मुंबई: भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीने(virat kohli) आफ्रिकेविरुद्धच्या(india vs south africa) सामन्यात अखेरचे नेतृत्व केले. तो आता क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून कर्णधार(captain) म्हणून निवृ्त्त झालाय. मात्र तो आता केवळ एक क्रिकेटर म्हणून खेळत राहणार आहे. त्याने कर्णधार असलेल्या शेवटच्या कसोटी सामन्यातील दोन डावांत अनुक्रमे ७९ आणि २९ धावा केल्या. त्यानंतर बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून फलंदाजांची कसोटी रँकिंग(test ranking) जाहीर करण्यात आली. यात त्याने दोन स्थानांनी झेप घेत तो सातव्या स्थानावर पोहोचला आहे. former captain virat kohli on 7th spot in icc test rankings
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक कसोटीच्या दुसऱ्या डावात नाबाद शतक ठोकणाऱ्या ऋषभ पंतने तब्बल १० स्थांनांनी झेप घेत १४वे स्थान गाठले आहे. त्याची ही चांगली कामगिरीच म्हणावी लागेल.
केपटाऊनमधील कसोटीत सहा विकेट मिळवणारा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने टॉप १० गोलंदाजांच्या यादीत स्थान मिळवले आहे. द. आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत भारताचा १-२ने पराभव झाल्यानंतर कोहलीने कसोटी कॅप्टनशिप सोडण्याचा निर्णय घेतला. त्याचा कर्णधार म्हणून सात वर्षांचा प्रवास संपला.
रँकिंगच्या आठवड्याच्या अपडेटमध्ये केपटाऊनमध्ये भारत आणि द. आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या कसोटीतील कामगिरीनंतर हा बदल झाला. यजमान संघाने ही कसोटी सात विकेटनी जिंकत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकली.
सामन्यात ७२ आणि ८२ धावांची खेळी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या विजयात महत्त्वाची भूमिका साकारणार कीगन पीटरसनने ६८ स्थानावरून मोठी झेप घेत ३३वे स्थान गाठले आहे. पीटरसनला मालिकेत सर्वाधिक २७६ धावा केल्यासाठी मालिकेत सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवडण्यात आले.
त्याने मालिकेची सुरूवात १५८व्या स्थानाने केली होती. टेम्बा बावुमा फलंदाजांच्या रँकिंगमध्ये सात स्थानांनी वर जात २८व्या आणि रासी वॅन डेर डुसेन १२स्थानांनी झेप घेत ४३व्या स्थानावर पोहोचला आहे. वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडा आणि लुंगी एनगिडीच्या रँकिंगमध्येही सुधारणा झाली आहे.
इंग्लंडविरुद्ध अॅशेस मालिकेतील पाचव्या सामन्यात सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवडण्यात आलेला ऑस्ट्रेलियाचा ट्रेविस हेड फलंदाजांच्या रँकिंगमध्ये करिअरमध्ये सर्वोत्कृष्ट पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. होबार्टमध्ये पहिल्या डावात १०१ धावा करणाऱ्या हेडने मालिकेत सर्वाधिक ३५७ धावा केल्या त्यानंतर त्याला सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवडण्यात आले. त्याला सात स्थानांनी फायदा होत तो रोहित शर्मासह संयुक्तपणे पाचव्या स्थानावर आहे.