World Athletics Championship : नीरज चोप्राच्या (Neeraj Chopra) ॲथलेटिक्सचा (Athletics) प्रवास सुरु झाला तो लठ्ठपणातून (Fatness). शाळेत असल्यापासून नीरज हा एक लठ्ठ मुलगा (Fat boy) होता. मध्यमवर्गीय एकत्र कुटुंबात (Middle class family) लाडाकोडात वाढलेल्या नीरजचं वजन बघता बघता एवढं वाढलं की त्याच्या वडिलांना (Father) काळजी वाटू लागली. शिवाय गावभर उनाडक्या करत हा मुलगा फिरत होता. गावातून दिवसभर म्हशींमागे पळणे, म्हशींच्या पाठीवर बसून राहणे असे त्याचे उद्योग सुरू असायचे. त्यामुळे त्याच्या भवितव्याची काळजीही कुटुंबीयांना वाटत होती.
नीरजचे वडील सतिश कुमार चोप्रा यांनी ठरवलं की आपल्या मुलाला शिस्त लावण्यासाठी आणि त्याचं वजन कमी करण्यासाठी लवकरात लवकर काहीतरी करायला पाहिजे. हरयाणातल्या खंद्रा नावाच्या गावात चोप्रा फॅमिली राहत होती. नीरजच्या वडिलांनी आपल्या सख्ख्या भावाकडे म्हणजे नीरजच्या काकांकडे आपली चिंता व्यक्त केली. या गावापासून जवळचं शहर म्हणजे पानीपत. पानीपतमध्ये असणाऱ्या शिवाजी स्टेडिअममध्ये ॲथलेटिक्सचं ट्रेनिंग दिलं जायचं. नीरजच्या घरापासून ही अकॅडमी 15 किलोमीटर होती. नीरजच्या काकांनी नीरजला तिथे जाण्यासाठी गोड बोलून तयार केलं आणि रनिंगसाठी त्याला या अकॅडमीत भरती केलं. नीरज रोज ट्रॅकवरून धावेल आणि त्याचं वजन कमी होईल, अशी त्यांच्या फॅमिलीला आशा होती. नीरजचं वजन आयडियल वजनापेक्षा 17 किलो जास्त होतं. हे वजन कमी करण्यासाठी त्यानं रोज धावण्याचा सराव करणं गरजेचं होतं.
मात्र नीरजला धावण्यात काहीच इंटरेस्ट नव्हता. जीवावर आल्यासारखा तो पळायचा आणि कसाबसा तिथला वेळ काढायचा. काही दिवसांतच त्याच अकॅडमीत काही सीनिअर मुलं भालाफेक करताना त्याला दिसली. त्याला त्यात इंटरेस्ट वाटला आणि त्यानंही भाला फेकायला सुरुवात केली.
अधिक वाचा - IND vs WI: शेवटच्या क्षणापर्यंत रोखला होता श्वास, मग घडलं असं काहीसं
त्याचं पुढं काय झालं हे आपल्या सगळ्यांना माहितच आहे. 2016 साली झालेल्या ज्युनिअर जागतिक अंजिक्यपद स्पर्धेत नीरज चोप्रानं गोल्ड मेडल जिंकलं. त्यानंतर झालेल्या टोकिया ऑलिम्पिकमध्येही त्यानं गोल्ड मेडल जिंकलं. आता पुन्हा जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत रौप्य पदकाची मिळवून त्यानं आणखी एक रेकॉर्ड केलंय. या स्पर्धेत मेडल मिळवणारा तो पहिला पुरुष खेळाडू ठरलाय. या स्पर्धेत १९ वर्षांपूर्वी अंजू बॉबी जॉर्जनं लांब उडी या क्रीडाप्रकारात मेडल मिळवलं होतं. त्यानंतर थेट नीरज चोप्रानं हे यश संपादन केलं आहे. कुठल्याही परिस्थितीतून खेळाडू तयार होऊ शकतात. जिद्द आणि मेहनत घेण्याची तयारी असेल आणि कुटुंबीयांनी योग्य वयात साथ मिळाली, तर एखादा खेळाडू कसा घडू शकतो, याचं नीरज चोप्रा हे मूर्तीमंत उदाहरण आहे.