KL Rahul : टी-20चा सगळ्यात मोठा फ्रॉड, केएल राहुलच्या फ्लॉप शोवर भडकले चाहते

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Oct 31, 2022 | 13:25 IST | टाइम्स नाऊ मराठी

केएल राहुल सातत्याने टी-20 वर्ल्ड कप 2022मध्ये अपयशी दिसत आहे. तीनही सामन्यात त्याला चांगली कामगिरी करता आलेली नाही.

KL rahul
KL Rahul : टी-20चा सगळ्यात मोठा फ्रॉड 
थोडं पण कामाचं
  • टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाचा उप कर्णधार केएल राहुल(kl rahul) फ्लॉप ठरला.
  • द. आफ्रिकेविरुद्ध त्याला 9 धावा करता आल्या.
  • टी-20 वर्ल्ड कप 2022 मधील हा सलग तिसरा सामना आहे ज्यात केएल राहुल फ्लॉप ठरला आणि टीम इंडिया संकटात आली.

मुंबई: टी-20 वर्ल्ड कप 2022मध्ये(t-20 world cup) टीम इंडियाचा(team india) तिसरा सामना रविवारी 30 ऑक्टोबरला खेळवण्यात आला. भारताने पर्थमध्ये द. आफ्रिकेविरुद्ध टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला मात्र हा चुकीचा ठरला. पुन्हा एकदा टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाचा उप कर्णधार केएल राहुल(kl rahul) फ्लॉप ठरला. द. आफ्रिकेविरुद्ध त्याला 9 धावा करता आल्या. टी-20 वर्ल्ड कप 2022 मधील हा सलग तिसरा सामना आहे ज्यात केएल राहुल फ्लॉप ठरला आणि टीम इंडिया संकटात आली. भारतान याआधी पाकिस्तान(pakistan) आणि नेदरलँड्सविरुद्ध(netherlands) सामना खेळला आहे यात भारताला विजय मिळवता आला होता. मात्र या दोन्ही सामन्यात केएल राहुल फ्लॉप ठरला होता. fans troll kl rahul over flop show in t-20 world cup

अधिक वाचा - किरीट सोमय्या तोंडघशी, पेडणेकरांना समन्स दिले नाही - पोलीस

जर द. आफ्रिकेविरुद्ध सामन्याबाबत बोलायचे झाल्यास केएल राहुलला 14 बॉलमध्ये 9 धावा केल्या. लुंगी एनगिडीनच्या बॉलवर केएल राहुल कॅच देत बाद झाला. केएल राहुलने द. आफ्रिकेविरुद्ध पहिला ओव्हर मेडन खेळला होता. यानंतर टीम इंडिया दबावात आली आणि मोठे शॉट खेळण्याच्या नादात सुरूवातीचे विकेट पडले. 

कधीपर्यंत सुरू राहणार फ्लॉप शो?

असे नाही की केएल राहुल पहिल्यांदा फ्लॉप ठरला असला त्याचा फ्लॉप शो दीर्घकाळापासून सुर आहे. याच कारणामुळे केएल राहुलला प्लेईंग 11मधून बाहेर करण्याची मागणी केली जात होती.  टी-20 वर्ल्ड कप 2022मद्ये केएल राहुल सलग तीन डावांमध्ये फेल ठरला. याशिवाय त्याच्या धीम्या खेळीमुळे टीम इंडियाचे टेन्शनही वाढले होते. 

टी-20 वर्ल्ड कप 2022 मध्ये केएल राहुल-
•    विरुद्ध पाकिस्तान- 4 धावा, 8 बॉल
•    विरुद्ध नेदरलँड्स- 9 धावा, 12 बॉल
•    विरुद्ध द. अफ्रीका- 9 धावा, 14 बॉल

अधिक वाचा - मुंबईत डिलिव्हरी बॉयकडून कुत्र्यावर लैंगिक अत्याचार

सोशल मीडियावर चाहत्यांचा राग

केएल राहुलच्या फ्लॉप शोमुळे टीम इंडियाचे चाहतेही हैराण झालेत. काही लोकांनी ट्विटरवर लिहिले की टी-20 मध्ये सर्वात मोठा फ्रॉड केएल राहुल आहे तर काही चाहत्यांनी लिहिले की केएल राहुल केवळ ऑरेंज कॅपसाठी धावा करतो. कधीही संघासाठी धावा करतनाही. केएल राहुलच्या जागी ऋषभ पंतला प्लेईंग 11मध्ये सामील करण्याची मागणी केली जात आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी