Mohammed Shami:देशासाठी...२०० विकेट पूर्ण केल्यावर भावूक झाला शमी, वडिलांच्या आठवणीने आले अश्रू

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Dec 29, 2021 | 12:25 IST | टाइम्स नाऊ मराठी

Mohammad shami completes 200 wickets in test: टीम इंडियाा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने सेंच्युरियन कसोटीत कमाल केली. शमीने येथे पाच विकेट घेतल्या आणि कसोटी क्रिकेटमधील आपल्या २०० विकेट पूर्ण केल्या.

mohammad shami
Shami; देशासाठी...२०० विकेट पूर्ण केल्यावर भावूक झाला शमी 
थोडं पण कामाचं
  • सेंच्युरियन कसोटीत शमीच्या ५ विकेट
  • वडिलांच्या आठवणीत भावूक झाला मोहम्मद शमी
  • कसोटी क्रिकेटमध्ये शमीच्या २०० विकेट पूर्ण

मुंबई: द. आफ्रिकेविरुद्धच्या(india vs south africa test match) सेंच्युरियन(centurion) येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात मोहम्मद शमीने(mohammad shami) कमाल केली आहे. पहिल्या डावात मोहम्मद शमीने पाच विकेट घेतल्या आहेत आणि यासोबतच कसोटी क्रिकेटमध्ये २०० विकेट पूर्ण केल्या आहेत. या मोठ्या यशानंतर मोहम्मद शमी भावूक झाला आणि आपल्या दिवंगत वडिलांच्या आठवणीने त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले. faster bowler mohammad shami completed 200 wickets in test cricket

तिसऱ्या दिवसाच्या खेळानंतर बीसीसीआय टीव्हीवर बॉलिंग कोच पारस महाब्रेसोबत बोलताना मोहम्मद शमीने हा आनंदाचा क्षण साजरा केला. मोहम्मद शमीने सांगितले जेव्हा देशासाठी खेळताना तुम्ही एखादे यश गाठता तेव्हा त्याचा आनंद मोठा असतो. आगामी सामन्यातहही चांगली कामगिरी करण्याचा नक्की प्रयत्न असेल. मोहम्मद शमी म्हणाला, मागच्या वेळेस येथे ४ विकेट काढल्या होत्या. यावेळेस मी पूर्ण प्रयत्न केले. ५ विकेटही पूर्ण झाले आणि २०० विकेटही. 

यावेळी बोलताना मोहम्मद शमीच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. २०० विकेट घेतल्यानंतर मोहम्मद शमीने जे सेलिब्रेशन केले ते खास वडिलांसाठी होते. कारण २०१७मध्ये त्यांचे निधन झाले होते. ज्या माणसामुळे त्याने इतके मोठे शिखर गाठले त्याचे श्रेय त्या व्यक्तीला दिलेच गेले पाहिजे. मोहम्मद शमीचे वडील तौसीफ अली यांचे जानेवारी २०१७मध्ये निधन झाले होते. मोहम्मद शमीने या वर्षी जानेवारीमध्ये आपल्या वडिलांसाठी भावूक पोस्ट लिहीली होती. यात त्याने म्हटले होते की एकदा मला माझ्या वडिलांना चालताना पाहता आले असते तर.

खास आहे २०० वा विकेट

द. आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या डावात ५ विकेट आपल्या नावे करणारा मोहम्मद शमीने २०० विकेटचा टप्पा गाठला. त्याच्यासाठी हे मोठे यश आहे.विशेष म्हणजे भारतासाठी  कसोटी सामन्यात कमी बॉल टाकून त्याने ही कामगिरी केली. २०० विकेट घेण्यसाठी शमीने ९८६९ बॉल खर्च केले.. या वर्षी मोहम्मद शमीला सोशल मीडियावर ट्रोलिंगचाही सामना करावा लागला होता. जेव्हा टी-२० वर्ल्डकपमध्ये मोहम्मद शमीची पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खराब कामगिरी झाली होती तेव्हा त्याला ट्रोल करण्यात आले होते. त्यावेळेस विराट कोहली स्वत: शमीच्या सपोर्टमध्ये आला होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी