IndvEng Cricket भारत-इंग्लंड पाचव्या कसोटीचा मुहूर्त ठरला

कोरोना संकटामुळे स्थगित केलेल्या भारत-इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटीचा मुहूर्त ठरला. ही कसोटी जुलै २०२२ मध्ये खेळवली जाईल.

fifth test between england and india will be played at edgbaston in july 2022
भारत-इंग्लंड पाचव्या कसोटीचा मुहूर्त ठरला 
थोडं पण कामाचं
  • भारत-इंग्लंड पाचव्या कसोटीचा मुहूर्त ठरला
  • कोरोनामुळे स्थगित झालेली मँचेस्टर कसोटी
  • क्रिकेट स्पर्धांचे नवे वेळापत्रक

मुंबईः कोरोना संकटामुळे स्थगित केलेल्या भारत-इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटीचा मुहूर्त ठरला. ही कसोटी जुलै २०२२ मध्ये खेळवली जाईल. पाचवा सामना १ जुलै २०२२ पासून एजबस्टन येथे सुरू होईल.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत चार सामन्यांनंतर भारत २-१ असा आघाडीवर आहे. आता एजबस्टन कसोटीआधारे मालिकेचा निकाल स्पष्ट होईल.

कोरोनामुळे स्थगित झालेली मँचेस्टर कसोटी

भारत-इंग्लंड यांच्यातील पाचवी कसोटी १० ते १४ सप्टेंबर २०२१ या कालावधीत मँचेस्टर येथे होणार होती. पण भारतीय संघाचे प्रशिक्षक आणि सहाय्यक यांच्यापैकी काही जणांना कोरोना झाला. यानंतर खेळाडूंना क्वारंटाइन करण्यात आले. कोरोनाचा धोका ओळखून भारतीय क्रिकेट बोर्ड आणि इंग्लंड क्रिकेट बोर्ड यांनी परस्परांशी चर्चा केली आणि मँचेस्टर कसोटी स्थगित करण्यात आली.

क्रिकेट स्पर्धांचे नवे वेळापत्रक

भारतीय क्रिकेट बोर्डाशी चर्चा केल्यानंतर इंग्लंडच्या क्रिकेट बोर्डाने पाचव्या कसोटीचे वेळापत्रक तसेच भारत आणि इंग्लंड यांच्यातील २०२२ मध्ये होणाऱ्या अन्य क्रिकेट स्पर्धांचे नवे वेळापत्रक जाहीर केले. आधी १ जुलै २०२२ पासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी २० मालिका आणि वन डे मालिका होणार होती. आता ७ जुलै २०२२ पासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी २० मालिका सुरू होईल. या मालिकेतील सामने अनुक्रमे ७, ९ आणि १० जुलै रोजी एजेस बॉल, एजबस्टन आणि ट्रेंट ब्रिज येथे होतील. यानंतर १२ जुलैपासून ३ सामन्यांची वनडे मालिका होईल. अनुक्रमे १२, १४ आणि १७ जुलै रोजी वनडे मालिकेतील सामने द ओव्हल, लॉर्ड्स आणि ओल्ड ट्रॅफर्ड येथे होतील. दक्षिण आफ्रिकेच्या इंग्लंड दौऱ्यातील सामन्यांना १९ जुलैपासून सुरुवात होणार आहे.

वेळापत्रकातील बदलांना पाठिंबा दिला म्हणून इंग्लंडच्या क्रिकेट बोर्डाने भारताच्या आणि दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डांचे आभार मानले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी