मेस्सी बार्सिलोना संघ सोडणार

प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी बार्सिलोना संघ सोडणार आहे. स्पॅनिश लीगाच्या नियमांमुळे मेस्सी आणि एफसी बार्सिलोना यांच्या नवा करार होऊ शकला नाही. एफसी बार्सिलोना क्लबने ही माहिती दिली

Lionel Messi Leave Fc Barcelona
मेस्सी बार्सिलोना संघ सोडणार 

थोडं पण कामाचं

  • मेस्सी बार्सिलोना संघ सोडणार
  • एफसी बार्सिलोना क्लबने दिली माहिती
  • नवा करार झाला नाही त्यामुळे मेस्सी क्लब सोडणार

नवी दिल्ली: प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी बार्सिलोना संघ सोडणार आहे. स्पॅनिश लीगाच्या नियमांमुळे मेस्सी आणि एफसी बार्सिलोना यांच्या नवा करार होऊ शकला नाही. एफसी बार्सिलोना क्लबने ही माहिती दिली आणि मेस्सी संघाचा सदस्य नसेल हे सांगताना दुःख होत आहे, असे नमूद केले. 'एफसी बार्सिलोना संघ मेस्सीच्या योगदानाबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. वैयक्तिक, व्यावसायिक जीवनासाठी आणि  भविष्यासाठी त्याला खूप खूप शुभेच्छा', असे क्लबने त्यांच्या निवेदनात म्हटले आहे. याआधी मागच्या महिन्यात झालेल्या कोपा अमेरिका स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मेस्सीच्या नेतृत्वातील अर्जेंटिनाने ब्राझीलचा पराभव केला. Lionel Messi Leave Fc Barcelona

मेस्सी १३ वर्षांचा असल्यापासून बार्सिलोना क्लबसोबत खेळत आहे. चार वर्षे प्रशिक्षण घेतल्यानंतर मेस्सीने बार्सिलोना वरिष्ठ संघासोबत खेळण्यास सुरुवात केली होती. त्याने १७ वर्षात ३५ पुरस्कार जिंकले. बार्सिलोना क्लबकडून खेळताना त्याने ७७८ सामन्यात ६७२ गोल केले. पाचवेळा फीफा प्लेअर ऑफ द इअर असलेल्या मेस्सीने २०१७ या वर्षी नव्याने करार केला होता. हा करार ३० जून २०२१ पर्यंत वाढवण्यात आला होता. बार्सिलोनाने तेव्हा जवळपास ५ हजार ४०० कोटींचा करार केला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी