मुंबई: क्रीडाजगतासाठी एक दुख:दायक बातमी समोर आली आहे. मुंबईचे माजी खेळाडू आणि महान क्रिकेटर वीनू मांकड(vinoo mankad) यांचे चिरंजीव राहुल मांकड(rahul mankad) यांचे लंडनमध्ये निधन झाले आहे. ते चांगले फलंदाज होते. त्यांच्या क्लासिक फलंदाजीचे अनेक चाहते होते. ते ६६ वर्षांचे होते. former cricketer rahul mankad passed away in london
अधिक वाचा - 'क्षीरसागर जिल्ह्यातला आतापर्यंत सर्वात थर्डक्लास आमदार'
भारताचे माजी क्रिकेटर राहुल मांकड यांचे लंडनमध्ये अचानक निधन झाले. मुंबईचे माजी खेळाडू शिशिर हतंगडी यांनी फेसबुक पोस्टवरू राहुल मांकड यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला. त्यांनी लिहिले. जिग्गाभाई. माझा मित्र राहुल मांकड यांच्या आत्म्याला देव शांती देवो. राहुल मांकड यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि दोन मुली आहेत.
राहुल मांकड यांनी ४७ फर्स्ट क्लास सामने खेळले. यात त्यांनी २,१११ धावा केल्या. त्यांचा सर्वोत्कृष्ट स्कोर १६२ होता. त्यांनी पाच शतके आणि १२ अर्धशतके ठोकलीत. त्यांचे कुटुंब क्रिकेटशी जोडले गेले. त्यांचे भाऊ अशोक आणि अतुल मांकड हे ही क्रिकेटर होते. अशोक यांनी जेव्हा भारकाचचे प्रतिनिधित्व केले होते तेव्हा अतुल डोमेस्टिक स्तरावर क्रिकेट खेळत होता. राहुल मांकड १९७२-८३पासून ते १९८४-८५ पर्यंत क्रिकेट खेळले.
अधिक वाचा - मुंबईत मिळाले नाही घर, शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याची खंत
माजी क्रिकेट टी ए सेकर यांनी निधानावर शोक व्यक्त करत ट्वीट केले, राहुल मांकड यांच्या निधनाची बातमी ऐकून स्तब्ध झालो. ते चांगले व्यक्ती, चांगले क्रिकेटर आणि महान व्यक्ती होते.