FIFA World Cup 2022: पाहा कुठे आणि कधी पाहू शकाल लाईव्ह सामने

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 18, 2022 | 17:29 IST | टाइम्स नाऊ मराठी

FIFA World Cup 2022 : 20 नोव्हेंबरपासून या स्पर्धेला सुरूवात होत आहे. यया वर्ल्डकपमध्ये सहभागी होण्यासाठी 32 संघ कतारमध्ये पोहोचलेत.

FIFA World Cup 2022
FIFA World Cup 2022:पाहा कुठे आणि कधी पाहू शकाल लाईव्ह सामने 
थोडं पण कामाचं
  • या वर्ल्डकपमध्ये सहभागी होण्यासाठी 32 संघ कतारमध्ये पोहोचलेत.
  • मेस्सी आणि रोनाल्डोसाठी यंदाचा हा वर्ल्डकप शेवटचा असू शकतो. 
  • फुटबॉल वर्ल्डकपचा सोहळा पाहण्यासाठी आपले चाहते उत्सुक आहेत.

FIFA WC 2022: फुटबॉलचा कुंभमेळा समजल्या जाणाऱ्या फिफा वर्ल्डकपला सुरूवात होत आहे. फिफा वर्ल्डकप कतारमध्ये सुरू होत आहे. 20 नोव्हेंबरपासून या स्पर्धेला सुरूवात होत आहे. यया वर्ल्डकपमध्ये सहभागी होण्यासाठी 32 संघ कतारमध्ये पोहोचलेत. दरम्यान, मुख्य सामन्यांआधी वॉर्मअपचे सामने रंगणार आहेत. चाहतेही या स्पर्धेसाठी उत्सुक आहेत. मेस्सी आणि रोनाल्डोसाठी यंदाचा हा वर्ल्डकप शेवटचा असू शकतो. 

अधिक वाचा - राहुल गांधींच्या जाहीर सभेत मनसे दाखवणार काळे झेंडे

तुम्हीही फुटबॉल प्रेमी आहात आणि हे फुटबॉलचे सामने कधी आणि कुठे पाहू शकाल याची संपूर्ण माहिती हवी आहे. तर खालील माहिती जरूर वाचा...

फिफा वर्ल्डकपमध्ये किती संघ सहभागी होणार आहेत?

29 दिवसांत 64 सामन्यांमध्ये एकूण 32 संघ सहभागी होणार आहेत. 

भारतात कोणत्या टीव्ही चॅनेलवर FIFA World Cup कतार 2022 ब्रॉडकास्ट होणार आहे.

FIFA World Cup Qatar 2022 चे प्रक्षेपण स्पोर्ट्स 18 आणि स्पोर्ट्स 18 एचडीवर केले जाणार आहे. 

कतार फिफा वर्ल्ड कप 2022 ला भारतात लाईव्ह कसे पाहा अथवा स्ट्रीम कराल

FIFA वर्ल्डकप कतार 2022 ला भारतात jiocinema अॅपवर स्ट्रीम केले जाणार आहे. तुम्ही jiocinema च्या वेबसाईटवर फ्रीमध्ये मॅच पाहू शकता. 

कतार फिफा वर्ल्डकप 2022मध्ये कधी खेळवला जाणार नॉकआऊट मॅच?

पहिला नॉकआऊट राऊंड 3 डिसेंबरपासून सुरू होणार आणि यानंतर 9 डिसेंबरपासून क्वार्टरफायनल आणि 13 डिसेंबरपासून सेमीफायनल होणार आहे. 

स्पर्धेत आहेत हे ग्रुप

फीफा वर्ल्ड कप 2022मधील ग्रुप्स आणि संघ
ग्रुप A
कतार, इक्वाडोर, सेनेगल आणि नेदरलँड (Qatar, Ecuador, Senegal and Netherlands) 

ग्रुप B 
इंग्लंड, इराण, अमेरिका आणि वेल्स (England, Iran, America and Wales)

ग्रुप C
अर्जेंटिना, सौदी अरेबिया, मेक्सिको आणि पोलंड (Argentina, Saudi Arabia, Mexico and Poland)

ग्रुप D 
फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क आणि ट्युनिशिया (France, Australia, Denmark and Tunisia)

ग्रुप E 
स्पेन, कोस्टा रिका, जर्मनी आणि जपान (Spain, Costa Rica, Germany and Japan)

ग्रुप F 
बेल्जियम, कॅनडा, मोरक्को आणि क्रोएशिया (Belgium, Canada, Morocco and Croatia)

ग्रुप G 
ब्राझील, सर्बिया, स्वित्झर्लंड आणि कॅमेरून (Brazil, Serbia, Switzerland and Cameroon)

ग्रुप H 
पोर्तुगाल, घाना, उरुग्वे आणि कोरिया रिपब्लिक (Portugal, Ghana, Uruguay and Republic of Korea)

अधिक वाचा - 'दृश्यम 2' पायरसी साइटवर लीक

भारतात कुठे लाईव्ह पाहू शकता?

भारतीय चाहते फीफा वर्ल्ड कप 2022मधील सर्व सामने स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर लाईव्ह पाहू शकता. लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमावर पाहू शका. भारतात फुटबॉल वर्ल्डकपचे सामने रात्री 8.30 बजे, रात्री 9.30, रात्री 12.30, दुपारी 3.30 आणि संध्याकाळी 6.30 वाजता सुरू होतील. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी