मुंबई: क्रिकेट(cricket जगतावर एका बातमीने शोककळा पसरली आहे. खरंतर, क्रिकेटच्या दुनियेतील एक प्रसिद्ध अंपायरचे(umpire) अचानक निधन झाले आहे. माजी क्रिकेट अंपायर रूडी कर्टंजन(rudi koertzen) यांचे वयाच्या ७३व्या वर्षी निधन(passed away) झाले आहे. रूडी कर्टंजन यांचे कार अपघातात(car accident) निधन झाले. former cricketer and umpire rudi koertzen passed away in accident
अधिक वाचा - कोणाला कोणती खाती.., मोदी-शाह पुन्हा वापरणार धक्कातंत्र?
दक्षिण आफ्रिकेचे दिग्गज अंपायर रूडी कर्टंजन यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या ३३१ सामन्यांमध्ये अंपायरिंग केली होती. दक्षिण आफ्रिकेच्या मीडियानुसार रूडी कर्टंजन यांचा ९ ऑगस्टला सकाळी रिव्हर्सडेल परिसरात अपघात झाला. या अपघातात रुडी कर्टंजन यांच्याशिवाय तीन आणखीही लोक होते त्यांचाही यात मृत्यू झाला आहे. कर्टंजन नेल्सन मंडेला बे पसिरात राहणारे होते आणि वीकेंडमध्ये गोल्फ खेळल्यानंतर केपटाऊनवरून परतत होते.
Your childhood as a cricket fan would be incomplete if you hadn't imitated Rudi Koertzen's slow finger raise 💙 — Mumbai Indians (@mipaltan) August 9, 2022
Rest in peace, Rudi. pic.twitter.com/HHXxmmN3rQ
Tragic news of the sudden passing away of Rudi Koertzen. He was a gifted individual and one of the finest umpires the game has witnessed, known for his sharp decision making abilities. — Yuvraj Singh (@YUVSTRONG12) August 9, 2022
My deepest condolences to his family and well wishers 🙏🏻 #RudiKoertzen pic.twitter.com/9mV1V09F7a
रूडी कर्टजन यांनी ३३१ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अंपायरिंग केली आहे. या दरम्यान त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये १०८ आणि वनडे आंतरराष्ट्रीय २०९ सामन्यांमध्ये अंपायरिंग केली. तर टी-२० आंतरराष्ट्रीय मध्ये १४ सामन्यांमध्ये अंपायरिंग केली. इतकंच नव्हे तर रूडी कर्टजन यांनी एका महिला टी-२० सामन्यातही अंपायरिंग केली होती.
रुडी कर्टंजनचा यांचा मुलगा अल्गोवा एमएम न्यूजला सांगितले की तिच्या वडिलांना डोक्याला दुखापत झाली आहे. यातच त्यांचे निधन झाले. रूडी कर्टंजन यांच्या मुलाने सांगितले की ते आपल्या काही मित्रांसह गोल्फ स्पर्धा खेळण्यासाठी गेले होते. ते सोमवारी परत येणार होते. त्यांनी गोल्फचा आणखी एक राऊंड खेळण्याचा निर्णय घेतला.
Vale Rudi Koertzen ! Om Shanti. Condolences to his family. — Virender Sehwag (@virendersehwag) August 9, 2022
Had a great relation with him. Whenever I used to play a rash shot, he used to scold me saying, “Play sensibly, I want to watch your batting”.
One he wanted to buy a particular brand of cricket pads for his son (cont) pic.twitter.com/CSxtjGmKE9
अधिक वाचा - राठोडांना मंत्रिपद दिल्यानंतर चित्रा वाघांना सेनेची खुली ऑफर
रूडी कर्टजन क्रिकेटच्या इतिहासातील सन्माननीय अंपायरर्सपैकी एक आहेत. त्याच्या धीम्या गतीने फलंदाजाला बाद घोषित करण्याची स्टाईल आजही क्रिकेट रसिकांच्या लक्षात आहे. ते १९८१मध्ये अंपायर बनले आणि १९९२मध्ये जेव्हा भारताने दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. तेव्हा त्यांनी पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय सामन्यात अंपायरिंग केली. ४३ व्या वर्षी ते पोर्ट एलिझाबेथमध्ये आपली पहिली कसोटी खेळण्यास उभे झाले. ही पहिली मालिका होती ज्यात टेलिव्हिजन रिप्लेचा उपयोग रनआऊट तपासण्यासाठी केला होता. विशेष म्हणजे रूडी कर्टजन पुरुष क्रिकेटच्या इतिहासात दुसऱ्या नंबरचे सर्वाधिक सामन्यांमध्ये अंपायर करणारे व्यक्ती होते.