World Test Championship: झाली घोषणा! वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम लढत होणार या मैदानावर 

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jun 04, 2022 | 17:29 IST | टाइम्स नाऊ मराठी

ICC World Test Championship Final Match | आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची दुसरी फेरी जवळपास अर्धी संपली आहे. कोरोना विषाणूचा कहरही आता कमी झाला आहे.

final of the World Test Championship will be played at Lords
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम लढत होणार या मैदानावर   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची दुसरी फेरी जवळपास अर्धी संपली आहे.
  • वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम लढत लॉर्ड्स या मैदानावर होण्याची शक्यता.
  • सध्या पॉइंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाचा संघ आहे.

ICC World Test Championship Final Match | नवी दिल्ली : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची (ICC World Test Championship) दुसरी फेरी जवळपास अर्धी संपली आहे. कोरोना विषाणूचा कहरही आता कमी झाला आहे. अशा परिस्थितीत जगभरातील क्रिकेट देखील आपल्या जुन्या रूळावर येताना दिसत आहे. प्रेक्षकांच्या उपस्थितीत खेळाडू आता आपले कौशल्य दाखवत आहेत. अशा परिस्थितीत आयसीसी २०२३ मध्ये खेळल्या जाणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचे नियोजन करत आहे. (final of the World Test Championship will be played at Lords). 

अधिक वाचा : दुकानांवर मराठी नामफलक लावण्यासाठी ३० जून पर्यंत मुदतवाढ

लॉर्ड्सवर होणार विजेतेपदाची लढाई

आयसीसी क्रिकेटची ओळख समजल्या जाणार्‍या लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर (Lords Cricket Ground) पुढील वर्षी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना आयोजित करण्याची योजना आहे. मागील वर्षीच्या नियोजित वेळापत्रकानुसार, भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील विजेतेपदाचा सामना लॉर्ड्सवर होणार होता, परंतु कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे तो सामना साउथ हॅम्प्टनच्या ॲजेस बाउल स्टेडियमवर आयोजित करावा लागला. 

लवकरच रंगणार फायनलचा थरार

आयसीसीचे अध्यक्ष ग्रेग बार्कले म्हणाले की, "मला वाटते की लॉर्ड्सवर अंतिम सामना आयोजित करण्याची योजना आहे. ही आमची नेहमीच इच्छा राहिली आहे. हा सामना जूनमध्ये खेळवला जाईल. त्यामुळे ज्या ठिकाणी हा सामना आयोजित केला जाण्याची शक्यता आहे त्या हवामानामुळे अनेक ठिकाणे आपोआप शर्यतीतून बाहेर काढली जातील. आता आपण कोरोनाच्या परिस्थितीतूनही बाहेर आलो आहोत. त्यामुळे लॉर्ड्सवर विजेतेपदाचा सामना आयोजित करण्यासाठी आम्हाला संमती घ्यावी लागेल. त्यानंतरच लॉर्ड्सवर त्याचे आयोजन करता येईल. असे त्यांनी अधिक म्हटले. 

अद्याप फायनलच्या संघाची घोषणा झाली नाही

दरम्यान, अद्याप किताबाच्या लढतीसाठी कोणते संघ आमनेसामने असणार याची घोषणा होऊ शकली नाही. पॉइंट टेबलमध्ये सध्या पहिल्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाला पुढील वर्षी ॲशेस मालिकेसाठी इंग्लंडमध्ये यावे लागणार आहे. अशा स्थितीत तो अंतिम फेरीत पोहोचला, तर लॉर्ड्सवर विजेतेपदाची लढत होण्याची शक्यता आणखी वाढत आहे. 

लवकरच होऊ शकते अधिकृत घोषणा

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व ९ संघांनी अंतिम सामन्याच्या ठिकाणाबाबत सहमती दर्शवावी, अशी आयसीसीची इच्छा आहे. त्यानंतर पुढील महिन्यात होणाऱ्या वार्षिक बैठकीत आयसीसीकडून अधिकृतपणे फायनलचा सामना होणाऱ्या स्टेडियमचे नाव जाहीर केले जाऊ शकते. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी