Michael Slater Arrested ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मायकेल स्लेटरला अटक

ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाकडून खेळलेला माजी सलामीवीर मायकेल स्लेटर याला पोलिसांनी सिडनीतून अटक केली. स्लेटरवर कौटुंबिक हिंसेचा आरोप आहे.

Former Australia Opener Michael Slater Arrested Over Domestic Violence Allegation
ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मायकेल स्लेटरला अटक 
थोडं पण कामाचं
  • ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मायकेल स्लेटरला अटक
  • स्लेटरवर १२ ऑक्टोबर रोजी कौटुंबिक हिंसा केल्याचा आरोप
  • स्लेटरने २००४ मध्ये निवृत्ती स्वीकारली

सिडनी: ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाकडून खेळलेला माजी सलामीवीर मायकेल स्लेटर याला पोलिसांनी सिडनीतून अटक केली. स्लेटरवर कौटुंबिक हिंसेचा आरोप आहे. काही दिवसांपूर्वी घडलेल्या एका घटनेप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली.

न्यू साऊथ वेल्स पोलिसांनी ५१ वर्षांच्या मायकेल स्लेटरला सिडनीच्या उत्तरेकडील समुद्र किनाऱ्याजवळच्या परिसरातून अटक केली. स्लेटरवर १२ ऑक्टोबर रोजी कौटुंबिक हिंसा केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात तपास सुरू आहे.

स्लेटरने २००४ मध्ये निवृत्ती स्वीकारली. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ५३१२ धावा केल्या होत्या. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार मेनली पोलीस ठाण्याचे अधिकारी सकाळी ९.२० वाजता एका घरात गेले. तिथे स्लेटरशी बातचीत केली, त्याला काही प्रश्न विचारले. अखेर स्लेटरला अटक करण्यात आली. 

मायकेल स्लेटर ऑस्ट्रेलियाकडून १९९३ ते २००१ दरम्यान ७४ कसोटी सामने आणि ४२ एकदिवसीय सामने खेळला होता. मागील पंधरा वर्षांपासून तो समालोचन करत आहे. पण मागच्याच महिन्यात सेव्हन नेटवर्क क्रिकेटच्या समालोचकांच्या समितीमधून त्याला काढण्यात आले. 

स्लेटर २०२१च्या आयपीएलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून समालोचनासाठी भारतात आला होता. मात्र कोरोना संकटाची तीव्रता वाढली आणि तो मायदेशी परतला. याआधी ऑस्ट्रेलिया सरकारने सुरुवातीला भारतातून थेट ऑस्ट्रेलियात कोणालाही प्रवेश मिळणार नाही; कोरोना निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट दाखवला तरी क्वारंटाइन राहावे लागेल, अशी अट घातली होती. या अटीमुळे स्लेटर नाराज झाला होता. त्याने ऑस्ट्रेलिया सरकारच्या निर्णयावर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. काही दिवसांनी हा निर्णय बदलण्यात आला. यानंतर स्लेटर मायदेशी परतला. मायदेशी परतलेल्या स्लेटरवर वर्षाच्या आत अटकेच्या रुपाने मोठे संकट कोसळले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी