Kick on flying plane : फुटबॉलरने एका किकमध्ये पाडलं आकाशातून उडणारं विमान, वाचा मैदानात घडलेला आश्चर्यकारक किस्सा

मैदानाजवळून उडत जाणाऱ्या विमानाचा रॉबर्टो यांना एक दिवस इतका राग आला की त्यांनी सर्व शक्ती एकवटत फुटबॉलला किक मारली आणि विमानाच्या दिशेने बॉल भिरकावला. त्याच्या धक्क्याने विमान कोसळलं होतं.

Kick on flying plane
फुटबॉलरने एका किकमध्ये पाडलं आकाशातून उडणारं विमान  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • हवेत उडणारं विमान पाडलं खाली
  • फूटबॉलला किक मारून केली कमाल
  • किस्सा झाला अजरामर

Kick on flying Plane : काही खेळ (Sports) इतके जोशपूर्ण असतात की त्या भरात खेळाडू काहीही करू शकतात. काही खेळांमध्ये खेळाडू आपल्या अचाट ताकदीचं प्रदर्शन करतात. बॉक्सिंग (Boxing) किंवा कुस्तीसारख्या (Wrestling) खेळात आपली ताकद दाखवण्याची संधी खेळाडू अनेकदा घेताना दिसतात. त्यात जर एखादा शक्तीशाली खेळाडू चिडला किंवा जोशात आला तर प्रतिस्पर्धी खेळाडूवर राग काढण्यासाठी तो आपली सगळी ताकद पणाला लावताना अनेकदा दिसतो. काही खेळ मात्र वेगासाठी आणि त्यातील कौशल्यासाठी ओळखले जातात. मात्र त्यातही खेळाडू अनेकदा असं काही करून जातात की तो किस्सा कायमस्वरुपी सगळ्यांच्या लक्षात राहतो. असाच एक किस्सा इतिहासात नोंदवला गेला आहे. हा किस्सा आहे पॅराग्वेचे प्रसिद्ध फूटबॉल खेळाडू (Football Player) रॉबर्टो गॅब्रिएल ट्राएगो (Roberto Gabriel Triago) यांचा. रॉबर्ट जेव्हा 17 वर्षांचे होते, तेव्हा एकदा हवेतून उडत चाललेल्या विमानावर त्यांनी फूटबॉल मारला होता आणि त्याच्या झटक्याने विमान क्रॅश होऊन मैदानात पडलं होतं. 

विमानावर मारला फूटबॉल

आपल्या घरावरून उडत जाणारी विमानं आपण अनेकदा पाहतो. बऱ्याचदा तर ही विमानं एवढ्या कमी उंचीवरून उडत असतात की ती आपल्या अगदी जवळ आहेत, असं वाटतं. प्रत्यक्षात मात्र ती शेकडो फूट उंचीवर असतात आणि सामान्य माणूस अशी कुठलीही गोष्ट त्यांच्यावर फेकून मारू शकत नाही. त्यामुळे एखादा फूटबॉलपटू आपल्या पायाने किक मारून विमान पाडू शकतो, यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र ही गोष्ट आहे सुमारे 60 वर्षांपूर्वीची.

अशी घडली घटना

पॅराग्वेचा खेळाडू रॉबर्ट त्याच्या साथीदारांसोबत मैदानात फूटबॉल खेळत असे. त्यावेळी परिसरातील एका श्रीमंत व्यक्तीने विमान खरेदी केलं होतं आणि ग्राउंडच्या वरून हे विमान ती व्यक्ती उडवत असे. आपल्याकडे विमान आहे हे दाखवून फुशारक्या मारण्याचा त्याचा उद्देश असे. मात्र त्यामुळे मैदानावर फूटबॉल खेळणाऱ्या खेळाडूंना त्रास होत असे. आपण खेळत असलेल्या वेळेत एक तर उंचीवरून विमान उडवावं किंवा खेळण्याच्या वेळा सोडून इतर वेळी ते उडवावं, अशी सूचना वारंवार रॉबर्टने विमानाच्या मालकाला केली होती. मात्र विमानमालक काही त्याचं म्हणणं ऐकायला तयार नव्हता. जर तू आपलं म्हणणं ऐकलं नाहीस तर विमानावर बॉल फेकून मारेल आणि विमान खाली पाडेन, असा इशाराही त्याने दिला होता. मात्र हा इशारा विमानाच्या मालकाने मुळीच गांभिर्याने घेतला नाही. 

अधिक वाचा - Robber Bride : व्यापाऱ्याशी केलं लग्न, मग झाली युरोप टूर आणि घातला गंडा, लाखोंचे दागिने घेऊन बायको फरार

किक मारून पाडलं विमान

घटनेच्या दिवशी रॉबर्टो आणि त्याचे मित्र मैदानात खेळत असताना हे विमान मैदानावरून उडत चाललं होतं. मैदानापासून केवळ 200 मीटर उंचीवर हे विमान होतं आणि खेळाडूंना अधिकाधिक त्रास देण्याच्या उद्देशाने त्याने कमी उंचीवरून हे विमान चालवण्याचा निर्णय घेतला होता. या प्रकाराने रागावलेल्या आणि वैतागलेल्या रॉबर्टोने फुटबॉलला सरळ किक मारत बॉल जोरदार हवेत भिरकावला. हा बॉल प्रचंड वेगाने हवेत गेला आणि आकाशातून उडणाऱ्या विमानाच्या इंजिनावर जोरदार आदळला. त्यानंतर विमान बिघडलं आणि क्रॅश होऊन मैदानावरच कोसळलं. 

अधिक वाचा - Terrorist attack alert:Punjab मध्ये दहशतवादी हल्ल्याचा इशारा; ISI रचतेय चंदीगड, मोहालीमध्ये हल्ल्याचा कट

80 वर्षांचे रॉबर्टो

रॉबर्टो आज 80 वर्षांचे झाले आहेत. आजही हा किस्सा ऐकवताना त्यांच्या डोळ्यात चमक असते. आता ते मैदानही उरलं नाही आणि ज्या क्लबसाठी ते खेळत होते, तो क्लबही उरला नाही. मात्र हा ऐतिहासिक किस्सा आठवणींच्या रुपात अजरामर झाला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी