क्रेग मॅकडरमोटच्या मुलाचा वयाच्या २९व्या वर्षीच क्रिकेटला अलविदा

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jul 31, 2020 | 19:49 IST | टाइम्स नाऊ मराठी

alister mcdermott: मॅकडरमोटने २००९मध्ये १८ वर्ष वयामध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तो २०११मध्ये राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्याच्या जवळपास होता. 

alister
वयाच्या २९व्या वर्षी अॅलिस्टर मॅकडरमोटचा क्रिकेटला अलविदा 

थोडं पण कामाचं

  • अॅलेस्टर मॅकडरमोटने वयाच्या २९व्या वर्षी क्रिकेटमधून संन्यास घेतला
  • मॅकडरमोटने २००९मध्ये १८व्या वर्षी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. 
  • बिग बॅश लीगच्या दुसऱ्या सत्रात विजेतेपद पटकावणाऱ्या ब्रिसबेन हीट संघात तो होता. 

मेलबर्न: सातत्याने दुखापतीमुळे त्रस्त असलेल्या क्वीन्सलँडचा वेगवान गोलंदाज आणिऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेट क्रेग यांचा मुलगा अॅलेस्टर मॅकडरमोटने वयाच्या अवघ्या २९व्या वर्षी क्रिकेटला अलविदा म्हटले आहे. मॅकडरमोटने २००९मध्ये वयाच्या १८व्या वर्षी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तो २०११मध्ये राष्ट्रीय संघात जागा मिळवण्याच्या जवळपास होता. आपल्या संघासोबत शेफिल्ड शील्ड आणि वनडे खिताब जिंकण्याशिवाय तो बिग बॅश लीगच्या दुसऱ्या सत्रात विजेतेपद मिळवणाऱ्या ब्रिसबेन संघाचा भागही होता. वयाच्या २२व्या वर्षात त्याने हे यश संपादन केले होते. 

यानंतर सातत्याने होणाऱ्या दुखापतींचा परिणाम त्याच्या करिअरवर झाला. याचमुळे त्याने पुनरागमन करूनही त्याला अखेर क्रिकेटमधून रिटायरमेंट घ्यावी लागली. त्याने आपल्या वेबसाईटवर लिहिले, गेल्या सत्रातील सुरूवातीचे सात महिने माझ्यासाठी संघर्षपूर्ण होते. हे माझ्या करिअरसाठी मानसिकदृष्ट्या खूपच आव्हानात्मक वेळ होती. मी सातत्याने दुखापती झेलत होतो. दोन महिन्यातच माझ्या हाताच्या हाडाला दुखापत झाली होती.

रिटायरमेंट घेतल्यानंतर आता अॅलिस्टर आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवणार आहे तसेच तो क्रिकेट कोचिंग व्यवसायावरही फोकस करणार आहे. अॅलिस्टरने २० प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ७५ विकेट मिळवल्या. 

अॅलिस्टरचे वडील क्रेग मॅकडरमोट हे ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटरआहेत. १९८४ ते १९९६ दरम्यान ते ऑस्ट्रेलियासाठी ७१ कसोटी सामने खेळले. यात त्यांनी २९१ विकेट घेतल्या. २०११ ते २०१६ दरम्यान ते ऑस्ट्रेलियन संघाचे बॉलिंग कोचही होते. २२ डिसेंबर १९८४मध्ये त्यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी संघात पदार्पण केले. तर २५ जानेवारी १९९६मध्ये त्यांनी कसोटी क्रिकेटला अलविदा केला. ६ जानेवारी १९८५मध्येच वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने वनडेतही पदार्पण केले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी