ARGENTINA vs SAUDI ARABIA: फिफा वर्ल्ड कपमध्ये मोठा उलटफेर, सौदी अरेबियाने अर्जेंटिनाला दिला धक्का

FIFA World Cup 2022 : Argentina suffer shock loss against Saudi Arabia despite Lionel Messi goal : फिफा वर्ल्ड कप 2022 मध्ये मोठा उलटफेर झाला. सौदी अरेबियाने अर्जेंटिना सारख्या बलाढ्य टीमचा पराभव केला.

FIFA World Cup 2022
सौदी अरेबियाने अर्जेंटिनाला दिला धक्का  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • फिफा वर्ल्ड कपमध्ये मोठा उलटफेर
  • सौदी अरेबियाने अर्जेंटिनाला दिला धक्का
  • सौदीने अर्जेंटिना विरुद्धची मॅच 2-1 अशी जिंकली

FIFA World Cup 2022 : Argentina suffer shock loss against Saudi Arabia despite Lionel Messi goal : फिफा वर्ल्ड कप 2022 मध्ये मोठा उलटफेर झाला. सौदी अरेबियाने अर्जेंटिना सारख्या बलाढ्य टीमचा पराभव केला. सौदीने अर्जेंटिना विरुद्धची मॅच 2-1 अशी जिंकली. अर्जेंटिनाकडून स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीने एकमेव गोल केला. या उलट सौदीने 2 गोल केले आणि मॅच जिंकली. 

FIFA Wolrd Cup 2022 : फुटबॉल वर्ल्डकपवरून केरळमध्ये हाणामारी

फिफा वर्ल्ड रँकिंगमध्ये अर्जेंटिना तिसऱ्या तर सौदी अरेबिया 51व्या स्थानावर आहे. यामुळेच सौदीने मॅच जिंकल्यामुळे अवघे फुटबॉल विश्व चक्रावले.

जगात सर्वात महाग आहे FIFA World Cupची ट्रॉफी, इतकी आहे किंमत
World Cup झाला सुरू पण बिअर अन् sex बंद

फुटबॉल वर्ल्डकपमध्ये आज झालेल्या मॅचमध्ये अर्जेंटिनाकडून लिओनेल मेस्सीने 10व्या मिनिटाला गोल केला. या गोलमुळे अर्जेंटिनाला 1-0 अशी आघाडी मिळाली होती. पण ही आघाडी राखून मॅच जिंकणे अर्जेंटिनाला जमले नाही. 

Suryakumar Yadav: सूर्याला कधी मिळणार कसोटी खेळण्याची संधी? खुद्द क्रिकेटरने दिले याचे उत्तर

IND vs NZ 2nd T-20: सूर्यकुमारची झुंझार खेळी अन् भारतीय बॉलर्सची दमदार कामगिरी,  टीम इंडियाचा न्यूझीलंडवर 65 रन्सने विजय

सौदी अरेबियाकडून सलेह अलशेहरीने 48व्या मिनिटाला गोल केला. या गोलमुळे 1-1 अशी बरोबरी झाली. बरोबरी होताच अर्जेंटिनाने दुसरा गोल करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पण हे प्रयत्न अयशस्वी ठरले. सौदीकडून सलेम अल्दावसरीने 53व्या मिनिटाला गोल केला. या गोलमुळे सौदीने अर्जेंटिना विरोधात 2-1 अशी आघाडी मिळवली. 

कतारमधील यंदाच्या FIFA World Cup काय आहे खास? वाचा
रोनाल्डोचे कार कलेक्शन पाहून म्हणाल, आयुष्य असावं तर असं...

सौदीने मॅचमध्ये आघाडी घेतल्याचे पाहून अर्जेंटिनाने एकदम आक्रमक हालचाली केल्या. त्यांनी वेगाने आणि वारंवार गोल करण्याचे प्रयत्न केले. पण अर्जेंटिनाचे प्रयत्न अयशस्वी करण्यात सौदीला यश आले. अखेरच्या काही मिनिटांमध्ये अर्जेंटिना बरोबरी साधेल असे वाटत होते. पण अंतिम टप्प्यावर गोल थोपविण्यात सौदीचे खेळाडू यशस्वी झाले. सौदीच्या डिफेन्स लाइन आणि गोलकीपरने त्यांची जबाबदारी व्यवस्थित पार पाडली. यामुळे अर्जेंटिनाला पुन्हा वरचढ होण्याची संधीच मिळाली नाही. सौदी अरेबियाने फिफा वर्ल्ड कप 2022 मध्ये अर्जेंटिनाविरुद्धची मॅच 2-1 अशी जिंकून एक ऐतिहासिक कामगिरी केली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी