ENG vs AUS, 2nd Semi Final, World Cup 2019: इंग्लंडचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय

क्रिकेट वर्ल्ड कप २०१९
Updated Jul 11, 2019 | 23:25 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

World Cup 2019, 2nd Semi Final, England vs Australia: गुरूवारी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्डकप २०१९मध्ये दुसऱ्या सेमीफायनलचा सामना खेळला गेला. इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

aus vs nz
ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड 

बर्मिंग्हम: यजमान इंग्लंडनं आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप २०१९च्या फायनलमध्ये धडक मारली आहे. इंग्लंडनं गुरूवारी झालेल्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा ८ विकेट्सनी दारूण पराभव केला. इंग्लंडची टीम तब्बल २८ वर्षांनंतर फायनलमध्ये सामील झाली आहे.  यजमान इंग्लंडला येत्या १४ जुलैला रविवारी होणाऱ्या वर्ल्ड कप २०१९ मध्ये न्यूझीलंडचा सामना करावा लागणार आहे.  बुधवारी टीम न्यूझीलंडनं भारताला पराभूत करत पहिल्या सेमीफायनमधून फायनलमध्ये धडक मारली. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाची टीम यावेळी फायनलमध्ये जाण्यापासून हुकली आहे. याआधी वर्ल्ड कपच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाची टीम आठ वेळा फायनलमध्ये पोहोचली होती. तर  टीम इंग्लंड १९७९, १९८७ आणि १९९२ मध्ये फायनलपर्यंत पोहोचण्यास यशस्वी झाली होती. पण वर्ल्ड कप जिकण्याचं त्यांच स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्या वर्ल्ड कपचा फायनल सामना खेळला जाणार आहे. याआधी या दोन्ही टीम वर्ल्ड कप जिंकू शकल्या नाहीत.  इंग्लंड आणि न्यूझीलंड फायनलमध्ये पोहोचल्यानं वनडे क्रिकेटला एक नवा विश्व विजेता मिळणार हे नक्की. 

पहिल्यांदा बँटिंगला उतरलेल्या ऑस्ट्रेलिया टीमची सुरूवात निराशाजनक झाली. इंग्लंडच्या भेदक बॉलिंगसमोर ऑस्ट्रेलियाचे बॅट्समन जास्त काळ टिकू शकले नाही. ४९ ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाचे सर्व खेळाडू २२३ रन्सवर आऊट झाले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या २२४ रन्सच्या आव्हानाला पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंडनं अवघ्या ३२.१ ओव्हरमध्ये ८ खेळाडू राखत २२४ रन्स केले. यावेळी जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्ट्रोने १२४ रन्सची जबरदस्त भागेदारी केली. जेसन रॉयने ६५ बॉल्समध्ये ५ सिक्स, ९ फोर मारत ८५ रन्स केले. जॉनी बेअरस्ट्रोनं ४३ बॉल्समध्ये ५ फोर मारत ३४ रन्स केले. तसंच जो रूट्सनं ४६ बॉल्समध्ये ८ फोर मारत नाबाद ४९ रन्स केले. ईयॉन मॉर्गननं ३९ बॉल्समध्ये ४५ रन्स केल्या.

यजमान इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप २०१९मधील दुसरा सेमीफायनल सामना खेळला गेला. दोन्ही टीम बर्मिंग्हमच्या अॅजबेस्टन स्टेडियममध्ये आमनेसामने आले होते. यावेळी पहिल्यांदा बॅटिंगला उतरलेल्या ऑस्ट्रेलिया टीमचे ४९ ओव्हरमध्ये २२३ रन्सवर सर्व खेळाडू आऊट झाले. आता इंग्लंडसमोर २२४ रन्सचं आव्हान ठेवल होतं. 
कांगारू टीमसाठी स्टीव्ह स्मिथनं सर्वाधिक रन्स केल्या. त्याने ११९ बॉलमध्ये ६ सिक्स मारत ८५ रन्स जोरदार बॅटिंग केली. तर अॅलेक्स कॅरीने ७० बॉलमध्ये ४ फोर ठोकत ४६ रन्स, मिचेल स्टार्कने ३६ बॉलमध्ये २९ रन्स, ग्लेन मॅक्सवेलने २३ बॉलमध्ये २२ रन्स, डेविड वॉर्नरने ११ बॉलमध्ये ९ रन्स, पॅट कमिन्सने १० बॉलमध्ये ६ रन्स पीटर हॅड्सकॉम्बने १२ बॉलमध्ये ४ रन्स, जेसन बेहरनडॉर्फने १ रन केले. कॅप्टन अॅरॉन फिंच आणि मार्कस स्टोईनिस यांना आज शुन्यावरच पॅव्हेलियनमध्ये परतावं लागलं.

दुसरीकडे इंग्लंडच्या बॉलर्संनी आज उत्कृष्ट प्रदर्शन करत ऑस्ट्रेलियाच्या सर्व खेळाडूंना अवघ्या २२३ रन्सवर तंबूत धाडलं. यावेळी क्रिस वॉक्सने ८ ओव्हरमध्ये २० रन्स देत ३ बळी घेतले. तसेच आदिल रशिदने १० ओव्हरमध्ये ५४ रन्स देत ३ विकेट्स घेतल्या. जोफ्रा आर्चरने १० ओव्हरमध्ये २ विकेट आणि मार्क वूडने १ विकेट घेतल्या.

इंग्लंड गेल्या वर्ल्डकपमध्ये पहिल्याच फेरीत बाहेर पडला होता. इंग्लंडचा संघ १९७९, १९८७ आणि १९९२मध्ये फायनलपर्यंत पोहोचला आहे. मात्र अद्याप त्याला एकदाही वर्ल्डकप डिंकता आलेला नाही. इंग्लंडने यंदाच्या वर्ल्डकपमधील साखळी सामन्यात नऊपैकी सहा सामन्यांत विजय मिळवला तर तीन सामन्यांत त्यांना पराभव स्वीकारावा लागला. इंग्लंडचा संघ पॉईट्सटेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंडच्या संघाला साखळीमध्ये ऑस्ट्रेलियाकडून ६४ धावांचा सामना करावा लागला होता.  

 

 

लाईव्ह कव्हरेज

इंग्लंडचा डाव

 1. इंग्लंडचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय  

 2. इंग्लंडचे ३० ओव्हरमध्ये २०९ रन्स पूर्ण

 3. इंग्लंडला विजयासाठी २२ ओव्हरमध्ये २७ रन्सची गरज

 4. इंग्लंडची धावसंख्या: २२ ओव्हर १५३ धावा; दोन विकेट

 5. इंग्लंडला दुसरा धक्का जेसन रॉय बाद पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर एलेक्स कॅरीने घेतला कॅच

 6. इंग्लंडला पहिला धक्का मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर जॉनी बेअरस्ट्रो एलबीडब्ल्यू 

 7. इंग्लंडचे शतक: १५.३ ओव्हरमध्ये १०१ रन्स पूर्ण 

 8. जेसन रॉयचे अर्धशतक पूर्ण ५१ बॉलमध्ये ५० रन्स

 9. इंग्लंडची धावसंख्या: १० ओव्हर ५० धावा; एकही विकेट नाही

 10. इंग्लंडची धावसंख्या: ५ ओव्हर २० धावा; एकही विकेट नाही

 11. इंग्लंडसमोर विजयासाठी २२४ रन्सचे आव्हान

 12. इंग्लंडचा डाव सुरू

ऑस्ट्रेलियाचा डाव

 1. ऑस्ट्रेलियाचे इंग्लंडला २२४ धावांचे आव्हान
 2. ऑस्ट्रेलियाचे ४९ ओव्हरमध्ये सर्व गडी बाद
 3. ऑस्ट्रेलियाला दहावा धक्का, मार्क वुडच्या गोलंदाजीवर जेसन बेहरनडार्फ बाद
 4. ऑस्ट्रेलियाला नववा धक्का, मिचेल स्टार्क बाद. क्रिस वॉक्सच्या गोलंदाजीवर जोस बटलरने घेतला कॅच
 5. ऑस्ट्रेलियाला आठवा धक्का, स्टीव स्मिथ रनआऊट
 6. ऑस्ट्रेलियाचे द्विशतक पूर्ण ४४.३ ओव्हरमध्ये २०० धावा पूर्ण
 7. ऑस्ट्रेलियाचा सातवा गडी बाद, पॅट कमिन्स बाद. आदिल राशिदच्या गोलंदाजीवर जो रूटने घेतला कॅच
 8. ऑस्ट्रेलियाचा सहावा गडी बाद, ग्लेन मैक्सवेल बाद. जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर इयॉन मॉर्गनने घेतला कॅच
 9. ऑस्ट्रेलियाची धावसंख्या: ३३.४ ओव्हर १५० धावा; ५ गडी बाद
 10. स्टीव स्मिथचे अर्धशतक 
 11. मार्कस स्टोइनिस २ धावा करत पॅवेलियनला परत
 12. ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का एलेक्स कॅरी बाद. आदिल राशिदच्या गोलंदाजीवर जेम्स विंसने घेतला कॅच
 13. ऑस्ट्रेलियाचे शतक पूर्ण २४.२ ओव्हरमध्ये १०० धावा पूर्ण
 14. ऑस्ट्रेलियाची धावसंख्या: २० ओव्हर ७८ धावा; ३ गडी बाद
 15. ऑस्ट्रेलियाचे अर्धशतक, १५.१ ओव्हरमध्ये ५१ धावा पूर्ण
 16. ऑस्ट्रेलियाची धावसंख्या: १५ ओव्हर ४७ धावा; ३ गडी बाद
 17. ऑस्ट्रेलियाची धावसंख्या: १० ओव्हर २७ धावा; ३ गडी बाद
 18. ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का, क्रिस वॉक्सच्या गोलंदाजीवर पीटर हँड्सकॉम्ब ४ धावांवर बा.
 19. डेविड वॉर्नर ९ धावा करून तंबूत
 20. दुसऱ्या ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाला झटका
 21. सलामीवीर आरोन फिंच शून्यावर बाद
 22. ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर ऑस्ट्रेलियाला धक्का
 23. ऑस्ट्रेलियाच्या बॅटिंगला सुरूवात
 24. ऑस्ट्रेलियाचा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय 
 25. आज ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड सेमीफायनल

 

इंग्लंड: इयॉन मॉर्गन (कर्णधार), जॉनी बेअरस्ट्रो (विकेटकीपर), जोस बटलर, मोइन अली, जोफ्रा आर्चर, टॉम कुरेन, लियाम डॉसन, लियम प्लंकेट, आदिल राशिद, जो रूट, बेन स्टोक्स, जेम्स विंस, क्रिस वॉक्स आणि मार्क वुड

ऑस्ट्रेलिया: आरोन फिंच (कर्णधार), डेविड वॉर्नर, मार्कस स्टोइनिस, जेसन बेहरनडार्फ, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), नॉथन कोल्टर नाइल, पॅट कमिन्स, मॅथ्यू वेड, नाथन लॉयन, पीटर हँड्सकॉम्ब, ग्लेन मैक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव स्मिथ, मिचेल स्टार्क आणि एडम जम्पा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
ENG vs AUS, 2nd Semi Final, World Cup 2019: इंग्लंडचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय Description: World Cup 2019, 2nd Semi Final, England vs Australia: गुरूवारी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्डकप २०१९मध्ये दुसऱ्या सेमीफायनलचा सामना खेळला गेला. इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola