Cristiano Ronaldo newborn baby dies | नवी दिल्ली : पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो आणि त्याची जोडीदार जॉर्जिना रॉड्रिग्ज यांनी सोमवारी आपल्या नवजात मुलाचे (Cristiano Ronaldo’s Newborn Baby Boy Dies) निधन झाल्याची माहिती दिली. रोनाल्डोने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सोशल मीडियावर खुलासा केला होता की आम्हाला जुळ्या मुलांची अपेक्षा आहे. मँचेस्टर युनायटेडच्या ट्विटर अकाऊंटवर एक पोस्ट जारी करण्यात आली, ज्यामध्ये त्यांनी मुलीला जन्म दिल्याचे म्हटले आहे. (Footballer Cristiano Ronaldo's newborn son dies).
अधिक वाचा : लेफ्टनंट जनरल मनोज पांडे नवे लष्करप्रमुख, पहिला इंजिनियर
रोनाल्डो आणि जॉर्जिना रॉड्रिग्ज यांनी दोघांनी संयुक्त स्वाक्षरी केलेल्या निवेदनात म्हटले की, “आम्ही अत्यंत दुःखाने जाहीर करतो की आमचा नवजात मुलगा या जगात नाही. ही एक मोठी वेदना आहे जी कोणत्याही पालकांच्या पदरी पडली नाही पाहिजे. केवळ आमच्या मुलीच्या जन्माने आम्हाला या क्षणी आशा आणि आनंदाने जगण्याचे बळ दिले आहे. आम्ही डॉक्टर आणि परिचारिकांचे आभार मानतो ज्यांनी त्याची अत्यंत देखरेख आणि काळजी घेतली. या मुलाच्या जाण्याने आम्हा सर्वांना खूप दुःख झाले आहे आणि आम्ही या अत्यंत कठीण काळात तुमच्या कडून गोपनियतेची अपेक्षा करत आहोत."
रोनाल्डो रिअल माद्रिदमध्ये असताना जॉर्जिनाला भेटला. या दाम्पत्याला चार वर्षांची एक मुलगी आहे. रोनाल्डोला आणखी तीन मुले आहेत. क्रिस्टियानो रोनाल्डोच्या दुःखात मँचेस्टर युनायटेड क्लबही सहभागी झाला आहे. क्लबने ट्विट केले की, "तुमचे दु:ख आमचेही आहे, क्रिस्टियानो. यावेळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला यावेळी प्रेम आणि हे दु:ख सहन करण्यासाठी ताकद देत आहोत.
लक्षणीय बाब म्हणजे क्रस्टियानो रोनाल्डो आणि त्याची जोडीदार जॉर्जिना यांनी ऑक्टोबर महिन्यात विवाह केला. ते जुळ्या बाळाचे आई-वडील होणार होते. दोघांनी रूग्णालयात एक एकत्र फोटोही शेअर केला होता. या फोटोतील एका मुलाचा मृत्यू झाला. तर मुलगी सुरक्षित आहे.