[VIDEO] भारतीय क्रिकेटर्सला मारण्यासाठी बॅट घेऊन आला होता हा बांग्लादेशी खेळाडू, आयसीसी करणार कारवाई 

अंडर १९ वर्ल्ड कपच्या फायनल (Under 19 Cricket World Cup Final) मध्ये भारतीय टीम (Indian Team) ला तीन विकेटने पराभूत बांग्लादेश (Bangladesh) च्या खेळाडूंनी मॅचनंतर खिलाडूवृत्तीला गालबोट लावले आहे

everybody was in a shock icc to take bangladeshs behaviour very seriously strict action expected viral video cricket news in marathi tspo 1
[VIDEO] भारतीय क्रिकेटर्सला मारण्यासाठी बॅट घेऊन आला होता हा बांग्लादेशी खेळाडू, आयसीसी करणार कारवाई   |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • बांग्लादेश (Bangladesh) च्या खेळाडूंनी मॅचनंतर खिलाडूवृत्तीला गालबोट लावले
  • बांग्लादेशी खेळाडूंनी केवळ भारतीय क्रिकेटर्सला धक्काबुक्कीच केली नाही तर त्यांना शिव्याही दिल्या.
  • इतकेच नाही तर बॅट आणि स्टंप घेऊन भारतीय खेळाडूंच्या अंगावर धावून आल्याचा प्रकारही घडला.

नवी दिल्ली :  क्रिकेटला (cricket) जंटलमन्स गेम म्हणतात. क्रिकेटच्या मैदानावरील खिलाडूवृत्तीचे आपण नेहमी उदाहरण देत असतो. पण अंडर १९ वर्ल्ड कपच्या फायनल (Under 19 Cricket World Cup Final) मध्ये भारतीय टीम (Indian Team) ला तीन विकेटने पराभूत केल्यानंतर पहिल्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बनणाऱ्या बांग्लादेश (Bangladesh) च्या खेळाडूंनी मॅचनंतर खिलाडूवृत्तीला गालबोट लावले आहे. बांग्लादेशी खेळाडूंनी केवळ भारतीय क्रिकेटर्सला धक्काबुक्कीच केली नाही तर त्यांना शिव्याही दिल्या. इतकेच नाही तर बॅट आणि स्टंप घेऊन भारतीय खेळाडूंच्या अंगावर धावून आल्याचा प्रकारही घडला. हा सर्व प्रकार मैदानाच्या मध्यभागी अंपारर्स समोर घटला. 

 

असे घडले मॅचनंतर 

जसे बांग्लादेशने (Bangladesh) विजय मिळविला. सर्व खेळाडू जल्लोष करण्यासाठी पिचवर पळत आले. त्यानंतर काही बांग्लादेशी खेळाडूंनी भारतीय खेळाडूंवर आपत्तीजनक कमेंट केली. भारतीय खेळाडूंनी त्यावर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर बांग्लादेशी खेळाडू अजूनच आक्रमक झाले. यानंतर मैदानात खंभीर स्थिती निर्माण झाली होती. बांग्लादेशी खेळाडू भारतीय खेळाडूंना धक्काबुक्की करू लागले. त्यांना शिव्याही दिल्या. इतके नाही तर काही खेळाडूंनी स्टंप आणि बॅट भारतीय खेळाडूंवर उगारले. या दरम्यान भारतीय संघाचे कोच पारस म्हाब्रे यांनी भारतीय खेळाडूंना शांत केले. 

भारतीय कॅप्टन प्रियम गर्ग म्हणाला, वागणूक अत्यंत वाईट होती

भारतीय क्रिकेट कर्णधार प्रियम गर्ग आम्ही नॉर्मल होतो. आम्हांला वाटते की जय-पराजय हा खेळाचा भाग आहे. अनेक वेळा तुम्ही जिंकतात तर अनेकवेळा तुम्हांला पराभवाचं तोंड पाहावं लागत. पण बांग्लादेशी खेळाडूंची वागणूक अत्यंत वाईट होती, मला वाटतं त्यांनी असं करायला नको होतं. 

मॅच दरम्यान काही बांग्लादेशी खेळाडू काही जास्तच आक्रमक होते. प्रत्येक चेंडूनंतर ते फलंदाजाला काही ना काही बोलत होते. बांग्लादेश विजयाच्या जवळ आल्यावरही त्यांचे काही खेळाडू कॅमेऱ्यासमोर टिपण्णी करताना दिसले. 

बांग्लादेशी कर्णधार अकबर अली म्हणाला मी माफी मागतो 

दुसरीकडे बांग्लादेशी कर्णधार अकबर अली यांनी सांगितले की आमचे काही गोलंदाज खूप भावूक झाले होते आणि ते उत्साहात होते. मॅचनंतर जे काही झाले ते दुर्देवी होते. असे नाही व्हायला पाहिजे होते. माझ्या संघाच्या खेळाडूंकडून चूक झाली आहे. त्याची मी माफी मागतो. असे कोणत्याही स्तरावर नाही व्हायला पाहिजे. मी भारताला शुभकामना देतो. 

भारतीय टीम मॅनजर म्हणाले, आयसीसी कठोर कारवाई करणार 

या बाबत भारतीय टीम मॅनेजर (Indian Team Manager) अनिल पटेल  (Anil Patel)  यांनी सांगितल की, आम्हांला घटनेची स्पष्ट स्वरूप माहिती नाही. आयसीसी ने टीम मॅनेजमेंटला सांगितले की मॅच रेफरी मॅचनंतरचे फूटेज पाहून सांगणार आहे की वास्तवात काय झाले होते. त्यांनी सांगितले की भारतीय टीम मॅनेजमेंट मॅच अधिकाऱ्यांशी बोलू इच्छित आहे. पण मॅच रेफरी स्वतः आमच्याकडे आले आणि घटनेची माफी मागितली. आयसीसीने या मुद्द्याला खूप गंभीरपणे घेतले आणि आणि त्यांच्यावर कारवाई करणार आहे. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी