Navjot Singh Sidhu's: प्रॉपर्टीचा ताबा घेऊन सिद्धूने आईला घराबाहेर काढले, बहिणीचा आरोप

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jan 28, 2022 | 17:01 IST | टाइम्स नाऊ मराठी

suman toor allegations on navjyot singh Sidhu's: पंजाब विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धूने एका आरोपाच्या वादात अडकताना दिसत आहेत. सिद्धूवर त्यांच्या मोठ्या बहिणीने आरोप लावले आहेत. 

sidhu and sister
'प्रॉपर्टीचा ताबा घेऊन सिद्धूने आईला घराबाहेर काढले' 
थोडं पण कामाचं
  • नवज्योत सिंह सिद्धूच्या बहिणीने लावलेत आरोप
  • सिद्धूची बहीण सुमन म्हणाली क्रूर माणूस आहे सिद्धू, पैशांसाठी आईला सोडले
  • १९८६मध्ये वडिलांच्या मृत्यूनंतर सिद्धूने आपल्या वृ्द्ध आईला सोडले होते

चंदीगड: क्रिकेटर ते नेता असा प्रवास केलेले पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवज्योत सिंह सिद्धू(navjot sidhu) याची मोठी बहीण सुमन तूरने(suman toor) शुक्रवारी मोठा खुलासा करताना आपल्या भावावर गंभीर आरोप केले आहेत. माजी क्रिकेटरच्या बहिणीने आरोप केला की १९८६मध्ये वडील भगवंत सिंह यांच्या निधनानंतर सिद्धूने आपल्या वृद्ध आईला(mother) घराबाहेर काढले. चंदीगडमध्ये(chandigarh) मीडियाशी बोलताना ७० वर्षीय सुमन तूर जी अमेरिकेत राहते तिने दावा केला की तिच्या आईचा मृत्यू १९८९मध्ये एक निराधार महिला म्हणून झाला होता. सुमन तूर यांचे विधान अशा वेळेस समोर आले आहे जेव्हा पंजाब विधानसभा निवडणुकीचा(punjab assembly election 2022) प्रचार ऐन रंगात आला आहे.

दुसरीकडे नवज्योत सिंह सिद्धूवर त्यांची बहीण सुमनने लावलेल्या आरोपांवर सिद्धूची पत्नी नवज्योत कौरनी सांगितले की सिद्धूच्या वडिलांची दोन लग्ने झाली होती आणि त्यांच्या पहिल्या पत्नीपासून त्यांना १ मुली होत्या. सिद्धू आणि त्याच्या पत्नीला त्यांच्याबाबत माहिती नाही. 

भावूक झाली सुमन

मीडियाशी बोलताना सुमन तूर भावूक झाल्या. त्या म्हणाल्या, माझ्या वडिलांचे निधन १९८६मध्ये झाले होते आणि यानंतर त्याने स्पष्टपणे माझ्या आईला सांगितले होते की तिच्यासाठी या घरात कोणतीही जागा नाही. घरातून बाहेर काढल्यानंतर माझ्या आईने त्याला कधीच काही विचारले नाही. तूर यांनी दावा केली की त्यांच्या आईचा १९८९मध्ये एका रेल्वे स्टेशनवर मृत्यू झाला होता. सुमन तूर पुढे म्हणाल्या, आम्ही खूप कठीण प्रसंग बघितले आहेत. माझी आई चार महिने रुग्णालात होती. मी जे काही दावे करत आहे त्याचे माझ्याकडे पुरावे आहेत. 

सिद्धूने खोटे सांगितले

सुमनने सांगितले, एका मुलाखतीत सिद्धूने दावा केला होता की मी दोन वर्षे वयाचा असताना माझे आई-वडील न्यायाने वेगळे झाले होते. तो खरंच दोन वर्षाचा दिसतो का? नवज्योत सिंह सिद्धूच्या या दाव्यानंतर आमच्या आईने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. माझी आई लुधियानाला गेली आणि त्याला विचारले की तु असे खोटे का बोलत आहे? त्यावर तो म्हणाला, हे मी नाही तर दुसऱ्या कोणीतरी म्हटले. 

अधिक वाचा - महाराष्ट्र एनसीसीने पटकावला पंतप्रधान ध्वज

विरोधी पक्षाकडे नवे हत्यार

सुमन तूर यांनी दावा केला की त्यांनी सिद्धूला भेटण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने भेटण्यास नकार दिला. सुमनने सांगितले, सिद्धूशी संपर्क करण्याचे प्रयत्न फोल गेल्यानंतर मी  प्रेस कॉन्फरन्ससाठी घेण्यासाठी भाग होते. त्याने मला त्याच्या फोनवरून ब्लॉक केले. त्याचे नोकरही दरवाजा उघडत नाहीत. मला माझ्या आईसाठी न्याय हवा आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी