FIFA World Cup 2022 Final Live Streaming : फिफा वर्ल्डकप फायनल कुठे आणि कशी बघाल?

fifa world cup 2022 final live streaming argentina vs france football match live score streaming : आज (रविवार 18 डिसेंबर 2022) अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यात फिफा वर्ल्डकप फायनल मॅच (फुटबॉल वर्ल्डकप फायनल मॅच) रंगणार आहे.

FIFA World Cup 2022 Final Live Streaming
फिफा वर्ल्डकप फायनल कुठे आणि कशी बघाल?  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • FIFA World Cup 2022 Final Live Streaming : फिफा वर्ल्डकप फायनल कुठे आणि कशी बघाल?
  • फायनल मॅच टीव्हीवर कुठे बघता येणार?
  • फायनल मॅच मोबाईल अॅपवर कुठे बघता येणार? मॅचचे लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे होणार?

fifa world cup 2022 final live streaming argentina vs france football match live score streaming : आज (रविवार 18 डिसेंबर 2022) अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यात फिफा वर्ल्डकप फायनल मॅच (फुटबॉल वर्ल्डकप फायनल मॅच) रंगणार आहे. फायनल मॅचच्या निमित्ताने अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सी आणि फ्रान्सच्या एमबापे यांच्यात गोल्डन बूटसाठी झुंज होणार आहे. दोघांनी यंदाच्या वर्ल्डकपमध्ये प्रत्येकी 5 गोल केले आहेत.

अर्जेंटिनाने 1978 आणि 1986 मध्ये तर फ्रान्सने 1998 आणि 2018 मध्ये फिफा वर्ल्डकप जिंकला. आता फ्रान्स सलग दुसरा वर्ल्डकप जिंकण्यास उत्सुक आहे तर अर्जेंटिना वर्ल्डकपची 36 वर्षांची प्रतिक्षा संपविण्याचा प्रयत्न करत आहे. अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यापैकी कोण यशस्वी होते याकडे फुटबॉलप्रेमींचे लक्ष आहे. पस्तिशीचा मेस्सी टीमला वर्ल्डकप जिंकवून निवृत्ती स्वीकारणार की पेले यांच्यानंतर सलग दोन स्पर्धा जिंकलेला सर्वांत लहान खेळाडू होण्याची संधी एमबापे साधणार याकडेही फुटबॉलप्रेमींचे लक्ष आहे.

प्रश्न : कुठे होणार अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स ही फिफा वर्ल्डकप 2022 फायनल मॅच? (Argentina vs France FIFA World Cup 2022 Final Venue)

उत्तर : अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स ही फिफा वर्ल्डकप 2022 मधील फायनल मॅच कतारमधील लुसेल स्टेडियम (Lusail Stadium, Stadium in Lusail, Qatar) येथे होणार

प्रश्न : अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स ही फिफा वर्ल्डकप 2022 फायनल मॅच किती वाजता सुरू होणार? (Argentina vs France FIFA World Cup 2022 Final Timing)

उत्तर : अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स ही फिफा वर्ल्डकप 2022 मधील फायनल मॅच भारतीय वेळेनुसार आज (रविवार 18 डिसेंबर 2022) रात्री 8.30 वाजता सुरू होणार

प्रश्न : अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स ही फिफा वर्ल्डकप 2022 फायनल मॅच टीव्हीवर कुठे बघता येणार? (Argentina vs France FIFA World Cup 2022 Final on which tv channel)

उत्तर : अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स ही फिफा वर्ल्डकप 2022 मधील फायनल मॅच स्पोर्ट्स 18 या टीव्ही चॅनलवर बघता येणार

प्रश्न : अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स ही फिफा वर्ल्डकप 2022 फायनल मॅच मोबाईल अॅपवर कुठे बघता येणार? मॅचचे लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे होणार? (Argentina vs France FIFA World Cup 2022 Final live streaming online)

उत्तर : अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स ही फिफा वर्ल्डकप 2022 मधील फायनल मॅच जिओ सिनेमा या मोबाईल अॅपवर बघता येणार. अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स या फिफा वर्ल्डकप 2022 मधील फायनल मॅचचे लाईव्ह स्ट्रिमिंग जिओ सिनेमा या मोबाईल अॅपवर होणार

Sanju Samson Offer:निवड समितीकडून वारंवार डावलल्या जाणाऱ्या संजूला आयर्लंडकडून ऑफर; पण..

Ind W vs Aus W: एक नंबर! टी-20च्या Super overमध्ये ऑस्ट्रेलियावर थरारक विजय, भारतीय महिला संघाचा वर्ल्ड रेकॉर्ड; जाणून घ्या काय आहे Record

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी