IND vs NZ: गौतम गंभीर विराटबद्दल बोलला असं काही की...

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 02, 2021 | 15:28 IST | टाइम्स नाऊ मराठी

T20 World Cup च्या दुसऱ्या सामन्यात जेव्हापासून टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात पराभव पाहावा लागला तेव्हापासून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सर्वांच्या निशाण्यावर आहे. 

gautam gambhir
IND vs NZ: गौतम गंभीर विराटबद्दल बोलला असं काही की... 
थोडं पण कामाचं
  • गंभीरच्या विधानाने खळबळ
  • कोहलीवर केली जोरदार टीका
  • न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर सुरू झाला गोंधळ

मुंबई: टीम इंडियाला(team india) टी-२० वर्ल्डकपचया(t-20 world cup) सलग दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध(new zealand) ८ विकेटनी पराभव स्वीकारावा लागला. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्यांना १० विकेनी पराभवास सामोरे जावे लागले होते. सलगच्या दोन पराभवांमुळे भारताचा सेमीफायनलचा मार्ग आता कठीण झाला आहे. अशातच माजी क्रिकेटर गौतम गंभीरने टीम इंडियावर जोरदार टीका केली आहे. former cricketer gautam gambhir says about virat kohli

गंभीरने काढला राग

भारताचा न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात पराभव झाल्यानंतर भारताचा माजी क्रिकेटर गौतम गंभीरने कोहलीवर जोरदार टीकास्त्र सोडले. तो म्हणाला, कोहलीकडे प्रतिभा आहे मात्र आयसीसी स्पर्धेत मोठ्या नॉकआऊट सामन्यांमध्ये जिंकण्यासाठी त्याच्यात आत्मविश्वासाची कमतरता आहे. आयसीसी वर्ल्डकपमध्ये भारत दबावात आल्यानंतर पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धचे सामने हरला. यावर गंभीर म्हणाला, भारतीय संघात टॅलेंटची कमतरता नाही मात्र महत्त्वाचे सामने जिंकण्यासाठीचा आत्मविश्वास कमी आहे. 

भारतीय संघात आत्मविश्वासाची कमतरता

गंभीर म्हणाला, तुमच्याकडे सगळ्या प्रकारचे टॅलेंट आहे. आणि तुम्ही द्विपक्षीय आणि इतर गोष्टींमध्ये चांगली कामगिरी करता. मात्र जेव्हा मोठे सामने असतात तेव्हा तुम्हाला पुढे होऊन चांगली कामगिरी करायची असता. यात चुकीला माफी नसते. गंभीरने पुढे सांगितले की हा सामना खरोखर क्वार्टरफायनलसारखा होता. मात्र आत्मविश्वासाची कमतरता होती. 

कोहलीबाबत म्हणाला असं काह...

ESPN क्रिकइंफोशी बोलताना गंभीर म्हणाला, असं नाही आहे की कोहली आता दबावात चांगली कामगिरी करू शकत नाही मात्र हा तो गरजेच्या सामन्यांमध्ये कामगिरी करू शकत नाही आहे. तो नॉकआऊट सारख्या सामन्यांमध्ये मोठी धावसंख्या उभारू शकत नाही आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी