टीम इंडियाच्या या खेळाडूला आशिया कपमधून बाहेर पाहून चाहते झाले खुश, बीसीसीआयला म्हणतायत Thank you

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Aug 10, 2022 | 17:25 IST | टाइम्स नाऊ मराठी

Asia Cup 2022: आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. रोहित शर्मा आशिया कपमध्ये टीम इंडियाचा कर्णधार असणार आहे. आशिया कपसाठी निवडण्यात आलेल्या मुख्य संघातून पत्ता कट केल्याने चाहते खूप खुश आहेत आणि ते ट्विटरवर बीसीसीआयला थँक्यू म्हणत आहेत. 

team india
Asia Cupमधून या खेळाडूचा पत्ता कट केल्याने चाहते खुश 
थोडं पण कामाचं
  • आशिया कप २०२२साठी निवडण्यात आलेल्या मुख्य संघात श्रेयस अय्यरला स्थान मिळालेले नाही.
  • यानंतर चाहते निवड समिती आणि बीसीसीआयला धन्यवाद देत आहे.
  • आशिया कप २०२२साठी निवडण्यात आलेल्या १५ सदस्यी संघात फलंदाज श्रेयस अय्यरची निवड झालेली नाही.

मुंबई: २७ ऑगस्टपासून यूएईच्या धरतीवर आशिया कप २०२२(asia cup 2022)सुरू होत आहे. आशिया कप २०२२मध्ये भारत आपल्या अभियानाची सुरूवात २८ ऑगस्टपासून पाकिस्तानविरुद्ध सामन्याने करणार आहे. या वर्षी टी-२० वर्ल्डकपचे(t-20 world cup) आयोजनामुले आशिया कपही टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवला जाणार आहे. बीसीसीआयने काही दिवसांपूर्वीच आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. रोहित शर्मा(rohit sharma) या स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. आशिया कपसाठी निवडण्यात आलेल्या मुख्य संघातून एका खेळाडूचा पत्ता कट झाल्याने चाहते खूप खुश आहेत आणि ते ट्विटरवर बीसीसीआयला धन्यवाद देत आहेत. Fans happy after shreyas iyyer not selecting in asia cup team

अधिक वाचा - रक्षाबंधन निमित्ताने मराठीतून द्या शुभेच्छा

टीम इंडियाच्या या खेळाडूला आशिया कपमधून बाहेर पाहून चाहते झाले खुश

आशिया कप २०२२साठी निवडण्यात आलेल्या मुख्य संघात श्रेयस अय्यरला स्थान मिळालेले नाही. यानंतर चाहते निवड समिती आणि बीसीसीआयला धन्यवाद देत आहे. आशिया कप २०२२साठी निवडण्यात आलेल्या १५ सदस्यी संघात फलंदाज श्रेयस अय्यरची निवड झालेली नाही. दरम्यान त्याला स्टँडबाय खेळाडूंमध्ये सामील केले आहे. याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. त्याची संघात का निवड झाी नाही याचे कारण अद्याप समोर आलेले नाही मात्र याचे कारण अय्यरचा खराब फॉर्म असे म्हटले जात आहे. 

बीसीसीआयचे मानतायत आभार

श्रेयस अय्यरने नुकतेच वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर खराब कामगिरी केली होती. श्रेयस अय्यरने वनडे मालिकेत ३ सामन्यांमध्ये १६८ धावा केल्या. तर चार टी-२० सामन्यांमध्ये केवळ ९४ धावा केल्या. श्रेयस अय्यरला आशिया कपसाठीच्या मुख्य संघातून बाहेर ठेवल्याने चाहते खुश आहेत. 

अधिक वाचा - रक्षाबंधन निमित्त आपल्या भावाला, बहीणीला पाठवा खास संदेश

आशिया कप 2022 साठी भारताचा संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग आणि आवेश खान.

स्टँडबाय खेळाडू: श्रेयस अय्यर, अक्षर पटेल आणि दीपक चहर.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी