माजी क्रिकेटर विनोद कांबळीला इतक्या रुपयांच्या पगाराची ऑफर, क्रिकेट सोडून करावे लागेल हे काम

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Aug 23, 2022 | 17:39 IST | टाइम्स नाऊ मराठी

Maharashtra Businessman Offers Job to Vinod Kambli:भारताचा माजी कर्णधार विनोद कांबळी सध्या आर्थिक समस्येने ग्रस्त आहे. तो कुटुंबासह मुंबईत राहत आहे. 

vinod kambli
माजी क्रिकेटर विनोद कांबळीला इतक्या रुपयांच्या पगाराची ऑफर 
थोडं पण कामाचं
  • कांबळीने भारतासाठी १०४ वनडे आणि १७ कसोटी सामने खेळलेत. 
  • त्याने वनडेत २४७७ आणि कसोटीत १०८४ धावा केल्यात.
  • कांबळे १९९१ ते २००० पर्यंत संघाचा भाग होता. 

मुंबई: एकेकाळी भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य भाग राहिलेल्या माजी क्रिकेटर विनोद कांबळीची(vinod kambli) आर्थिक स्थिती चांगली नाही आहे. आपल्या लाईफस्टाईलसाठी(lifesyle) चर्चेत राहणाऱ्या कांबळीवर आज पैशांसाठी नोकरी मागण्याची वेळ आली आहे. तो आपल्या कुटुंबासह मुंबईत राहतो. त्याचे कुटुंब भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (bcci)मिळणाऱ्या ३० हजार रूपयांच्या पेन्शनवर गुजराण करत आहे. नुकतेच कांबळीने एका मुलाखतीत आपल्या आर्थिक स्थितीबाबत खुलेपणाने चर्चा केली होती. त्यावेळी त्याने कामाची खूप गरज असल्याचे सांगितले होते. former cricketer vinod kamble get 1 lakh per month salary offer

अधिक वाचा - 'या' डान्सरविरोधात लखनऊ न्यायालयाचे अटकेचे आदेश

कांबळीला मिळाली जॉबची ऑफर

कांबळीचे दु:ख ऐकून महाराष्ट्रातील बिझनेसमन संदीप थोरात यांनी मोठ्या मनाने कांबळीला मदतीसाठी हात पुढे केला आहे थोरात यांनी कांबळीला आपली कंपनी सह्याद्री समूहात एक लाख रूपये महिना पगाराची नोकरीची ऑफर दिली आहे. मात्र हा जॉब क्रिकेटशी संबंधित नाही. कांबळीला क्रिकेटचा हात साडून कंपनीच्या फायनान्स डिपार्टमेंटमध्ये काम करावे लागेल. दरम्यान, माजी भारतीय फलंदाजाने थोरात यांनी दिलेल्या ऑफरवर कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. कांबळी महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा लहानपणीचा मित्र आहे. 

कांबळीने एमसीएकडे मागितली होती मदत

कांबळीने मिड डेला दिलेल्या एका खास मुलाखतीत मुंबई क्रिकेटर असोसिएशकडून नोकरीची मागणी केली होती. त्याने सांगितले होते की मला असे काम हवे जिथे मी तरुणांसोबत काम करू शकतो. मला माहीत आहे की मुंबईने अमोल मुजूमदार यांना कोचच्या रूपात कायम ठेवले आहे. मात्र माझी गरज असेल तर मी ते पूर्ण करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. आम्ही एकत्र खेळले आहोत. 

अधिक वाचा - 'या' कारणामुळे एकाच साडीने पती पत्नीने घेतला गळफास

कांबळीने पुढे सांगितले, मी एमसीएकडून मदत मागितली. मी सीआयसीमध्येही आलो जिथे एक हॉनररी जॉब होता. मी एमसीएकडे मागणी केली की त्यांनी मला काम द्यावे. कारण मला माझ्या कुटुंबाला बघायचे आहे. मग ते वानखेडे स्टेडियम असे अथवा बीकेसी मी दोन्ही जागांवर काम करण्यास तयार आहे. मुंबई क्रिकेटने मला खूप काही दिले आहे. या खेळाने मला आयुष्य दिले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी