कोहली-अश्विन यांच्यातील नात्यावर माजी इंग्लंड क्रिकेटरने केले सवाल

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 02, 2021 | 16:28 IST | टाइम्स नाऊ मराठी

t-20 world cup 2021: विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विन यांच्यातील नात्यावरून पुन्हा एकदा सवाल केले जात आहेत. इंग्लंडचा क्रिकेटर निक कॉम्पटनने सवाल केले आहेत. 

r ashwin
कोहली-अश्विन यांच्यातील नात्यावर माजी क्रिकेटरचे सवाल 
थोडं पण कामाचं
  • टी-२० वर्ल्डकप २०२१ मध्ये खराब कामगिरीमुळे कर्णधार विराट कोहलीवर सगळ्या बाजूंनी टीका केली जात आहे
  • हा मुद्दा आहे की रवीचंद्रन अश्विन आणि विराट कोहलीसगळ्या बाजूंनी टीका केली जात आहे. यांच्यातील नाते.
  • क्रिकेटच्या जगातील अनेक एक्सपर्ट्स सातत्याने सवाल करत आहेत की अनुभवी स्पिनर रवीचंद्रन अश्विनला संघात का स्थान दिले जात नाही आहे.

मुंबई : भारतीय संघाची(indian team) टी-२० वर्ल्डकप २०२१(t-20 world cup 2021)मध्ये खराब कामगिरीमुळे कर्णधार विराट कोहलीवर(virat kohli) यातच आणखी एक मुद्दा समोर आला आहे. हा मुद्दा आहे की रवीचंद्रन अश्विन आणि विराट कोहलीसगळ्या बाजूंनी टीका केली जात आहे. यांच्यातील नाते. नुकत्याच झालेल्या इंग्लंड दौऱ्यावर अश्विनला संपूर्ण मालिकेदरम्यान बाहेर ठेवले होते. असेच काहीसे टी-२० वर्ल्डकपमध्ये पाहायला मिळत आहे. former cricketer nick compton question on kohli-ashwin relation

क्रिकेटच्या जगातील अनेक एक्सपर्ट्स सातत्याने सवाल करत आहेत की अनुभवी स्पिनर रवीचंद्रन अश्विनला संघात का स्थान दिले जात नाही आहे. यावरून इंग्लंडचा माजी क्रिकेटर निक कॉम्पटनने सरळ सरळ कोहली आणि अश्विन यांच्यातील नात्याला जबाबदार ठरवले आहे. 

कॉम्पटनने रविवारी भारताच्या पराभवानंतर ट्वीट करताना लिहिले, मला समजत नाही आहे की कर्णधार विराट कोहलीसोबत अनफ्रेंडली रिलेशनमुळे अश्विनला संघात जागा मिळालेली नाही. तुम्हाला वाटते का कर्णधाराला इतकी पॉवर मिळाली पाहिजे. 

काही दिवसांपूर्वी अशाही बातम्या मीडिया रिपोर्ट्सच्या हवाल्याने आल्या होत्या की वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलनंतर ज्या खेळाडूने सचिव जय शाह यांच्याकडे विराट कोहलीच्या वागणुकीाबत तक्रार केली होती तो अश्विन होता. दरम्यान, त्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांचीही नावे समोर आली. 

याशिवाय इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाने चार कसोटी सामने खेळले होते. चारही कसोटी सामन्यांमध्ये अश्विनला अंतिम ११मध्ये स्थान मिळाले नव्हते. यानंतर अनेकदा भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या या निर्णयावर सवाल केले जात होते तसेच अनेक अटकळीही होत्या की दोघांमध्ये सगळं आलबेल आहे ना? सध्याच्या वर्ल्डकपसाठी रवींचंद्रन अश्विनची दार्घकाळानंतर भारताच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघात पुनरागमन झाले होते. सराव सामन्यात अश्विनने शानदार गोलंदाजी केली होती. आयपीएलमध्येही त्याची कामगिरी ठीकठाक होती. अशातच त्याला अंतिम ११मध्ये स्थान न दिले गेल्याने अनेकांच्या मनात सवाल उपस्थित होत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी