IPL Fake matches: या राज्यात सुरू होत्या आयपीएलच्या खोट्या मॅचेस, रशियाशी संबंध

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jul 11, 2022 | 14:07 IST | टाइम्स नाऊ मराठी

गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्याच्या वडनगरमध्ये एका खोट्या आयपीएलचा खुलासा झाला आहे. येथे रशियाच्या लोकांना सट्टेबाजीच्या जाळ्यात अडकवले जात होते. 

cricket
या राज्यात सुरू होत्या IPLच्या खोट्या मॅचेस, रशियाशी संबंध 
थोडं पण कामाचं
  • गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्याच्या वडगरमध्ये सुरू असलेल्या खोट्या आयपीएलमध्ये रशियाच्या लोकांना सट्टेबाजीच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न सुरू होता.
  • आता पोलिसांनी याचा खुलासा केला असून ४ लोकांना या प्रकरणी अटक केली आहे. 
  • या खोट्या क्रिकेट लीगचे आयोजन करण्यासाठी शेत भाड्याने घेण्यात आले होते

मुंबई: तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर आयपीएलसारख्या(ipl) क्रिकेट सामन्यांवर(cricket matches) सट्टेबाजीच्या घटना पाहिल्या अथवा ऐकल्या असतील. मात्र आता गुजरातमध्ये(gujrat) अशाच एका खोट्या आयपीएलचा पर्दाफाश झाला आहे. येथे खोटी आयपीएल(fake ipl) खेळवली जात होती. गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्याच्या वडगरमध्ये सुरू असलेल्या खोट्या आयपीएलमध्ये रशियाच्या लोकांना सट्टेबाजीच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न सुरू होता. आता पोलिसांनी याचा खुलासा केला असून ४ लोकांना या प्रकरणी अटक केली आहे. Fake IPL matches played in gujrat, 4 arrested

अधिक वाचा - भरत गोगावलेंच्या गाडीचा अपघात, आठ गाड्या एकमेकांवर आदळल्या

मजुरांना ४०० रूपये देऊन खेळवली मॅच

या खोट्या क्रिकेट लीगचे आयोजन करण्यासाठी शेत भाड्याने घेण्यात आले होते आणि सामने खेळण्यासाठी मजुरांना प्रति सामना ४०० रूपये देण्यात आले. सामन्यादरम्यान मजुरांना जर्सी घालून मैदानावर उतरण्यात आले आणि खोटे अंपायर ठेवण्यात आले होते. हे अंपायर खोटे सामने खेळवत. सामन्यादरम्यान मागे ऑडिओ इफेक्टही वाजवले जात होते. सर्व मिळून त्यांचा प्रयत्न होता की लोकांना वाटेल की खरेच आयपीएल सुरू आहे. 

YouTubeवर होत होते सामन्याचे सरळ प्रक्षेपण

या खोट्या आयपीएलच्या मॅचेस शूट करण्यासाठी एचडी कॅमेरे लावण्यात आले होते. या सामन्यांचे सरळ प्रसारण यूट्यूबवर केले जात होते. यासाठी CRICHEROES नावाच्या अॅपवर सेंच्युरी हीटर नावाची टीम रजिस्टर करण्यात आली होती. 

पोलिसांनी सांगितले की शोएब दावडा नावाच्या व्यक्तीने सट्ट्यासाठी पूर्ण मैदान तयार केले होते आणि २०-२० ओव्हरचा सामना खेळवला जात होता. सामना खेळणाऱ्या सर्वांना आधीच सांगण्यात आले होते की कसे खेळायचे आहे, कधी आऊट व्हायचे आहे आणि कधी किती धावा करायच्या आहेत. 

अधिक वाचा - नियमीत पाणी टाकूनही अंगणातील तुळशी वाळते? हे आहे कारण

रशियाशी संबंध

गुजरातमध्ये सुरू असलेल्या खोट्या आयपीएलचे कनेक्शन रशियाशी जोडले आहेत. तसेच माहिती मिळाली आहे की चोरांनी रशियातील तीन शहरे टवेर, वोरोनिश आणि मॉस्कोच्या लोकांना आपल्या सट्टेबाजीच्या जाळ्यात अडकवले. मेहसाणा पोलिसांनी गुप्त सूचना मिळताच संपूर्ण रॅकेटवर हल्ला केला. आणि आतापर्यंत ३ लाखांच्या कॅशसह ४ लोकांना अटक केली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी