भारतातच होणार १७ वर्षांखालील महिला फुटबॉल वर्ल्ड कप, फिफाने AIFF चे निलंबन मागे घेतले

FIFA lifts suspension on All India Football Federation India to host U 17 Women's World Cup : फुटबॉलची सर्वोच्च संस्था असलेल्या फिफाने अखिल भारतीय फुटबॉल महासंघाला (All India Football Federation - AIFF) निलंबित करण्याचा निर्णय मागे घेतल्याचे जाहीर केले.

FIFA lifts suspension on All India Football Federation India to host U 17 Women's World Cup
फिफाने AIFF चे निलंबन मागे घेतले  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • फिफाने AIFF चे निलंबन मागे घेतले
  • भारतातच होणार १७ वर्षांखालील महिला फुटबॉल वर्ल्ड कप
  • अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या नव्या अध्यक्षांची निवड करण्यासाठी निवडणूक २ सप्टेंबर २०२२ रोजी होणार

FIFA lifts suspension on All India Football Federation India to host U 17 Women's World Cup : फुटबॉलची सर्वोच्च संस्था असलेल्या फिफाने अखिल भारतीय फुटबॉल महासंघाला (All India Football Federation - AIFF) निलंबित करण्याचा निर्णय मागे घेतल्याचे जाहीर केले. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या कारभारात बाहेरच्या व्यक्ती अथवा संस्थांचा हस्तक्षेप होत असल्याचे आढळल्यामुळे फिफाने अखिल भारतीय फुटबॉल महासंघावर निलंबनाची कारवाई केली होती. पण केंद्र सरकारने अखिल भारतीय फुटबॉल महासंघावरील प्रशासकांची यंत्रणा हटविल्याचे जाहीर केल्यानंतर फिफाने निलंबन मागे घेतले. आता फिफा आणि केंद्र सरकार अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या कारभारावर लक्ष ठेवणार आहेत.

निलंबन मागे घेण्यात आल्यामुळे अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्यावतीने आयोजीत करण्यात आलेली १७ वर्षांखालील महिलांची आंतरराष्ट्रीय फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धा ११ ते ३० ऑक्टोबर २०२२ या कालावधीत होणार आहे. 

अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचा कारभार आता कार्यवाहक व्यवस्थापकीय सचिव सुनंदो धर हाताळत आहेत. महासंघाच्या नव्या अध्यक्षांची निवड करण्यासाठी निवडणूक २ सप्टेंबर २०२२ रोजी होणार आहे. ही निवडणूक भारताचा दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिया लढवणार आहे. माजी भारतीय गोलकीपर कल्‍याण चौबे हा पण निवडणूक रिंगणात आहे.

जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते
विमान प्रवासादरम्यान चुकूनही करू नका 'या' गोष्टी, अन्यथा...
तुम्हीही डिजिटल पेमेंट करता? मग ही बातमी वाचाच....

काही दिवसांपूर्वी भुतियाने 'द इंडियन एक्‍सप्रेस'च्या प्रतिनिधीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्याने अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे नेतृत्व करण्यासाठी सक्षम असल्याचा दावा केला होता. कल्याण चौबे एक उत्तम व्यक्ती आहेत पण त्याच्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने फुटबॉल महासंघाचे काम मी करेन, असा विश्वास फुटबॉलपटू बायचुंग भुतिया याने व्यक्त केला होता.

बायचुंग भुतिया सध्या एक फुटबॉल क्लब चालवत आहे. त्याने सलग सहा वर्ष सिक्कीमच्या फुटबॉल टीमचे प्रतिनिधित्व केले. तो काही काळ इंग्लंडमध्येही खेळला होता. जगातील अनेक दिग्गज फुटबॉलपटूंना ओळखतो, असे भुतियाने मुलाखती दरम्यान सांगितले होते. भारतात फुटबॉल प्लेअर्स असोसिएशन सुरू केली आणि हाताळली असेही भुतिया म्हणाला. भारतात फक्त भुतियाने सुरू केलेली फुटबॉल प्लेअर्स असोसिएशन ही एकच फुटबॉलपटूंची संघटना नोंदणीकृत आहे. या सर्व मुद्यांची आठवण करून देऊन भुतियाने अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे नेतृत्व करण्यासाठी सक्षम असल्याचे सांगितले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी