मुंबई: भारतीय संघाने झिम्बाब्वेविरुद्ध शानदार पद्धतीने विजयी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाचे गोलंदाज आणि फलंदाज यांनी कमालीच खेळ दाखवला. मात्र कर्णधार केएल राहुल एका खास कारणामुळे चाहत्यांच्या रागाचे बळी ठरले. राहुलने आयपीएल २०२२नंतर टीम इंडियात पुनरागमन केले आहे. झिम्बाब्वे मालिकेनंतर तो टीम इंडियाला आशिया कप खेळायचा आहे. Fans trolls lokesh rahul on social media after second odi against zimbabwe
अधिक वाचा - ठाण्यात Swine Fluचा कहर, तीन दिवसांत रूग्णांमध्ये वाढ
भारताचा सुपरस्टार फलंदाज केएल राहुल पहिल्या वनडे सामन्यात फलंदाजी करू शकला नव्हता. तेव्हा सगळे म्हणत होते की त्याने सलामीला उतरायला हवे होते. मात्र दुसऱ्या वनडे सामन्यात तो सलामीला फलंदाजी करताना दिसला मात्र त्याचे परिणाम फ्लॉप ठरले. केएल राहुल सलामीसाठी उतरला खरा मात्र त्याला काहीच करता आले नाही. त्याच्या बॅटमधून केवळ एकच धाव निघाली. दुसऱ्या वनडे सामन्यात केएल राहुल केवळ एकच धाव करू शकला. या कारणामुळे चाहत्यांनी त्याच्यावर चांगलाच राग काढला आहे.
केएल राहुलने दीर्घकाळानंतर टीम इंडियामध्ये पुनरागमन केले आहे. अशातच सगळ्यांना आशा होती की तो झिम्बाब्वे दौऱ्यावर आपली लय परत मिळवू शकतो. मात्र असे घडले नाही. एका युझरने लिहिले की का भाई असे का करतोय. तर दुसऱ्या युझरने लिहिले की के एल राहुलला लवकरच कर्णधारपदावरून हटवले पाहिजे.
ICT AND KL RAHUL FANS AFTER HIS WICKET 😶 #Rahul #INDvsZIM pic.twitter.com/Z4XddK3jiT — ViRut Pholi (@ViRut_PhoLi) August 20, 2022
KL Rahul Why bro? — Kaarthi 🇮🇳❤🇷🇺,🇮🇱 (@Kaarthicherry) August 20, 2022
Giving so many heartbreaks!💔💔😭😥
Batting after Coming back from Injuries is not easy.Come back strong champion #KLRahul #ZIMvIND pic.twitter.com/ZUfB0l9eL3 — KL Siku Kumar (@KL_Siku_Kumar) August 20, 2022
अधिक वाचा - ठाण्यात Swine Fluचा कहर, तीन दिवसांत रूग्णांमध्ये वाढ
टीम इंडियाने झिम्बाब्वेला दुसऱ्या वनडेत ५ विकेटनी हरवत तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. १६२ धावांचे सोपे आव्हान भारताने २६व्या ओव्हरमध्येच पूर्ण केले. या सामन्यात संजू सॅमसनने लांब सिक्स ठोकत विजयावर शिक्कामोर्तब केले. टीम इंडियाकडून शिखर धवन आणि शुभमन गिल यांनी ३३ धावांची खेळी केली. तर संजू सॅमसनने शानदार ४३ धावांची नाबाद खेळी केली. याशिवाय दीपक हुड्डाने २५ धावांची खेळी केली.