मुंबई : टीम इंडियाचा (Captain) कर्णधार (Team India) रोहित शर्मा (Rohit Sharma) आशिया चषक 2022 (Asia Cup 2022) च्या आधी ब्रेकवर आहे. दरम्यान रोहित शर्माला झिम्बाब्वे दौऱ्यासाठी ( Zimbabwe tour) संघात स्थान मिळालेले नाही. त्याच्या जागी शिखर धवनकडे (Shikhar Dhawan) कर्णधारपद (captaincy) सोपवण्यात आले आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्मा आशिया कपपूर्वी मुंबईत (Mumbai) कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. सोमवारी रोहित शर्मा एका हॉटेलमधून बाहेर पडत असताना त्याच्या चाहत्यांनी हॉटेलच्या दाराजवळ गराडा घातला. रोहितला पाहण्यासाठी लोकांची एवढी गर्दी झाली होती की रोहितला परत हॉटेलवर परतावे लागलं.
सुरक्षेतही रोहित हॉटेल सोडू शकला नाही, या दृश्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, रोहित शर्मा एका हॉटेलमधून बाहेर निघत आहे आणि त्याच्यासोबत सुरक्षा रक्षक आहेत, मात्र हॉटेलबाहेर चाहत्यांची प्रचंड गर्दी असल्याने त्याला बाहेर पडता येत नाहीये, त्यामुळे त्याला हॉटेलच्या आत परत जावे लागले आहे.
Read Also : पुणे-अहमदनगर महामार्गावर भीषण अपघात, 5 जणांचा जागीच मृत्यू
रोहित शर्माचे देशभरात चाहते असले तरी मुंबईशी त्याचे विशेष आकर्षण आहे, कारण रोहित शर्मा मुंबईचा रहिवासी आहे आणि तो मुंबईतूनच देशांतर्गत क्रिकेट खेळला आहे. तसेच आयपीएलमध्ये रोहित शर्मा मुंबई इंडियन्सकडून खेळतो आणि संघाचा कर्णधारही आहे. अशात रोहित शर्मा बऱ्याच दिवसांनी मुंबईत परतला आहे. त्यामुळे त्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी हॉटेलसमोर प्रचंड गर्दी केली.
Read Also : लक्ष्मी माताला प्रसन्न करायचे असेल तर करा हे उपाय
रोहित शर्मा आता आशिया कप 2022 मध्ये खेळताना दिसणार आहे. आशिया चषक 2022 मध्ये भारताचा पहिला सामना 28 ऑगस्ट रोजी पाकिस्तानशी होणार आहे. 27 ऑगस्टपासून आशिया कपला सुरुवात होणार आहे. 35 वर्षीय रोहित शर्माने 2021 च्या टी-20 विश्वचषकानंतर कर्णधारपदाची सूत्रे हाती घेतली. विराट कोहलीने T20 विश्वचषकानंतरच सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद सोडले. रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने मर्यादित षटकांच्या सामन्यात एकही मालिका गमावलेली नाही. अलीकडेच, रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने टी-20 मालिकेत वेस्ट इंडिजचा 4-1 असा पराभव केला.