FIFA ने AIFF ला केलं निलंबित: राजकारणामुळे अंडर-17 महिलांचा वर्ल्ड कप भारतानं गमावलं यजमान पद?, बंदीनंतर भारतीय फुटबॉलवर काय फरक पडणार?

जागतिक फुटबॉलची (world football) सर्वोच्च संस्था फिफाने (FIFA) सोमवारी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाला (All India Football Federation) निलंबित केले आहे. फिफाच्या म्हणण्यानुसार, एआयएफएफने (AIFF) फिफाच्या नियमांचे गंभीर उल्लंघन केले आहे. म्हणजेच भारताच्या हातातून अंडर-17 महिला विश्व कप स्पर्धेचे (Under-17 Women's World Cup) यजमानपद  गेले आहे. 

Fifa Ban AIFF: बंदीनंतर भारतीय फुटबॉलवर काय फरक पडणार?
What will be the difference in Indian football after the ban? 
थोडं पण कामाचं
  • FIFA ने भारतीय फुटबॉलच्या प्रशासकीय मंडळाला निलंबित केले, ज्याला सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त CoA द्वारे चालवले जात आहे.
  • एआयएफएफचे माजी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल कार्यकाळ पूर्ण होऊनही पदावर कायम असल्याने अडचणीत आले आहेत.
  • 11 ते 30 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या 17 वर्षांखालील महिला विश्व कप स्पर्धेचे यजमानपद भारताला मिळाले होते.

नवी दिल्‍ली: जागतिक फुटबॉलची (world football) सर्वोच्च संस्था फिफाने (FIFA) सोमवारी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाला (All India Football Federation) निलंबित केले आहे. फिफाच्या म्हणण्यानुसार, एआयएफएफने (AIFF) फिफाच्या नियमांचे गंभीर उल्लंघन केले आहे. म्हणजेच भारताच्या हातातून अंडर-17 महिला विश्व कप स्पर्धेचे (Under-17 Women's World Cup) यजमानपद  गेले आहे. 

थर्ड पार्टीच्या अवाजवी प्रभावामुळे हा निर्णय घेण्यात आला."एआयएफएफ कार्यकारी समितीचे अधिकार ग्रहण करण्यासाठी प्रशासकांची समिती स्थापन केल्यावर निलंबन मागे घेण्यात येईल आणि एआयएफएफ प्रशासन एआयएफएफच्या दैनंदिन कामकाजावर पूर्ण नियंत्रण मिळवेल," असे फिफाने एका निवेदनात म्हटले आहे. परंतु हे निलंबन हे राजकारणामुळे झाले असल्याचं म्हटलं जात आहे. यूपीए सरकारमध्ये (UPA Govt) मंत्री असलेले प्रफुल्ल पटेल (Praful Patel) हे 13 वर्षे फुटबॉल असोसिएशन ऑफ इंडियाचे (Football Association of India) अध्यक्ष (President) होते. देशाच्या क्रीडा संहितेनुसार कोणतीही व्यक्ती तीन टर्मपेक्षा जास्त काळ राष्ट्राध्यक्ष राहू शकत नाही. यामुळे त्यांना नाईलास्तव त्यांना हे पद सोडावं लागलं. मात्र पद सोडल्यानंतर लगेचच प्रफुल्ल पटेल यांनी गलिच्छ राजकारण सुरू केले.

Read Also : डबल मर्डरनं हादरली राजधानी,सासू सुनेची घरात घुसून हत्या

राज्य संघांसोबत एकत्र येत त्यांनी निवडणुका होऊ दिल्या नाहीत.  येथे पटेल यांनी निवडणुकीत अडथळे आणले. दुसरीकडे, फिफाही एआयएफएफला आपल्या जुगाडातून बंदी घालण्याच्या प्रयत्नात गुंतली होती. ते फिफाकडून सतत बंदीच्या धमक्या देत. अखेर सोमवारी रात्री फिफाने भारतीय फुटबॉल संघटनेवर बंदी घातली. खरं तर, निवडणुका होत नसल्यामुळे, भारतीय फुटबॉलला सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या प्रशासकीय समितीद्वारे (CoA) चालवले जात आहे. पण नियम सांगतात की, कोणत्याही देशात फुटबॉल चालवणारी योग्य संघटना किंवा आयोजन संस्था नसेल, तर त्याची मान्यता धोक्यात येऊ शकते. याचाच अर्थ आता ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या महिला 17 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भारताकडून हिसकावून घेण्यात आले आहे.

Read Also : मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार, AC लोकल वाढणार

भारतावर बंदी म्हणजे आम्ही कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळू शकणार नाही. आयएसएलसारख्या देशांतर्गत स्पर्धेत खेळण्यासाठीही कोणताच परदेशी खेळाडू आपल्या देशात येऊ शकणार नाही. 28 ऑगस्टला निवडणुका होणार असल्या तरी पुढे काय होते ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

बंदीचा भारतीय फुटबॉलवर काय परिणाम होईल?

या वर्षी ऑक्टोबरमध्ये भारत 17 वर्षांखालील महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद भूषवणार होता. आता भारतावर बंदी म्हणजे देशातील  फुटबॉल खेळण्यावर संपूर्ण बंदी असणार आहे. एएफसी आशियाई चषकही पुढील वर्षी होणार आहे. बंदीनंतर आता भारतीय संघ कोणत्याही स्पर्धेत भाग घेऊ शकणार नाही. इतकेच काय तर आयएसएलसारख्या देशांतर्गत स्पर्धेतही खेळण्यासाठी कोणताच परदेशी खेळाडू भारतात येऊ शकणार नाहीये.

भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने प्रफुल्ल पटेल आणि त्यांच्या कार्यकारी समितीला त्यांच्या जबाबदाऱ्यांपासून मुक्त केले आणि AIFF च्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी प्रशासकांची समिती (CoA) नियुक्त केली. पटेल यांनी डिसेंबर 2020 मध्ये एआयएफएफचे अध्यक्ष म्हणून 3 टर्म आणि 12 वर्षे पूर्ण केली होती. ही क्रीडा संहितेअंतर्गत राष्ट्रीय क्रीडा महासंघाचे प्रमुख म्हणून जास्तीत जास्त परवानगी दिली होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी