IND vs SL Dream11: भारतासाठी आता करो या मरो.. श्रीलंकाविरुद्धच्या मॅचसाठी Fantasy cricket tips

Fantasy cricket tips for IND vs SL: आशिया चषक 2022 च्या सुपर फोरमध्ये भारताची श्रीलंकेशी निर्णायक लढत होईल. भारताने सुपर फोरमधील पाकिस्तानविरुद्धचा पहिला सामना गमावला आहे. त्यामुळे उर्वरित दोन सामने भारतासाठी करो या मरो.. असेच असणार आहेत.

fantasy cricket tips for india vs sri lanka asia cup 2022 match ind vs sl dream11
IND vs SL Dream11: श्रीलंकाविरुद्धच्या मॅचसाठी Fantasy cricket tips 
थोडं पण कामाचं
  • आशिया चषक स्पर्धेत भारत भिडणार श्रीलंकेशी
  • आशिया चषकातील भारतासाठी सर्वात महत्त्वाचा सामना
  • पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पराभव पत्करल्यानंतर भारताला पुढील दोन्ही सामने जिंकणं गरजेचं

My Dream11: दुबई: सध्या सुरू असलेल्या आशिया चषक 2022 (Asia Cup 2022) मधील टीम इंडियाला (Team India) रविवारी झालेल्या सामन्यात मोठा धक्का बसला. कारण सुपर फोरमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) पहिल्याच सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला. भारताने ग्रुप स्टेजमधील दोन्ही सामने जिंकले होते. पण राऊंड 2 मध्ये पाकिस्तानकडून पराभूत झाल्याने आता अंतिम फेरी गाठण्यासाठी भारताला पुढील दोन्ही सामने जिंकणं गरजेचं झालं आहे. तथापि, रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील टीम इंडियाला अंतिम फेरी गाठण्यासाठी अद्यापही मोठी संधी आहे. कारण पुढील दोन सामने हे श्रीलंका (Sri Lanka) आणि अफगाणिस्तानविरुद्ध आहेत. त्यामुळे अद्याप तरी भारताच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळविण्याचा आशा कायम आहेत. (fantasy cricket tips for india vs sri lanka asia cup 2022 match ind vs sl dream11)

दुसरीकडे श्रीलंकेने सुपर फोरमध्ये आपली सुरुवात चांगली केली आहे. त्यांनी अफगाणिस्तानवर चार विकेट राखून मात केली होती. या विजयामुळे श्रीलंकेचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळे भारताविरुद्ध खेळताना श्रीलंकेचे खेळाडू प्रयत्नांची शर्थ करताना दिसतील.

अधिक वाचा: Player of The Month : ICC ने जारी केल्या ऑगस्ट महिन्यातील प्लेअर ऑफ द मंथचे नामांकन, हे भारतीय खेळाडूही शर्यतीत

रवींद्र जडेजा संघाबाहेर गेल्याने मोठं नुकसान

भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजा दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर गेला आहे. पण यामुळे टीम इंडियाच्या संतुलनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे श्रीलंकेविरुद्धची सामन्यात कर्णधार रोहित शर्माचा गोलंदाजी फॉर्मेटमध्ये काही बदल करावे लागणार आहेत. 

आशिया चषक 2022: सुपर 4 सामन्यासाठी माझी ड्रीम 11 टीम, भारत विरुद्ध श्रीलंका: (My Dream11 team for Asia Cup 2022 Super 4 match, India vs Sri Lanka:)

रोहित शर्मा, कुसल मेंडिस (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव (कर्णधार), विराट कोहली, भानुका राजपक्षे, हार्दिक पंड्या, दासून शनाका, वनिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई

अधिक वाचा: India vs Sri Lanka T20 Live Cricket Streaming: भारत-श्रीलंका टी-२० सामना लाईव्ह प्रसारण, कधी आणि कुठे पाहाल

भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन (India likely playing XI)

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, दीपक हुडा/आवेश खान, आर अश्विन/युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग

श्रीलंकेची संभाव्य प्लेइंग इलेव्हन (Sri Lanka likely playing XI)

पथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), चरित अस्लंका, दानुष्का गुनाथिलका, भानुका राजपक्षे, दासून शनाक (कर्णधार), वनिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, महेश थेक्षना/प्रवीण जयविक्रम, असिथा फर्नांडो, दिलशान मधुशंका

अधिक वाचा: suresh raina: सुरेश रैनाची क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती

स्क्वॉड 

भारत: केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), दीपक हुडा, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, रवी बिश्नोई, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, दिनेश कार्तिक, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान

श्रीलंका: पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), चरित अस्लंका, दानुष्का गुनाथिलका, भानुका राजपक्षे, दासून शानाका (कर्णधार), वनिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, महेश थिक्शाना, असिथा फर्नांडो, दिलशान मदुशंका, दिनेश चंडीमल व्ही सिल्लंका, डी. , प्रवीण जयविक्रम , नुवानिडू फर्नांडो , प्रमोद मदुशन , नुवान तुषारा , मथिशा पाथीराना

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी