fifa world cup 2022 final, argentina vs france title clash match preview and all facts related final match : अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सी याच्यासाठी आता नाही कधीच नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आज (रविवार 18 डिसेंबर 2022) अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यात फिफा वर्ल्डकप फायनल मॅच (फुटबॉल वर्ल्डकप फायनल मॅच) रंगणार आहे. फायनल मॅचच्या निमित्ताने अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सी आणि फ्रान्सच्या एमबापे यांच्यात गोल्डन बूटसाठी झुंज होणार आहे. दोघांनी यंदाच्या वर्ल्डकपमध्ये प्रत्येकी 5 गोल केले आहेत.
अर्जेंटिनाने 1978 आणि 1986 मध्ये फिफा वर्ल्डकप जिंकला. यानंतर अर्जेंटिनाला अद्याप वर्ल्डकप जिंकणे शक्य झालेले नाही. तर फ्रान्सने 1998 आणि 2018 मध्ये फिफा वर्ल्डकप जिंकला. आता फ्रान्स सलग दुसरा वर्ल्डकप जिंकण्यास उत्सुक आहे तर अर्जेंटिना वर्ल्डकपची 36 वर्षांची प्रतिक्षा संपविण्याचा प्रयत्न करत आहे. अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यापैकी कोण यशस्वी होते याकडे फुटबॉलप्रेमींचे लक्ष आहे.
लिओनेल मेस्सी 35 वर्षांचा आहे. मेस्सीची कारकिर्द सुरू झाली त्यावेळी त्याची तुलना पेले आणि दिएगो मॅराडोना यांच्याशी केली गेली. मॅराडोना आणि पेले यांनी आपापल्या टीमला वर्ल्डकप जिंकवून दिला. पण मेस्सीला अद्याप ही कामगिरी जमलेली नाही. यावेळी मेस्सीकडे शेवटची संधी आहे. यामुळे यंदाच्या वर्ल्डकपच्या निमित्ताने तो ही कामगिरी करू शकणार का, याकडे मेस्सीप्रेमींचे लक्ष आहे.
मेस्सीसमोर आव्हान आहे ते पीएसजी संघातील सहकारी किलियान एमबापे याचे. फ्रान्सने पहिला वर्ल्डकप जिंकला त्यावेळी एमबापे 19 वर्षांचा होता. पेले यांनी कमी वयातच सलग दोन स्पर्धा जिंकल्या होत्या. पेले यांच्यानंतर सलग दोन स्पर्धा जिंकलेल्या सर्वांत लहान खेळाडूंत स्थान मिळवण्याची संधी एमबापेकडे आहे. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये सुरुवातीपासून एमबापे चांगली कामगिरी करत असल्याचे चित्र आहे. त्याच्या कामगिरीचा फ्रान्सला फायनलपर्यंत मजल मारण्यासाठी फायदा झाला आहे. यामुळे एमबापे काय करतो याकडेही अनेकांचे लक्ष आहे.
अर्जेंटिनाला कतारमध्ये प्रेक्षकांचा मोठा पाठिंबा आहे. पण फ्रान्स मॅच दरम्यान अचानक कामगिरी उंचावण्यासाठी यंदाच्या वर्ल्डकपमध्ये जास्त लोकप्रिय झाला आहे. अर्जेंटिनातील खेळाडूंचे नैसर्गिक ड्रिबलिंगचे कौशल्य आणि ताकदवान किकची हातोटी फ्रान्सला सतावू शकेल. अर्जेंटिना पुन्हा सेंट्रल मिडफिल्डर ठेवून फ्रान्सला जेरीस आणण्याचा प्रयत्न करेल. आठ वर्षांपूर्वीच्या फायनलमध्ये मेस्सीला हार पत्करावी लागली होती. ही पुनरावृत्ती मेस्सी टाळणार का हाच मुख्य प्रश्न आहे.
Sanju Samson Offer:निवड समितीकडून वारंवार डावलल्या जाणाऱ्या संजूला आयर्लंडकडून ऑफर; पण..