IND vs SA: राहुल त्रिपाटीला संधी न मिळाल्याने चाहत्यांमध्ये नाराजी; हरभजन सिंगनेही साधला निशाणा

India Squad For South Africa Series | भारतीय क्रिकेट बोर्डाने रविवारी दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर केला. तसेच बोर्डाने इंग्लंडविरूद्ध होणाऱ्या एका कसोटी सामन्यासाठी देखील संघाची घोषणा केली आहे.

Fans angry over Rahul Tripathi not getting a chance in Indian team
राहुल त्रिपाटीला संधी न मिळाल्याने चाहत्यांमध्ये नाराजी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर.
  • के.एल राहुल करणार नेतृत्व.
  • राहुल त्रिपाटीला संधी न मिळाल्याने चाहत्यांमध्ये नाराजी.

India Squad For South Africa Series | मुंबई : भारतीय क्रिकेट बोर्डाने (BCCI) रविवारी दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर केला. तसेच बोर्डाने इंग्लंडविरूद्ध होणाऱ्या एका कसोटी सामन्यासाठी देखील संघाची घोषणा केली आहे. दरम्यान या १८ सदस्यांच्या संघात सनरायझर्स हैदराबादचा स्टार खेळाडू राहुल त्रिपाटीला (Rahul Tripathi) स्थान मिळाले नाही, त्रिपाटी यंदाच्या आयपीएल हंगामात शानदार लयनुसार खेळत आहे. त्रिपाठीने सध्या सुरू असलेल्या आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादसाठी १३ सामन्यांत १६१.७३ च्या स्ट्राईक रेटने ३९३ धावा केल्या आहेत. (Fans angry over Rahul Tripathi not getting a chance in Indian team). 

अधिक वाचा : विमानतळाच्या लगेज बेल्टवर पोहचली एक डेथ बॉडी?

BCCI वर चाहते नाराज

दरम्यान, आयपीएलमध्ये ३ अर्धशतके झळकावणाऱ्या राहुल त्रिपाटीचा भारतीय संघात समावेश न केल्याने चाहत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. त्याचा फॉर्म पाहता त्रिपाठीला भारतीय टी-२० संघात पदार्पणाची संधी मिळेल अशी सर्वांना अपेक्षा होती. लक्षणीय बाब म्हणजे रविवारी संघ जाहीर होताच ट्विटरवर चाहत्यांनी राहुल त्रिपाठी यांची निवड न झाल्याबद्दल निषेध आणि संताप व्यक्त केला. भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगनेही ट्विट करून आपली नाराजी जाहीर केली. 

अधिक वाचा : TRF दहशतवादी संघटनेची धमकी; अमरनाथ यात्रेविरोधात नाही पण...

केकेआरकडून खेळताना त्रिपाठी गेल्या काही हंगामापासून सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. यावर्षी दुसऱ्या फ्रँचायझीमध्ये गेल्यानंतरही त्याच्या फॉर्ममध्ये कोणताही बदल झालेला नाही. या हंगामातही त्याने हैदराबादसाठी खेळताना शानदार कामगिरी केली आहे. 

९ जून पासून रंगणार थरार

विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह या भारताच्या स्टार खेळाडूंना टी-२० मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० संघाची कमान केएल राहुलकडे सोपवण्यात आली आहे. या संघात युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिकला संधी देण्यात आली होती. या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेची सुरुवात ९ जून रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणाऱ्या पहिल्या सामन्यातून होईल. 

या आयपीएल हंगामात आरसीबीकडून उल्लेखणीय कामगिरी करणाऱ्या दिनेश कार्तिकचे देखील भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. तर आयपीएलच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या गुजरात टायटन्सच्या संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याला देखील संधी देण्यात आली आहे. याशिवाय मागील काही वर्षांपासून पंजाब किंग्जसाठी प्रभावी गोलंदाजी करणाऱ्या अर्शदीप सिंगला देखील राष्ट्रीय संघात जागा मिळाली आहे. तसेच शानदार आयपीएल हंगामामुळे कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांना देखील संघात स्थान मिळाले आहे. 

दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ

के.एल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, वेंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वरकुमार, हार्दीक पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंह, उमरान मलिक.

इंग्लंडविरूद्धच्या एका कसोटीसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), केएस भारत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिध कृष्णा. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी