World Athletics Day 2022: जाणून घ्या कधी आणि कुठे साजरा केला होता पहिला ॲथेलेटिक्स डे; काय आहे यामागील उद्देश?

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated May 07, 2022 | 08:58 IST | टाइम्स नाऊ मराठी

World Athletics Day 2022 । जागतिक ॲथलेटिक्स दिवस यावेळी ७ मे रोजी साजरा केला जात आहे. लक्षणीय बाब म्हणजे याची तारीख दरवर्षी बदलत असते, ही तारीख IAAF ठरवते.ॲथलेटिक्स महासंघाचा आंतरराष्ट्रीय संघ IAAF ची स्थापना १७ जुलै १९१२ मध्ये झाली होती.

Find out when and where the first Athletics Day was celebrated
जाणून घ्या कधी आणि कुठे साजरा केला होता पहिला ॲथेलेटिक्स डे  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • जागतिक ॲथलेटिक्स दिवस यावेळी ७ मे रोजी साजरा केला जात आहे.
  • या दिवसाची तारीख दरवर्षी बदलत असते.
  • ॲथलेटिक्स महासंघाचा आंतरराष्ट्रीय संघ IAAF ची स्थापना १७ जुलै १९१२ मध्ये झाली होती.

World Athletics Day 2022 । मुंबई : जागतिक ॲथलेटिक्स दिवस यावेळी ७ मे रोजी साजरा केला जात आहे. लक्षणीय बाब म्हणजे याची तारीख दरवर्षी बदलत असते, ही तारीख IAAF (International Amateur Atheletic Federtaion) ही संस्था ठरवते. ॲथलेटिक्स महासंघाचा आंतरराष्ट्रीय संघ IAAF ची स्थापना १७ जुलै १९१२ मध्ये झाली होती. त्याचे मुख्यालय पूर्वी स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथे होते. मात्र नंतर ते मोनॅकोला येथे हलवण्यात आले. (Find out when and where the first Athletics Day was celebrated). 

अधिक वाचा : बारावीचे निकाल जून महिन्यात जाहीर होणार

२६ वर्षांपूर्वी साजरा केला होता पहिला ॲथेलेटिक्स दिवस 

हा दिवस साजरा करण्याचा प्रमुख उद्देश म्हणजे ॲथेलेटिक्समधील तरूणांचा सहभाग वाढवणे आणि त्यांना त्याकडे अधिकाधिक येण्यास प्रोत्साहित करणे. याशिवाय जगभरातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ॲथलेटिक्सला प्राथमिक खेळ म्हणून प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट आहे. २०१९ मध्ये इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ॲथेलेटिक्स फेडरेशन (IAAF) चे नामांतर करून जागतिक ॲथेलेटिक्स करण्यात आले. 

केव्हा साजरा केला होता पहिला ॲथेलेटिक्स डे

जगातील पहिला ॲथेलेटिक्स डे १९९६ मध्ये अमेरिकेच्या अटलांका शहरात साजरा केला होता. याचा शुभारंभ IAAF तत्कालीन अध्यक्ष प्रिमो नेबिओलो यांनी केले. सध्या याचे अध्यक्ष सेबॅस्टियन को आहेत आणि त्याचे मुख्यालय मोनॅको शहरात स्थित आहे. जागतिक ॲथेलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन दर दोन वर्षांनी केले जाते. २०२१ मध्ये कोरोना महासाथीमुळे ते रद्द करण्यात आले होते, त्यामुळे आगामी जुलै २०२२ मध्ये त्याचे आयोजन करण्यात येणार आहे. 

भारतात ॲथेलेटिक्ससाठी AFI 

भारतात अथेलेटिक्सला प्रोत्साहन देण्याचे काम ॲथेलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाकडे (AFI) आहे. हे IAAF आणि भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) शी संलग्न आहे, AFI ची सुरुवात १९४६ मध्ये झाली. त्याचा उद्देश विद्यार्थ्यांना लहानपणापासून ॲथलेटिक्सबद्दल जागरुक करणे हा आहे जेणेकरून ते ऑलिम्पिक, राष्ट्रकुल आणि आशियाई खेळांसारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करून गौरव मिळवू शकतील. लक्षणीय बाब म्हणजे ॲथेलेटिक्समध्ये मुळात धावणे, उडी मारणे, ट्रॅक आणि फील्ड, रोड रनिंग, क्रॉस कंट्री रनिंग, रेस वॉकिंग, डिस्कस थ्रो, हॅमर थ्रो, भालाफेक, पोल व्हॉल्ट आणि मॅरेथॉन अशा खेळांचा समावेश होतो. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी