Pele hospitalized दिग्गज फुटबॉलपटू पेले हॉस्पिटलमध्ये!

ब्राझीलचा दिग्गज फुटबॉलपटू पेले हॉस्पिटलमध्ये दाखल झाला आहे. पोटातील ट्युमरवर उपचार करुन घेण्यासाठी पेले हॉस्पिटलमध्ये दाखल झाला आहे

Football legend Pele hospitalized again to undergo colon tumor treatment
दिग्गज फुटबॉलपटू पेले हॉस्पिटलमध्ये! 
थोडं पण कामाचं
  • दिग्गज फुटबॉलपटू पेले हॉस्पिटलमध्ये!
  • पोटातील ट्युमरवर उपचार करुन घेण्यासाठी पेले हॉस्पिटलमध्ये
  • ब्राझीलला तीन वेळा फुटबॉल वर्ल्ड कप जिंकवून देण्यात मोलाचे योगदान देणारे फुटबॉलपटू अशी पेले यांची ओळख

साओ पाउलो: ब्राझीलचा दिग्गज फुटबॉलपटू पेले हॉस्पिटलमध्ये दाखल झाला आहे. पोटातील ट्युमरवर उपचार करुन घेण्यासाठी पेले हॉस्पिटलमध्ये दाखल झाला आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे. तब्येतीत अपेक्षित सुधारणा आढळल्यास लवकरच डॉक्टरांकडून त्याला घरी जाण्याची परवानगी दिली जाईल. 

ब्राझीलला तीन वेळा फुटबॉल वर्ल्ड कप जिंकवून देण्यात मोलाचे योगदान देणारे फुटबॉलपटू अशी पेले यांची ओळख आहे. ते ८१ वर्षांचे आहेत. पेले यांना आधी सप्टेंबर २०२१ मध्ये पोटाच्या ट्युमरवर उपचार करण्यासाठीच हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. शस्त्रक्रियेनंतर जवळपास महिनाभर पेले हॉस्पिटलमध्ये होते. त्यांना केमो थेरपी देण्यात आली होती. आता पुन्हा एकदा पोटाच्या ट्युमरसाठी पेले हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत. 

एकेकाळी पायांच्या जोरावर फुटबॉल नाचवणारा आणि भल्याभल्यांना कोंडीत पकडणारा पेले आता स्वतःच्या पायावर सहजतेने चालू शकत नाही. ब्राझीलमधील कोरोना संकट आणि स्वतःवरील उपचार यांचा विचार केल्यामुळे काही आठवड्यांपूर्वी पेले नैराश्याच्या गर्तेत सापडला होता, असे त्याच्या मुलाने सांगितले. पण पेलेने तो निराश झाल्याचे वृत्त फेटाळले होते. उपचार सुरू आहे आणि लवकरच बरा होईन, असा विश्वास पेलेने व्यक्त केला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी