाऊ मराठी

Usman Khwaja | सध्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामधील लोकप्रिय ॲशेस मालिकेचा थरार सुरू आहे. सुरूवातीच्या तिन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर इग्लिंश संघ यजमान कांगारूसोबत आपल्या अस्तित्वाची लढाई लढत आहे. दरम्यान कांगारूच्या संघाचा फलंदाज उस्मान ख्वाजाचे ऑस्ट्रेलियाच्या संघातील पुनरागमन एखाद्या कथेप्रमाणे आहे. तब्बल तीन वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर ख्वाजाचे कागांरूच्या आंतरराष्ट्रीय संघात पुनरागमन झाले.

England vs Australia Ashes Series Usman Khwaja set a new record by scoring a century in both innings
उस्मान ख्वाजाने दोन्ही डावात शतकी खेळी करत केला नवा विक्रम   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सध्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामधील लोकप्रिय ॲशेस मालिकेचा थरार सुरू आहे.
  • तब्बल तीन वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर ख्वाजाचे कागांरूच्या आंतरराष्ट्रीय संघात पुनरागमन झाले.
  • ख्वाजाने पहिल्या डावात १३७ तर दुसऱ्या डावात नाबाद १०१ धावांची शानदार खेळी केली. लक्षणीय बाब म्हणजे ख्वाजाच्या शतकीय खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियन संघाने आपला दुसरा डाव ६ बाद २६५ धावांवर घोषित केला आणि इंग्लंडला विजयासाठी ३३८ धावांचे विशाल लक्ष्य दिले.

Usman Khawaja scored twin centuries | सिडनी : सध्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामधील लोकप्रिय ॲशेस मालिकेचा थरार सुरू आहे. (England vs Australia Ashes Series) सुरूवातीच्या तिन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर इग्लिंश संघ यजमान कांगारूसोबत आपल्या अस्तित्वाची लढाई लढत आहे. दरम्यान कांगारूच्या संघाचा फलंदाज उस्मान ख्वाजाचे (Usman Khawaja) ऑस्ट्रेलियाच्या संघातील पुनरागमन एखाद्या कथेप्रमाणे आहे. तब्बल तीन वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर ख्वाजाचे कागांरूच्या आंतरराष्ट्रीय संघात पुनरागमन झाले. दरम्यान उस्मान ख्वाजाचे मोठ्या कालावधीनंतरचे संघातील पुनरागमन एका अविस्मरणीय खेळीने झाले आहे. ख्वाजाने सिडनी क्रिकेट ग्राउंडवरील कसोटी सामन्यातील दोन्ही डावात शतकीय खेळी करून नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. ख्वाजाने पहिल्या डावात १३७ तर दुसऱ्या डावात नाबाद १०१ धावांची शानदार खेळी केली. लक्षणीय बाब म्हणजे ख्वाजाच्या शतकीय खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियन संघाने आपला दुसरा डाव ६ बाद २६५ धावांवर घोषित केला आणि इंग्लंडला विजयासाठी ३३८ धावांचे विशाल लक्ष्य दिले. (England vs Australia Ashes Series Usman Khwaja set a new record by scoring a century in both innings).  

ख्वाजाने शतकी खेळी करत केले नवे विक्रम

१. उस्मान ख्वाजा २०१९ मध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) नंतर पहिला फलंदाज बनला आहे, ज्याने सामन्याच्या दोन्ही डावात शतक झळकावले आहे.  

२. १९५० पासून ॲशेस मालिकेत दोन्ही डावात शतक करणारा उस्मान ख्वाजा चौथा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी स्टीव्ह वॉ (१९९७ मॅनचेस्टर), मॅथ्यू हेडन (२००२ ब्रिस्बेन), स्टीव्ह स्मिथ (२०१९ बर्मिंघम) यांनी हा विक्रम केला आहे. 

३. ॲशेस मालिकेतील दोन्ही डावात शतके झळकावणारा उस्मान ख्वाजा हा  ९ वा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी वॉरेन बार्डस्ले (ऑस्ट्रेलिया), हर्बर्ट सटक्लिफ (इंग्लंड), वॉली हॅमंड (इंग्लंड), डेनिस कॉम्प्टन (इंग्लंड), आर्थर मॉरिस (ऑस्ट्रेलिया), स्टीव्ह वॉ (ऑस्ट्रेलिया), मॅथ्यू हेडन (ऑस्ट्रेलिया), स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया) आणि उस्मान ख्वाजा (ऑस्ट्रेलिया) यांनी हा विक्रम केला आहे. 

४. उस्मान ख्वाजा ॲशेसमधील कसोटी सामन्यात पाचव्या क्रमांकावर येऊन दोन्ही डावात शतके झळकावणारा तिसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी डेनिस कॉम्प्टन (१९४७, इंग्लंड) आणि स्टीव्ह वॉ (१९९७, ऑस्ट्रेलिया) यांनी हा इतिहास रचला होता. 

५. तर, उस्मान ख्वाजा पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन दोन्ही डावात शतके झळकावणारा जगातील १० वा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी डेनिस कॉम्प्टन (१९४७), डग वॉल्टर्स (१९६९), ॲलन बॉर्डर (१९८०), स्टीव्ह वॉ (१९९७), अँडी फ्लॉवर (२००१), इंझमाम-उल-हक (२००५), तिलकरत्ने दिलशान (२००९), मिसबाह-उल- हक (२०१४) ), अजिंक्य रहाणे (२०१५) आणि उस्मान ख्वाजा (२०२२)* यांनी असे केले होते.

६. उस्मान ख्वाजा हा इंग्लंडविरुद्ध पाचव्या किंवा खालच्या क्रमाने दोन्ही डावात शतके करणारा तिसरा फलंदाज ठरला. यापूर्वी स्टीव्ह वॉ (१९९७) आणि इंझमाम-उल-हक (२००५) यांनी हा कारनामा केला होता.

७. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर दोन्ही डावात शतके झळकावणारा उस्मान ख्वाजा तिसरा फलंदाज ठरला आहे. याआधी डग वॉल्टर्सने १९६९ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध २४२ आणि १०३ अशा धावा केल्या होत्या. त्यानंतर रिकी पाँटिंगने २००६ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १२० आणि १४३* धावा केल्या होत्या. तर आता उस्मान ख्वाजाने २०२२ मध्ये इंग्लंडविरुद्ध १३७ आणि १०१* अशा धावा केल्या होत्या.

८. ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर शेवटचे दोन फलंदाज ज्यांनी दोन्ही डावात शतके झळकावली आहेत. यामध्ये आहेत विराट कोहली ११५ आणि १४१* आणि उस्मान ख्वाजा १३७* आणि १०१ धावा यांच्या खेळींचा समावेश आहे. 

९. उस्मान ख्वाजाचे वय ३५ पेक्षा जास्त आहे आणि या वयात दोन्ही डावात शतक झळकावणारा डॉन ब्रॅडमननंतरचा तो दुसरा ऑस्ट्रेलियन खेळाडू बनला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी