युझवेंद्रला चाहत्यांनी दिला Great Khali कडून ट्रेनिंग घेण्याचा सल्ला

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jun 08, 2021 | 17:46 IST | टाइम्स नाऊ मराठी

युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा व्हिडिओला अनेक लाईक्स मिळत आहेत. तसेच त्यांचे कौतुकही केले जात आहे. तर काहींनी चहलला ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे. 

yuzvendra chahal
चहलला चाहत्यांनी दिला Khali कडून ट्रेनिंग घेण्याचा सल्ला 

थोडं पण कामाचं

  • चहलने जोरदार केली एक्सरसाईज
  • धनश्री वर्मानेही केले वर्कआऊट
  • चाहत्यांनी केल्या या व्हिडिओवर कमेंट्सचा वर्षाव

मुंबई: टीम इंडियाचे(Team india)  स्पिनर युझवेंद्र चहल(Yuzvendra Chahal) आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा( (Dhanashree Verma) यांचे फॅन फॉलोईंग खूप आहेत. हे कपल सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असते. यांचा आता एक नवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तसेच चर्चेचा विषय ठरला आहे. (fan gives advice to yuzvendra chahal to get training from great khali)

चहल आणि धनश्रीने घरात केले वर्कआऊट

युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal)ने ८ जूनला आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता यात तो आपल्या घरात वर्कआऊट करताना दिसला होता. या दरम्यान त्याची बायको धनश्री वर्माही त्याच्यासोबत आहे. चहलने कॅप्शनमध्ये लिहिले की दररोज ट्रेनिंग घेत आहे ज्यामुळे गोष्टी बदलू शकेन. 

चाहत्यांनी केले चहलला ट्रोल

युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal)च्या या व्हिडिओला एकीकडे खूप लाईक्स आणि कौतुक मिळत आहे. तर काही लोकांनी टीम इंडियाच्या या क्रिकेटरला ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे. एका व्यक्तीने म्हटले की द ग्रेट खली( (The Great Khali) शी बोल भाई. दुसऱ्या फॅनने बॉडी शेमिंगबाबत बोलताना म्हटले की, युझीभाई थोडे वजन वाढवा. वाईट वाटून घेऊ नका मात्र असे करा. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी