FIFA World Cup 2022: फिफा वर्ल्डकप कधी-कुठे बघाल, किती संघ आणि ग्रुप जाणून घ्या सर्वकाही...

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 10, 2022 | 19:44 IST | टाइम्स नाऊ मराठी

FIFA World Cup 2022 Time table: इतिहासात पहिल्यांदा फुटबॉल वर्ल्डकप गल्फ देशांमध्ये खेळवला जात आहे. फिफा वर्ल्डकप 2022ला लवकरच सुरूवात होत आहे. फुटबॉल चाहते यासाठी प्रचंड उत्सुक आहेत. 

FIFA World Cup 2022
फिफा वर्ल्डकप कधी-कुठे बघाल, किती संघ आणि ग्रुप जाणून घ्या.. 
थोडं पण कामाचं
  • यावेळेस फिफा वर्ल्डकप 2022 कतारच्या यजमानपदाखाली 20 नोव्हेंबरपासून सुरू होत आ
  • याचा फायनल सामना 18 डिसेंबरला खेळवला जाणार आहे.
  • फिफा वर्ल्डकपचा 22 वा हंगाम असेल.

मुंबई: फुटबॉल चाहत्यांना या महिन्यात मोठी खुशखबर मिळणार आहे. त्यांना फिफा वर्ल्डकपमधील रोमहर्षक सामने पाहायला मिळणार आहेत. यंदाचा हा वर्ल्डकप कतारमध्ये खेळवला जात आहे. यावेळेस स्पर्धेबाबत चाहतेही खूप उत्सुक आहेत. तुम्हीही या फुटबॉल कधी, कुठे कसा खेळवला जाईल तसेच सामने, ग्रुपबाबत जाणून घेण्यासाठी उत्सुक असाल ना? तर घ्या जाणून...

अधिक वाचा  - घटस्फोटाच्या सुनावणीसाठी आलेल्या पतीचा पत्नीवर हल्ला

कधीपर्यंत खेळवला जाणार फिफा वर्ल्ड कप 2022?

यावेळेस फिफा वर्ल्डकप 2022 कतारच्या यजमानपदाखाली 20 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. याचा फायनल सामना 18 डिसेंबरला खेळवला जाणार आहे. फिफा वर्ल्डकपचा 22 वा हंगाम असेल. ही स्पर्धा पहिल्यांदा गल्फ देशांमध्ये खेळवला जात आहे. 

फिफा वर्ल्डकप 2022 किती संघ आणि किती ग्रुप?

यावेळेस फिफा वर्ल्डकप 2022मध्ये एकूण 32 संघ सहभागी होणार आहे. सर्वांना  8 ग्रुपमध्ये विभागण्यात आले आहे. प्रत्येक ग्रुपमध्ये चार संघ आहेत. 

फीफा वर्ल्ड कप 2022मधील ग्रुप्स आणि संघ

ग्रुप A
कतार, इक्वाडोर, सेनेगल आणि नेदरलँड (Qatar, Ecuador, Senegal and Netherlands) 

ग्रुप B 
इंग्लंड, इराण, अमेरिका आणि वेल्स (England, Iran, America and Wales)

ग्रुप C
अर्जेंटिना, सौदी अरेबिया, मेक्सिको आणि पोलंड (Argentina, Saudi Arabia, Mexico and Poland)

ग्रुप D 
फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क आणि ट्युनिशिया (France, Australia, Denmark and Tunisia)

ग्रुप E 
स्पेन, कोस्टा रिका, जर्मनी आणि जपान (Spain, Costa Rica, Germany and Japan)

ग्रुप F 
बेल्जियम, कॅनडा, मोरक्को आणि क्रोएशिया (Belgium, Canada, Morocco and Croatia)

ग्रुप G 
ब्राझील, सर्बिया, स्वित्झर्लंड आणि कॅमेरून (Brazil, Serbia, Switzerland and Cameroon)

ग्रुप H 
पोर्तुगाल, घाना, उरुग्वे आणि कोरिया रिपब्लिक (Portugal, Ghana, Uruguay and Republic of Korea)

ग्रुप सामने, क्वार्टर फायनल, सेमीफायनल आणि फायनल

  1. फीफा वर्ल्ड कप 2022मद्ये ग्रुप सामने 20 नोव्हेंबर ते 2 डिसेंबरपर्यंत खेळवले जातील. 
  2. यानंतर राऊंड ऑफ 16चे सामने 3 ते 6 डिसेंबरदरम्यान खेळवले जातील. 
  3. क्वार्टर फायनल सामने  9 आणि 10 डिसेंबरला होतील.
  4. यानंतर 13 आणि 14 डिसेंबरला टॉप 4 संघांमध्ये सेमीफायनलचे सामने रंगतील. 
  5. तिसऱ्या स्थानासाठी सामना 17 डिसेंबरला रंगेल. 
  6. शेवटचा सामना 18 डिसेंबरला खेळवला जाईल. 

कोणकोणत्या स्थानांवर रंगणार सामने

स्पर्धेत 32 संघांमध्ये एकूण 64 सामने रंगतील. हे सर्व सामने 8 वेगवेगळ्या ठिकाणी होतील. हे आठ सामने अल बायत स्टेडियम, खलिफा इंटरनॅशनल स्टेडियम, अल थुमामा स्टेडियम, अहमद बिन अली स्टेडियम, लुसेल स्टेडियम, स्टेडियम 974, एज्युकेशन सिटी स्टेडियम आणि अल जानौब स्टेडियम आहे. 

भारतात कुठे लाईव्ह पाहू शकता?

भारतीय चाहते फीफा वर्ल्ड कप 2022मधील सर्व सामने स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर लाईव्ह पाहू शकता. लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमावर पाहू शका. भारतात फुटबॉल वर्ल्डकपचे सामने रात्री 8.30 बजे, रात्री 9.30, रात्री 12.30, दुपारी 3.30 आणि संध्याकाळी 6.30 वाजता सुरू होतील. 

अधिक वाचा - कसा जाईल बुधवारचा दिवस ?

फिफा वर्ल्डकपमध्ये या संघांनी जिंकलेत सर्वाधिक खिताब

  1. ब्राझील (5)
  2. जर्मनी (4)
  3. इटली (4)
  4. अर्जेंटिना (2)
  5. फ्रान्स (2)
  6. उरुग्वे (2)
  7. इंग्लंड (1)
  8. स्पेन (1) 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी