CSK विरुद्धच्या सामन्यात RCB टीम काळी पट्टी बांधून का आली, जाणून घ्या कारण

IPL 2022: मंगळवारी चेन्नईविरुद्धच्या सामन्यात बंगळुरूचा संघ मैदानात उतरला तेव्हा सर्व खेळाडूंनी काळ्या पट्ट्या बांधल्या होत्या.

Find out why the RCB team wore a black band in the match against CSK
CSK विरुद्धच्या सामन्यात RCB टीम काळी पट्टी बांधून का आली, जाणून घ्या कारण  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • चेन्नईविरुद्धच्या सामन्यात बंगळुरूचा संघ काळ्या पट्ट्या बांधून मैदानात उतरला
  • चेन्नई सुपर किंग्जला अखेर पहिला विजय मिळाला.
  • रॉबिन उथप्पा आणि शिवम दुबे यांच्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर मोठा स्कोर

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या मोसमातील 22 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघ चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध डीवाय पाटील स्टेडियमवर खेळला. तेव्हा संघाची प्लेइंग इलेव्हन बदलण्यात आली. टाॅस जिंकल्यानंतर बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात संघाचे सर्व खेळाडू काळी पट्टी बांधून खेळताना दिसले. (Find out why the RCB team wore a black band in the match against CSK)

अधिक वाचा : Hardik Pandya Trolled: शमीवर राग काढणे हार्दिकला पडले भारी, सोशल मीडियावर ट्रोल

इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या मोसमातील चेन्नई सुपर किंग्जला अखेर पहिला विजय मिळाला. मंगळवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध झालेल्या सामन्यात संघाने शानदार खेळाच्या जोरावर 23 धावांनी विजय मिळवत गुणांचे खाते उघडले. रॉबिन उथप्पा आणि शिवम दुबे यांच्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर चेन्नईने 4 बाद 216 धावा केल्या. प्रत्युत्तरात बंगळुरूचा संघ 9 गड्यांच्या मोबदल्यात 193 धावाच करू शकला.

अधिक वाचा : IPL: आयपीएलमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या भारताच्या चायनामॅन कुलदीप यादवने केले हे विधान

मंगळवारी चेन्नईविरुद्धच्या सामन्यात बंगळुरूचा संघ मैदानात उतरला तेव्हा सर्व खेळाडूंनी काळ्या पट्ट्या बांधल्या होत्या. संघाचा गोलंदाज हर्षल पटेल यांच्या बहिणीच्या निधनानंतर त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि कुटुंबाला शोक व्यक्त करण्यासाठी ही पट्टी बांधण्यात आली होती. काही दिवसांपासून आजारी असलेल्या हर्षलच्या बहिणीचे रविवारी मुंबईविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात निधन झाले.

अधिक वाचा : IPL 2022: हैदराबादच्या संघाला मोठा झटका; त्रिपाठी नंतर हा खेळाडूही संघाबाहेर 

सामना संपल्यानंतर हर्षल आयपीएलमधील संघासाठी तयार केलेल्या बायो बबलमधून बाहेर पडला. तो संघात कधी सामील होणार याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. टीम बबलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्याला पुन्हा तीन दिवसांच्या क्वारंटाईनमधून जावे लागेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी