ICC World Cup 2019:  या वर्ल्ड कपमध्ये होतंय अस काही, जे यापूर्वी कधी झाले नाही... 

क्रिकेट वर्ल्ड कप २०१९
Updated Jun 13, 2019 | 21:19 IST | टाइम्स नाऊ मराठी

ICC Cricket World Cup 2019 : या वर्ल्ड कपमध्ये असे काही घडतं आहे. जे आतापर्यंत वर्ल्ड कप क्रिकेटच्या ४४ वर्षांच्या इतिहासात कधी झाले नाही. जाणून घेऊ या असं काय घडतं जी चिंतेची गोष्ट आहे... 

cricket world cup
क्रिकेट वर्ल्ड कप २०१९  |  फोटो सौजन्य: AP

नवी दिल्ली :   यावेळी वर्ल्ड कप राऊंड रॉबिन लीग फॉर्मटमध्ये खेळविण्यात येत आहे, जो १९९२ नंतर पहिल्यांदा खेळविण्यात येत आहे. पण हा फॉर्मेट खेळत असताना वर्ल्ड कपच्या काही संघासोबत इंद्रदेवही चांगलाच खेळ खेळताना दिसत आहे. आतापर्यंत एकूण १६ सामने झालेत, त्यातील ३ सामने पावसामुळे रद्द करण्यात आले आहेत. या रद्द झालेल्या सामन्यामुळे अनेक संघांना मोठं नुकसान झाले आहे. 

या वर्ल्ड कपच्या विक्रमांवर नजर टाकली असताना खेळाडू, संघासोबत आता पाऊसही विक्रम करताना दिसत आहे.  या वर्ल्ड कपमध्ये १६ पैकी ३ सामने हे पावसामुळे रद्द करण्यात आले आहेत.असे ४४ वर्षांच्या वर्ल्ड कपच्या इतिहासात सर्वात जास्त वेळा झाले आहे. आतापर्यंत ११ वर्ल्ड कप खेळण्यात आले आहे. यात केवळ २ वेळा पावसामुळे सामने रद्द झाले आहे. पण हा विक्रम यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये पावसाने तोडला आहे आणि नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. 

ICC World Cup 2019

या वर्ल्ड कपमध्ये पावसामुळे तीन सामने रद्द झालेत. त्यातील पहिला सामना हा पाकिस्तान विरूद्ध श्रीलंका असा होता. त्यानंतर वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका आणि तिसरा श्रीलंका विरूद्ध बांग्लादेश यांच्या खेळविण्यात येणार होता. यापूर्वी वर्ल्ड कपच्या इतिहासात केवळ दोन सामने पावसामुळे रद्द झाले होते. त्यातील पहिला सामना १९७९ आणि दुसरा सामना गेल्या वर्ल्ड कपला २०१५ मध्ये झाला होता. 

पहिला सामना पावसामुळे रद्द झाला तो १९७९ मध्ये वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांच्यात ओव्हल मैदानावर खेळविण्यात येणार होता. त्यानंतर दुसरा सामना हा पावसामुळे रद्द झाला तो २०१५ मध्ये, हा सामना ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेश यांच्या खेळविण्यात येणार होता. 

पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही आहे. १३ जूनला भारत आणि न्यूझीलंड यांच्यातही होणाऱ्या सामनावरही पावसाचे सावट आहे. त्यामुळे भविष्यात हे आकडे वाढ शकतात हे पावसाचा एकूण अंदाज पाहता निश्चित आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
ICC World Cup 2019:  या वर्ल्ड कपमध्ये होतंय अस काही, जे यापूर्वी कधी झाले नाही...  Description: ICC Cricket World Cup 2019 : या वर्ल्ड कपमध्ये असे काही घडतं आहे. जे आतापर्यंत वर्ल्ड कप क्रिकेटच्या ४४ वर्षांच्या इतिहासात कधी झाले नाही. जाणून घेऊ या असं काय घडतं जी चिंतेची गोष्ट आहे... 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola