India vs England: भारताविरुद्द सेमीफायनलआधी इंग्लंडला डबल झटका

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 09, 2022 | 10:54 IST | टाइम्स नाऊ मराठी

T20 World Cup 2022: टी20 वर्ल्डकप 2022मध्ये टीम इंडियाचा सेमीफायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध सामना रंगणार आहे. हा सामना उद्या अॅडलेडच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. मात्र त्याआधी इंग्लंड संघाला दुसरा झटका बसला आहे. 

england team
T20 World Cup: भारताविरुद्द सेमीफायनलआधी इंग्लंडला डबल झटका 
थोडं पण कामाचं
  • इंग्लंड संघाचा स्टार फलंदाज डेविड मलाननंतर आता वेगवान गोलंदाज मार्क वूडही दुखापतग्रस्त झाला आहे.
  • मंगळवारी इंग्लंड संघाने आपले ऑप्शनल प्रॅक्टिस सेशन केले होते.
  • या दरम्यान मार्क वूडला दुखापत झाली

मुंबई: ऑस्ट्रेलियामध्ये(australia) खेळवल्या जात असलेल्या टी20 वर्ल्ड कप 2022च्या(t-20 world cup 2022) दुसऱ्या सेमीफायनलमध्ये(semifinal) टीम इंडिया(team india) आणि इंग्लंड(england) आमनेसामने असणार आहेत. हा सामना उद्या 10 नोव्हेंबरला अॅडलेडच्या(adleide) मैदानावर खेळवला जाईल. मात्र त्याआधी इंग्लंड संघाला दुसरा मोठा झटका बसला आहे. England's two player injured bebfore semifinal match against india 

अधिक वाचा - कसा जाईल बुधवारचा दिवस ?

खरंतर, इंग्लंड संघाचा स्टार फलंदाज डेविड मलाननंतर आता वेगवान गोलंदाज मार्क वूडही दुखापतग्रस्त झाला आहे. अशातच ते सेमीफायनलच्या सामन्यात भारताविरुद्ध खेळतील की नाही याबाबत साशंकता आहे. मात्र रिपोर्ट्सनुसार मार्क वूडचे खेळणे कठीण मानले जात आहे. जर असे झाले तर त्याच्या जागी टायमल मिल्सला संधी मिळू शकते. 

आजारी आहे इंग्लंडचा गोलंदाज मार्क वूड

मंगळवारी इंग्लंड संघाने आपले ऑप्शनल प्रॅक्टिस सेशन केले होते. या दरम्यान मार्क वूडला दुखापत झाली. तर इंग्लंड टीम मॅनेजमेंटने मार्क वूड थोडा आजारी असल्याचे शिक्कामोर्तब केले. लवकरच तो बरा होईल अशी अपेक्षा आहे. मार्क वूडने नुकतेच दुखापतीनंतर पुनरागमन केले होते. त्याला कोपऱ्याला दुखापत झाली होती. अशातच त्याचे हे दुखणे पुन्हा वर आले आहे. 

इंग्लंड संघासाठी मार्क वूड आणि मलान दुखापतग्रस्त होणे हा मोठा झटका आहे. या वर्ल्डकपमध्ये मार्क वूडने 4 सामन्यात 9 विकेट मिळवल्या आहेत. त्याने या हंगामात सातत्याने 90 mphच्या वेगाने गोलंदाजी केली आहे. याशिवाय मलानने या हंगामात चार सामने खेळले असून त्यात 56धावा केल्या आहेत. रिपोर्ट्सनुसार मलानच्या जागी फिल साल्टला संधी दिली जाऊ शकते. 

टी20 वर्ल्ड कपसाठी भारत-इंग्लंड संपूर्ण संघ

भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उप-कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी.

स्टँडबाय खेळाडू: श्रेयस अय्यर, रवि बिश्नोई, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर.

अधिक वाचा - Weight Loss: लिंबूच नाही तर लिंबाची साल देखील करते वजन कमी

इंग्लंड संघ: जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, अॅलेक्स हेल्स, हॅरी ब्रुक, सॅम करन, क्रिस जॉर्डन, लियाम लिविंगस्टोन, डेविड मलान, आदिल राशिद, फिल साल्ट, बेन स्टोक्स, टायमल मिल्स, डेविड विली, क्रिस वोक्स आणि मार्क वूड.

रिजर्व प्लेयर: लियाम डॉसन और रिचर्ड ग्लीसन.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी